Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में गाड़ी भिड़ंत के बाद समूह ने युवक और महिला पर लाठियां चलाईं

NMNITESH MAHAJAN
Dec 11, 2025 01:31:30
Jalna, Maharashtra
जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना मारहाणीत तरुणासह एक महिलाही जखमी मारहाणीस घटना कॅमेरात कैद अँकर- जालन्यात गाडीचा धक्का लागल्यामुळं टोळक्याकडून तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना घडलीये... शहरातील भोकरदन नाका परिसरात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गाडी चालकाचा टोळक्यांसोबत वाद झाला. या वादात टोळक्यांनी लाठ्या-काठ्यांनी तरुणाला बेदम मारहाण केलीये.. मारहाणीनंतर टोळक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान या घटनेत तरुणासह एक महिलाही जखमी झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलंय.. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 11, 2025 03:03:58
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 11, 2025 03:03:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांच्या पाणी प्रश्नासाठी आ. देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक, आठ दिवसात निविदा काढण्याचे आश्वासन - 12 कोटी सोलापूरकरांच्या पाणीपुरवठ्यावरून आ. देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक - अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 892 कोटी रुपयांपैकी 89 कोटी तात्काळ मंजूर मात्र मुख्यसचिव आणि वित्त सचिव यांच्यातील मत मतांतरामुळे रखडले होते काम - समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन देखील शहराला रोज पाणीपुरवठा होत नसल्याची व्यक्त करण्यात आली खंत - सोलापूर शहर हे महत्त्वाचे शहर असून कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना निर्देश - त्यामुळे आता आ. देवेंद्र कोठे यांनी केलेली मागणी लवकरच पूर्ण होणार असून सदर कामाची निविदा आगामी आठ दिवसात काढण्याचे मुख्य सचिवांचे आश्वासन
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 02:46:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तुजापूरमधील ५६.२५ हेक्टर म्हणजेच १३९ एकरांत विस्तारीकरण होणार आहे. या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित करण्यासाठी आणि त्यापोटी होणाऱ्या ५७८.४५ कोटी रुपयांच्या खर्चास नोव्हेंबर २०२३ मध्ये शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली होती. टप्प्याटप्यात निधी मिळत आहे. निधीचा मार्ग मोकळा होत असल्याने विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 11, 2025 02:33:55
Pandharpur, Maharashtra:11122025 slug - PPR_TAHSILDAR_ file02 --- Anchor - महसूल विभागात वाळू माफिया विरोधात केलेल्या कारवाईने लेडी सिंघम म्हणून ओळख मिळविलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार ठोकडे यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो दाखल करुन पुढील कार्यवाहीसाठी समितीकडे पाठवला आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना नागरिकांनी संपर्क केला असता त्या योग्य प्रतिसाद देत नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या कामानिमित्त वारंवार फोन करुनही त्या फोन घेत नाहीत. तसेच, आमदार झाल्यापासून तहसील कार्यालयाकडे आवश्यक माहिती मागवली असता ती न देणे, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे, शासकीय कामकाजा विषयी माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अशा बाबी वारंवार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे समन्वय समितीसह विविध समित्यांची तहसीलदार ठोकडे यांनी वर्षभरात एकही बैठक बोलावली नाही. आमदार म्हणून अशा बैठकीचे आमंत्रण दिले नाही. त्यामुळं आमदार नारायण पाटील यांनी हक्कभंग समितीकडे तोंडी व लेखी तक्रार केली. या तक्रारीनंतर हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही बाब गंभीर असल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 02:33:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाेतील १९०८ कंत्राटी आणि ३१०० हून अधिक नियमित कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पुन्हा एकदा थकले आहे. मागील काही महिन्यांपासून पगार उशिराने मिळण्याच्या प्रकारांमुळे घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यात अडचणी येत असून कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.या थकीत वेतनाचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे, तर २०० हून अधिक अधिकाऱ्यांवरही झाला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, तोपर्यंत नियमित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचेही पगार होत नाही..  मनपाची आर्थिक टंचाई, जीएसटी आणि इतर शासकीय अनुदान वेळेवर न मिळणे. सोबतच नव्याने सुरू केलेल्या 'हजेरी अप मध्ये अनेक तांत्रिक तक्रारी असल्याने वेतन वितरणाची प्रक्रिया लांबली आहे. प्रशासन लवकरात लवकर वेतन अदा करण्याचे आश्वासन देत असले तरी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. वेळेवर वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 02:33:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फुलंब्री नगरपालिका की निवडणुकींतर्गत अर्ज मागे घेण्याच्या तारखे अंती नगरसेवक पदासाठीच्या ११ जागांसाठी एकूण ५४, तर नगराध्यक्ष पदासाठी तीन, असे एकूण ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. २० डिसेंबर रोजी मतदान आहे. वॉर्ड क्रमांक २, वार्ड क्रमांक ८ तसेच नगराध्यक्ष पदासंदर्भात काही प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्यामुळे सुधारित निवडणूक कार्यक्रमात संबंधित उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती. गुरुवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, शुक्रवारपासून पुन्हा नव्याने प्रचाराला सुरुवात होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 02:32:52
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 11, 2025 01:31:11
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने शहरातील अनधिकृतपणे होर्डिंग्ज, फलक, पोस्टर, बॅनर लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. वर्षभरात या विभागाने 1 लाख 77 हजार 266 फलकांवर कारवाई करत 23 लाख 19 हजार रुपयांचा दंड देखील वसूल केलाय, तर 17 जणांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांत ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती. दरम्यान पुढील काळातही अशाच प्रकारची कारवाई होणार असून नागरिकांनी अथवा व्यावसायिकांनी अधिकृत होर्डिंग्ज वर तसेच बॅनर लावायचे असल्यास परवानगी घेऊनच लावावे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 11, 2025 01:17:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आमदार रोहित पाटलांनी,गाजवलं अधिवेशन,तासगाव व कवठेमहांकाळ शहराचे मांडले प्रश्न.. अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटलांकडुन सांगलीच्या तासगाव आणि कवठेमहांकाळ शहराच्या विकासाचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलेत. तासगाव आणि कवठेमहांकाळ शहरातले विविध योजना नगरविकास खात्याकडे प्रास्तवित असून या योजनांसाठी नगर विकास खात्याकडून निधी आणि मंजुरी मिळावी,अशी मागणी आमदार रोहित पाटलांकडून अधिवेशनाच्या पुरवणी मागणीवरून करण्यात आली आहे.तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही शहरांच्या शाश्वत विकासासाठी तसेच पायाभूत सुविधा उभारणीतील अडचणी प्रामुख्याने रोहित पाटील यांनी मांडल्या.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 11, 2025 01:17:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी व निलंबित मागणीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून हटके आंदोलन.. संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर अनोख्या पद्धतीने हटके असं आंदोलन केलं आहे. अंगावर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या बाबतीत असणाऱ्या तक्रारींची पत्रक लटकवत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे,असा आरोप करत गायकवाड यांच्यावर असणाऱ्या आरोपांची तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत त्यांना निलंबित करावं,अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मोहन गायकवाड यांना पाठीशी घालत आहे,का असा सवाल देखील सदामते यांनी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top