Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

235.91 करोड़ बजट मंजूर: शिक्षण विभाग के लिए 11 करोड़; सीसीटीवी एवं ई-लर्निंग शामिल

PPPRAFULLA PAWAR
Mar 28, 2026 02:16:12
Varasoli, Maharashtra
रायगड जिल्हा परिषदचा पुढील आर्थिक वर्षासाठी 235 कोटी ९१ लाख रुपयांचा अर्थ संकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला. यात शिक्षण विभागासाठी पहिल्यांदाच तब्बल 11 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली है. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, ई-लर्निंग साहित्य, मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवणे अशा उपक्रमांचा समावेश असणार आहे. शिवाय अंगणवाड्यांमध्ये वायफाय, बालकांना गणवेश पुरवणे असे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचा दावा अध्यक्ष महेंद्र वाकडीकर यांनी केलेय. चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 03:04:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पेट्रोल टंचाईमुळे रस्त्यात ड्राय झालेली दुचाकी बैलगाडीतून पंपावर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवराई फाटा येथे पेट्रोल टंचाईची झळ प्रत्यक्षात पाहायला मिळाली. एका तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडली. पेट्रोल मिळत नसल्याने त्या तरुणाने थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ sध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे परिस्थितीची तीव्रता अधोरेखित होत आहे.
896
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 28, 2026 03:03:42
Ahilyanagar, Maharashtra:स्लग: पालिकेच्या मालकीच्या जागेवरून सर्वसाधारण सभेत गोंधळ अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिकेच्या मालकीच्या असलेल्या जागेवरून मोठा गोंधळ झाला महानगरपालिकेला स्वतःचं मोठं उत्पन्न नाही त्यामुळे शहरातील विकास कामाला गती मिळत नाही अशी ओरड प्रशासना करून करण्यात येते मात्र शहर आणि शहराच्या परिसरामध्ये हजारो कोटींची पालिकेच्या मालकीची जागा आहे मात्र या जागेवर अतिक्रमण झाली आहेत पालिकेने बांधलेले व्यावसायिक संकुलांचं देखील व्यवस्थापन केलं जात नाही त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात कसलीच भर पडत नाहीत असं मुद्दा उपस्थित करत भाजपचे नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रशासनाला धारेवर धरलं आणि एक समिती स्थापन करून शहर आणि शहर परिसरामध्ये पालिकेच्या मालकीच्या जागा आहेत त्यांची नोंदणी करावी आणि त्या जागेवर विकास करण्याची मागणी केली आहे
943
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 28, 2026 03:02:21
Dharashiv, Maharashtra:सभापती निवडीनंतर शिवसेनेत वादाची ठिणगी; गटबाजी पुन्हा उफाळली! एकनाथ शिंदेंच्या आदेशालाच स्थानिक पातळीवर धाब्यावर बसवले? आनंद पाटलांचा गंभीर आरोप; आईसह सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा निष्ठावंतांना डावलून “दुसऱ्यांना” संधी; पक्षातच वाढ रोखली जातेय? धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पक्षात गटबाजी उफळून आली असून, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशालाच स्थानिक पदाधिकारी जुमानत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांनी हा आरोप करत, स्वतःसह त्यांच्या मातोश्रींच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही दिलाय. जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेत सुरू असलेली खदखद अजूनही शांत झालेली नाही. सभापती पदाच्या निवडीत निष्ठावंतांना डावलून, इतरांसोबत गेलेल्या सदस्यांना संधी दिल्याचा आरोप आनंद पाटील यांनी केलाय. वरिष्ठांच्या आदेशानंतरही शेवटच्या क्षणी डावलण्यात आल्यामुळे नाराजी वाढली असल्याचं त्यांनी म्हटलंय. पक्षाच्या वाढीला पक्षातूनच खोडा घातला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.
917
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 03:00:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या पाणी पुरवठा योजनेच्या आतापर्यंतच्या कामाची सद्यःस्थिती तपासण्यासाठी सर्वच यंत्रणांनी संयुक्त पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले... वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे काम अपूर्ण आहे. पाण्यावर क्लोरिनेशन प्रक्रियेची रूमही तयार नसल्याचा दावा मनपातने केला. त्यावर कंत्राटदार कंपनीतर्फे मनपाचा दावा फेटाळत वॉटर ट्रीटमेंट प्लांट पूर्ण झालेला असल्याचे तसेच क्लोरिनेशन रूमही तयार असल्याचे सांगितले. मात्र क्लोरिनेशनचा परवाना घेतला नसताना केवळ रूम असल्याचं मनपाचे म्हणणे आहे... योजना एक वर्षापर्यंत कंपनीतर्फे चालवली जाणार असून ५ वर्षांची देखभाल दुरुस्तीही त्यांच्याकडे राहील. सध्या शहराची लोकसंख्या १८ लाख आहे. २०३७ पर्यंत ती २७ लाख तर २०५२ पर्यंत ३३ लाख १७ हजारांवर जाणार आहे. योजनेचे आयुष्य ३० वर्षे गृहीत धरले आहे. सध्या एका पंपाद्वारे १०० एमएलडी पाणी सुरू करून पाइप स्वच्छ करीत असल्याचे कंपनीने कोर्टातनसांगितले. यानंतर २ पंपांद्वारे २०० एमएलडी आणि अंतिम टप्प्यात ६ पंपांद्वारे ६०० एमएलडी पाणी येणार आहे.
892
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 02:47:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. मात्र, या तापमानासोबतच आता जिल्ह्यावर अस्मानी संकट घोंगावत आहे. येत्या ३१ मार्च रोजी शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, ३० मार्चपासून ढगाळ वातावरण निर्माण होईल. मात्र, खरा धोका ३१ मार्चला आहे. या दिवशी थंडरस्कॉलचा इशारा देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. यामुळे झाडे पडणे किंवा पत्रे उडण्याचे प्रकार घडू शकतात. एप्रिलच्या सुरुवातीला तापमानात २ अंशांची घट होऊन ते ३६ अंशांपर्यंत खाली येईल, मात्र पावसाचा जोर कायम राहील
917
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 28, 2026 02:46:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:बाळूमामांच्या मेंढरांनी बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले. सांगलीच्या गोंधळेवाडी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला आहे. पंढरपुरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातला. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही चैत्रवारी पायी दिंडी पंढपुरकडे निघाली आहे. सागवानी आकर्षक रथात पालखी सह शेकडो विठ्ठल भक्त या चैत्रवारीत सहभागी झाले आहेत. बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं.
1026
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 02:32:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सततच्या पेट्रोल पंप वरील रांगा पाहून आता जिल्हाधिकारी कार्यालय आक्रमक झाले आहे, जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक असतानाही पंपांवर रांगा का लागतात , वितरण कंपन्या आणि पंप चालकांनी आपसातील तांत्रिक वाद तातडीने मिटवावेत. उद्यापासून पेट्रोल पंपांवर गर्दी दिसता कामा नये, अन्यथा मला माझे अधिकार वापरावे लागतील,' अशा कडक शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पेट्रोल असोसिएशनला दम दिलाय ,बविशेष बैठकीत पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष यांनी आरोप केला की, आम्ही अॅडव्हान्स पैसे भरूनही कंपन्यांकडून टँकरचा पुरवठा वेळेवर केला जात नाही. यावर कंपन्यांनी पुरवठा नियमित असल्याचा दावा केला. या अंतर्गत वादात सामान्य जनता होरपळत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांचीही कानउघाडणी केली. येत्या दोन दिवसांत वितरण व्यवस्था पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
1039
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 28, 2026 02:31:10
Dharashiv, Maharashtra:शिराढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद तीव्र. प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यभर आंदोलनाचा इशारा. “पोलिसांनी अवमान केला, कारवाई करा” – महेश डोंगरे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यावर पोलिस ठाम शिराढोण गावातील चौकातील बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी हटवल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. या घटनेत पोलिसांनी अवमानकारक कृत्य केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात आंदोलक गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यावर पोलिस ठाम असून, त्यामुळे दुसऱ्या दिवशीही गावात तणावपूर्ण वातावरण कायम आहे.
1054
comment0
Report
Advertisement
Back to top