Back
मराठवाड्यात मुसळधार पावस, धरणे तुडुंब; सिंचनक्षमता वाढणार
NMNITESH MAHAJAN
Oct 23, 2025 04:00:23
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सर्वच धरणं तुडुंब,5 लाख 48 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांद्वारे यंदा सर्वाधिक 5 लाख 48 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला़ आहे. कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेकडो गावांची तहान टँकरद्वारे बाहेरून पाणी आणून भागवावी लागते. यामुळे मराठवाड्याला 'टँकरवाडा' म्हणूनही दूषणे दिली जातात.
यंदा वरुणराजाने मराठवाड्यात कहर केला. अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले. मात्र, मोठे, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्प पाण्याने भरले आहेत. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी सिंचनाकरिता पाणी पाण्यासाठी यंदा भटकावे लागणार नाही. उपलब्ध होणार आहे. शिवाय पिण्याच्या
पैठण येथील जायकवाडीसह 11 मोठी धरणे, 75 मध्यम प्रकल्प आणि 754 लघु सिंचन प्रकल्प विभागात आहेत. शिवाय गोदावरी नदीवर 15 तर तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवर 35, असे एकूण 50 उच्चपातळी कोल्हापुरी बंधारे आहेत. हे सर्व प्रकल्प यंदा पाण्याने तुडुंब भरले आहेत. या सर्व प्रकल्पांची सिंचनक्षमता 12 लाख 45 हजार हेक्टर आहे. असे असूनही आजपर्यंत एवढे क्षेत्र कधीच सिंचनाखाली येऊ शकले नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 23, 2025 09:00:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 23, 2025 08:45:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 23, 2025 08:45:190
Report
AKAMAR KANE
FollowOct 23, 2025 08:04:160
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 07:50:170
Report
PNPratap Naik1
FollowOct 23, 2025 07:32:380
Report
ABATISH BHOIR
FollowOct 23, 2025 07:19:474
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 23, 2025 07:19:282
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 23, 2025 07:17:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 23, 2025 07:00:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 23, 2025 06:56:550
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 23, 2025 06:55:310
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 23, 2025 06:54:490
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 23, 2025 06:51:240
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 23, 2025 06:48:363
Report