Back
जालना टोल पर एम्बुलنس रोकी गयी, युवक की मौत की जांच के दौरान शव मिला
NMNITESH MAHAJAN
Mar 28, 2026 01:31:39
Jalna, Maharashtra
जालना :समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका अडवली; तपासणीत तरुणाचा मृतदेह आढळला
ठाण्याहून नांदेडकडे जाताना जालना टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
अँकर :समृद्धी महामार्गावरून ठाण्याहून नांदेडकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका जालना येथील टोल नाक्यावर समृध्दी महामार्ग पोलिसांनी अडवली. तपासणीदरम्यान रुग्णवाहिकेत सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याय. या घटनेमुळे खळबळ उडाली.
पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवली. मृत तरुणाचे कुटुंबीय त्याला नांदेड येथील गावी घेऊन जात होते.
35 वर्षीय विजय विकास थोरात असं मृत तरुणाचं नाव आहे.(रा.घोडबंदर रोड,डोंगरीपाडा कसार वडवली पो.स्टे. हद्द) मयत हा मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याचा एक डोळा निकामी होता तसेच त्याला अर्धांगवायूचा त्रास असल्याची माहिती वडिलांनी दिली. त्याला मद्याचेही व्यसन होते.
मयताच्या वडिलांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री तो घराबाहेर शेजारच्या वट्यावर झोपलेला होता. मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आई त्याला उठवण्यासाठी गेली असता तो मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता थेट रुग्णवाहिकेतून मृतदेह नांदेडकडे नेण्याचा निर्णय घेतला. नांदेड येथील सिडको मध्ये या कुटुंबियाचे घर आणि नातेवाईक आहेत.
दरम्यान, ठाणे येथील किंग काँग नगर परिसरातील शेजाऱ्यांनी ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे येथील कासार वडवली पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत समृद्धी महामार्ग पोलिसांच्या मदतीने जालना टोल नाक्यावर रुग्णवाहिका अडवली.
सध्या मृतदेह जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असून, या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.या प्रकरणात घातपात आहे की नाही हे पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.
बाईट : विकास थोरात,मयताचे वडील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 03:30:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 28, 2026 03:16:16165
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 03:16:01102
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 28, 2026 03:15:53191
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 28, 2026 03:15:39157
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 28, 2026 03:04:47896
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 28, 2026 03:03:42943
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 28, 2026 03:02:21917
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 28, 2026 03:00:15892
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 28, 2026 02:47:14917
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 28, 2026 02:46:511026
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 28, 2026 02:32:001039
Report
KPKAILAS PURI
FollowMar 28, 2026 02:31:26912
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 28, 2026 02:31:101054
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 28, 2026 02:16:121026
Report