Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में कपास वेचनी के लिए मजूर नहीं, किसान परेशान

NMNITESH MAHAJAN
Nov 17, 2025 02:00:27
Jalna, Maharashtra
जालना : कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, किलोला 11 रुपये दर. जालन्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात यावर्षी कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मात्र मजूर टंचाईच्या झळा कापूस उत्पादकांना बसत आहे. सध्या सोयाबीन, मका मिरची तोडणी सुरू आहे. त्यातच कापूस वेचणीला आल्यानं शेतकरी हतबल झालाय. कापूस वेचणीसाठी किलोला 11 रुपये दर शेतकऱ्यांना मोजावे लागत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय.
208
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 17, 2025 04:21:51
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण होत असून, हिवाळ्याची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. त्यात आता दोन दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळ नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. यंदा पावसाने अक्षरशः कहर केल्यामुळे थंडीचे आगमन साधारण महिनाभर उशिरा झाले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे तापमान १४ ते १५ अंशांवर गेल्याने गारवा प्रकर्षाने जाणवतोय. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केला आहे. गावोगावांत रस्त्याच्या कडेला, चौकांत शेकोट्या पेटून उबेचा आसरा घेत असलेल्या नागरिकांची दृश्यं हिवाळ्याची नांदी देत आहेत.
94
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 17, 2025 04:21:21
55
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 17, 2025 04:16:45
Jalna, Maharashtra:जालना : मोसंबीला कमी दर, दोन एकरावर मोसंबी बागेवर शेतकऱ्यानं फिरवला बुलडोजर जालना : मोसंबीचे दर घसरले आहेत. मोसंबीला बाजारात मिळणारा कवडीमोल भाव आणि मोसंबी बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेतकऱ्यानं त्याच्या मोसंबी बागेवर बुलडोजर चालवून ही मोसंबी बाग नष्ट केली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी कैलास खोमणे यांनी त्यांच्या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला. दोन एकरावरील बाग जेसीबीने उपटून नष्ट केली. गेल्या तीन चार वर्षापासून मोसंबीला दहा ते बारा रुपये किलोचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे निराश होऊन त्यांनी मोसंबी बाग उपटून टाकली. सध्या मोसंबीला बाजारात कमी दर मिळत असल्यानं शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 04:16:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:लग्नास नकार दिल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांवर आणि मुलीवर हल्ला केल्यााचा प्रकार सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे घडला आहे. यामध्ये मुलीचा बाप आणि मुलगी हे गंभीर जखमे झाले आहेत. टाकळी गावातील अक्षय पाटील या तरुणांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. अक्षय याने अभयकुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती, मात्र लग्नास नकार दिल्याच्या रागातुन अक्षय याने मुलीच्या घर जाऊन मुलीचे वडील अभय कुमार पाटील यांच्यावर खुरप्याने वार केला आहे, हा वार करत असताना मुलीने अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये मुलीच्या हाताचे बोट तुटले आहे. या घटनेनंतर अक्षय पसार झाला असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मिरज पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 17, 2025 04:00:19
Akola, Maharashtra:दिल्लीतील लाल किल्ला परिसरात नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना अकोला पोलिसांनी एका संशयित युवकाला ताब्यात घेतले होते. या युवकाचा स्फोटामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकावर पोलिसांना पूर्वीपासूनच संशय होता. स्फोटाच्या आधी तो अचानक अकोल्यातून गायब झाला होता, तर त्याचा मोबाईल लोकेशन बॉम्बस्फोटच्या दिवशी दिल्ली परिसरात आढळल्याने संशय अधिक गडद झाला. घटनेशी या युवकाचा प्रत्यक्ष संबंध आहे का, तो कोणाशी संपर्कात होता, तसेच स्फोटापूर्वी किंवा नंतर त्याची हालचाल काय होती याबाबत पोलिसांनी सुमारे दहा तास या युवकाची चौकशी केली. मात्र पोलिसांना या चौकशी दरम्यान कोणतीही संशयित बाब समोर न आल्याने या युवकाला सोडून देण्यात आलं.
93
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 17, 2025 03:50:12
Beed, Maharashtra:बीड:सहा नगरपालिकांच्या 288 जागांसाठी 1046 अर्ज बीड नगरपालिकेत भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात होणार लढत बीड जिल्ह्यात आठ वर्षानंतर सहा नगर परिषाद्य निवडणुका होत आहेत. सहा नगरपालिकेत 282 नगरसेवक आणि सहा नगराध्यक्ष पदासाठी 1046 अर्ज आत्तापर्यंत दाखल झाले. नगरसेवक पदासाठी 976 तर नगराध्यक्ष पदासाठी 70 अर्ज आले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस अवघे काही तास शिल्लक राहिले असताना प्रमुख पक्षाकडून याची तयारी सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज उमेदवारांना दाखल करता येणार आहे. दुपारपर्यंत प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर होतील.
91
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 17, 2025 03:46:54
Beed, Maharashtra:बीड़ के चाकरवाड़ी शिवारात पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही विचारणा न करता उभ्या पिकात विद्युत पोल उभारण्यासाठी ऐन मधोमध दहा फुटांचे खड्डे करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. याच पवनचक्की प्रकल्पाच्या प्रकरणावरून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले होते. मात्र आजही परिसरात परिस्थिती जैसे थेच आहे. पवनचक्की प्रकल्प कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा अशी याचना इथले शेतकरी करत आहेत. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असताना इतर पिकं शेतकऱ्यांकडून जोपासली जात आहेत. मात्र या पिकांचा कोणताही विचार न करता पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय. विरोध केल्याने आमचा देखील जीव धोक्यात आहे असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.
152
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 03:32:50
Satara, Maharashtra:महाबळेश्वर : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ दिवसांत थंडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तापमानात सतत घसरण होत असून शहरातील किमान तापमान 14 ते 16 अंशांपर्यंत खाली आले आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तर याहून कमी तापमानाची नोंद होते. थंडीचा कडाका वाढल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकही थंडीत गारठले आहेत. निसर्गसौंदर्याचे थंडीत खुललेले रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची मजा पर्यटक घेत आहेत. सकाळ पासूनच थंडीपासून बचावासाठी स्वेटर, जॅकेट्स, कानटोपी अशा उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे.
145
comment0
Report
Advertisement
Back to top