Back
गडचिरोली पुलिस के सामने 11 नक्सलवादी आत्मसमर्पण; शस्त्रें रखी गयीं
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 07:19:53
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली पुलिसांसमोर ११ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, पोलीस महासंचालक रश्मि शुकला यांच्या उपस्थितीत खाली ठेवली शस्त्रे
( अँकर:- महाराष्ट्रातील नक्षली चळवळीला आणखी एक धक्का बसला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पित नक्षल्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. )
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यात----
• ०२ डिव्हीसीएम (DVCM) दर्जाचे वरिष्ठ नक्षली
• ०३ पीपीसीएम (PPCM) दर्जाचे नक्षली
• ०२ एसीएम (ACM) दर्जाचे नक्षली
• ०४ सदस्य पदावरील नक्षली
यांचा समावेश आहे.
१) रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (DVCM - भामरागड दलम)
२) भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी (DVCM / पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य)
३) पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा (PPCM / सेक्शन कमांडर PLGA बटालियन क्र. ०१)
४) रतन ऊर्फ सन्ना ماسु ओयाम (PPCM कंपनी क्र. ०७)
५)कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (PPCM कंपनी क्र. ०७)
६) पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (ACM कान्हा भोरमदेव दलम, MMC झोन)
७) रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी (ACM, कुतूल एरिया कमिटी)
अशी त्यांची नावे आहेत.
गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०१५ पासून आतापर्यंत एकूण ११२ नक्षल्यानी आत्मसमर्पण केले आहे.
२००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस दलाने केलेल्या पुनर्वसनामुळे आजपर्यंत एकूण ७८३ नक्षल्यानी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
या सोहळ्यादरम्यान सी-६० अधिकारी व जवानांचा DGP रश्मि शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
'प्रोजेक्ट उडान' पुस्तकाचे अनावरण
यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका' या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या पुस्तकामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
बाईट १) रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक,महाराष्ट्र
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 09:33:310
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 09:23:1936
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 09:01:1638
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 10, 2025 08:48:09183
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 08:19:0370
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 10, 2025 08:06:22101
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 07:52:27173
Report
SNSWATI NAIK
FollowDec 10, 2025 07:19:13103
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 07:15:11158
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 07:00:25261
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 06:53:41127
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 10, 2025 06:51:4464
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 06:17:07184
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 05:49:1898
Report