Back
सोलापुर की तहसीलदार पर हितभंग प्रस्ताव, विधानसभा अध्यक्ष ने तत्काल कार्रवाई के निर्देश दिए
SKSACHIN KASABE
Dec 11, 2025 02:33:55
Pandharpur, Maharashtra
11122025 slug - PPR_TAHSILDAR_ file02 --- Anchor - महसूल विभागात वाळू माफिया विरोधात केलेल्या कारवाईने लेडी सिंघम म्हणून ओळख मिळविलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार ठोकडे यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो दाखल करुन पुढील कार्यवाहीसाठी समितीकडे पाठवला आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना नागरिकांनी संपर्क केला असता त्या योग्य प्रतिसाद देत नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या कामानिमित्त वारंवार फोन करुनही त्या फोन घेत नाहीत. तसेच, आमदार झाल्यापासून तहसील कार्यालयाकडे आवश्यक माहिती मागवली असता ती न देणे, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे, शासकीय कामकाजा विषयी माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अशा बाबी वारंवार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे
समन्वय समितीसह विविध समित्यांची तहसीलदार ठोकडे यांनी वर्षभरात एकही बैठक बोलावली नाही. आमदार म्हणून अशा बैठकीचे आमंत्रण दिले नाही. त्यामुळं आमदार नारायण पाटील यांनी हक्कभंग समितीकडे तोंडी व लेखी तक्रार केली. या तक्रारीनंतर हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही बाब गंभीर असल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 11, 2025 03:50:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 11, 2025 03:47:140
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 11, 2025 03:33:580
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 11, 2025 03:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 11, 2025 03:19:380
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 11, 2025 03:03:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 11, 2025 03:03:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:46:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:33:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:33:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:32:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:16:020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 11, 2025 02:15:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 11, 2025 02:00:580
Report