Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

गैस संकट से छत्रपति संभाजीनगर के उद्योग एक्सपोर्ट में देरी, ऑटोचेन प्रभावित

VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 02:31:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योग सध्या गॅसटंचाईमुळे संकटात सापडले आहेत. शहरातून वर्षाकाठी सुमारे २५ ते २७ हजार कोटी रुपयांची मोठी निर्यात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या तीव्र गॅसटंचाईमुळे या निर्यातीवर कुऱ्हाड कोसळली आहे. विशेषतः ऑटोमोबाइल क्षेत्रातील स्थानिक उत्पादन साखळी विस्कळीत झाल्याने परदेशात जाणारी शिपमेंट आता १५-१५ दिवस उशिराने जात आहे. उद्योजक संघटना  सीएमआयने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती उद्योजक देताय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 17, 2026 03:49:47
220
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 03:48:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुर शहर भाजपच्या युवा मोर्चाच्या जम्बो कार्यकारिणीला शहराध्यक्षांनी दिली स्थगिती - सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीला शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली स्थगिती - भाजपा शहर युवा मोर्चाकडून जम्बो कार्यकारणी करण्यात आली होती जाहीर - मात्र शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अचानकपणे जम्बो कार्यकारिणीला स्थगिती दिल्याने अनेक चर्चांना उधाण - भाजप युवा मोर्चा मध्ये वादग्रस्त नियुक्ती असल्याची चर्चा - कार्यकारिणी सर्वसमावेशक नसल्याचे कारण पुढे करत करण्यात आली कारवाई - भाजपच्या युवा संघटनेत उडाली खळबळ तर नव्या कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष
91
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 03:32:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बोर दहेगाव धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आले आणि या प्रशासकीय ढिसाळपणामुळे एका शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. करंजगाव येथील ७४ वर्षीय भानुदास गंगाधर मगर यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या अचानक पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी दुपारी बोर दहेगाव धरणातून ३०० ते ४०० क्युसेक वेगाने अचानक पाणी सोडण्यात आले. नियमानुसार, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन किंवा प्रशासकीय यंत्रणेद्वारे सावध करणे बंधनकारक असते. मात्र, जलसंपदा विभागाने या नियमांना केराची टोपी दाखवली. सायंकाळच्या sुमारास भानुदास मगर आपली बैलगाडी घेऊन नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने मगर यांची बैलगाडी, गाय आणि ते स्वतः पुरात वाहून गेले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर करंजगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जाते.
838
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 03:32:09
Nashik, Maharashtra:96 महिलांच्या तपासणीनंतर स्त्री बीजप्रकरणी पडताळणी..महापालिकेचे पथक बदलापूरला जाणार अँकर नाशिकात स्त्री बीज तस्करी प्रकरणात मालती आयव्हीएफचे संचालक डॉ. अमोल पाटील यांच्यावरील तपास अधिक शीघ्रगतीने केला जात आहे. 96 महिलांकडून स्त्री बीज घेतल्याच्या तपासणीनंतर महापालिकेचे आरोग्य पथक बदलापूरला जाऊन या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची पडताळणी करणार आहे....या प्रकरणी मनपाच्या आरोग्य विभागाकडून तपासासाठी बदलापूर येथील संबंधित केंद्रातील महिलांची नावे मागवली होती. शहरातील भुजबळ फॉर्मजवळील मालती आयव्हीएफ केंद्रातील नोंदींची तपासणी करताना 96 महिलांकडून स्त्रीबीज घेतल्याची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. नाशिकमधील काही महिला बदलापूर केंद्रातही गेल्या होत्या का, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेचे पथक बदलापूरला भेट देणार आहे...
994
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 03:31:25
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बापू पुलाजवळ गोदावरी नदीत आदळला मृत माशांचा खच गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले, गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी खास गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. गोदावरीवरील बापू पुलाजवळील पात्रात पाण्यातील मासे मृतावस्थेत तरंगताना आढळले. यामुळे संवर्धन कक्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सावरकरनगर जवळच्या बापू पुलाजवळ नदीकाठी मृत माशांचा ढीग सापडला. रसायनमिश्रित सांडपाणी थेट गोदावरीत सोडण्यात येते. यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने माशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
1005
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 03:30:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पूर्वी रोज 2 लाख गॅस बुकिंग मात्र आता टंचाईच्या भीतीपोटी दररोज तब्बल 17 लाख गॅसची होतेय बुकिंग - घरगुती गॅस सिलेंडर टंचाईच्या भीतीपोटी नागरिकांकडून पॅनिक बुकिंगला सुरवात - पूर्वी रोज सरासरी 2 लाख गॅसचे होत होते बुकिंग आता मात्र दररोज 17 लाख घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग - टंचाईच्या भीतीपोटी गॅस बुकिंगची संख्या वाढल्याने सर्व्हर मंदावला तर दुसरीकडे गॅस वितरणाचा बोजवारा उडाल्याच चित्र - सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन कक्षाची स्थापना तर नागरिकांना गॅस वितरण बाबत तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन नंबरची घोषणा - परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पुरवठा अधिकारी, महापालिका आयुक्त यांची समिती स्थापन
1035
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 03:21:03
1030
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 17, 2026 03:19:27
1020
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 03:03:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या युतीबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलामध्ये अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. बुधवारी याबाबत निवडणूक आहे, त्यामुळे भाजप, शिवसेना आणि उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत अजूनही शिवसेना आणि भाजपची एकत्रित बैठक झालेली नाही. मात्र, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पूर्ण नियोजन दोन्ही पक्षांनी केले आहे. गेल्या वेळी तीन पंचायत समिती सदस्य फुटल्यामुळे उद्धवसेनेने चार दिवसांपासून सदस्य सहलीवर पाठवले आहेत. बुधवार रोजी विशेष सभा होईल त्यात अध्यक्ष निवडण्यात येणार आहे...
985
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 03:02:20
Bhandara, Maharashtra:अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी/मोरगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्तरित्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
940
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 03:00:23
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी येथे वन विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळी जमा होत मोजणीला विरोध दर्शविल्याने अखेर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. श्रीरामनगर गावाचे पुनर्वसन सौंदड परिसरात करण्यात आले होते. त्यावेळी सौंदड व बोपाबोडी येथील वन विभागातील तब्बल १२ गट श्रीरामनगर येथील नागरिकांना शेतीसाठी देण्यात असल्याचे सांगितले जाते. मात्र बोपाबोडी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने कार्यालयात बसूनच हे गट श्रीरामनगर गावाला दिले असून त्यात स्थानिक ग्रामस्थांच्या हक्काच्या जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, बोपाबोडी गावाची हद्द वनजमिनीपर्यंत मर्यादित ठेवून त्यापुढील जमीन श्रीरामनगर गावाला देण्यात यावी. म्हणून जामीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांनी विरोध केला.
958
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 17, 2026 02:48:40
1044
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 17, 2026 02:34:08
970
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 02:32:26
Ahilyanagar, Maharashtra:जिल्हाधिकारी कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतसंस्थांच्या बोगस वसुली दाखल्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस वसुली दाखले दाखवून कर्जदारांची लूट केली जात असल्याचा आरोप सह्याद्री छावा संघटनेने केला आहे. संघटनेकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले ल. संबळ आणि हलगीच्या वाजवत आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. एनपीएचे निकष डावलून आणि नियमांचे उल्लंघन करून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या प्रकरणांचे फेर लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करावे अशी मागणी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
1089
comment0
Report
Advertisement
Back to top