Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

धुले में बिबटियों के बाद तरस ने लोगों पर हमला करके पैदा की दहशत

PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 02:51:01
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठ आता तरसांना मानवी रक्ताची चटक लागली आहे. शिरपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये तरसाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. मोहीदा येथे पाणी पिण्यासाठी झोपडीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या तरसाचा हल्ला केला. तर पळासनेर येथे शेळ्या चारणाऱ्या एकावर तरसाने अचानक हल्ला करीत जखमी केले. यां हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असून, दोघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांमंधे भीतीचे वातावरण आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 11:10:10
Akola, Maharashtra:शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ ९०० किलो वजनाच्या ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्यास त्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 10, 2026 10:51:42
Ahilyanagar, Maharashtra:गावात कोणी शिवराळ भाषा वापरली तर पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे... गावात सार्वजनिक ठिकाणी घाण केली किंवा कचरा टाकला तर शंभर रुपयाचा दंड भरावा लागणार आहे... अहिल्यानगरच्या कोळगाव या ठिकाणी तुम्हाला शिवराय भाषा वापरता येणार नाही आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा ही टाकता येणार नाही. महिला दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत अशा प्रकारचा ठरावच करण्यात आला आहे या ग्रामसभेचं आणि ठरावाचं कौतुक केलं आहे... ग्रामपंचायत ने केलेला ठराव सर्वांचाच लक्ष वेधून घेणारा ठरला आहे या ठरावाचं तरुणांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय गावात शिस्तीच्या दृष्टीने केलेले हे ठराव आगामी काळामध्ये खूप सकारात्मक बदल घडवणारे असतील अशा प्रतिक्रिया गावातील तरुणांनी आणि महिलांनी दिल्या आहेत... गावामध्ये शेती व्यवसायाबरोबरच अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यामुळे ग्रामस्थांचा वावर चांगला आहे वेगवेगळ्या कारणाने वाद-विवाद होतात मात्र यात शिवराळ भाषेचा वापर झाला तर किरकोळ वाद विकोपाला जाऊन मोठे भांडण होतात ग्रामपंचायत च्या ठरावामुळे या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे मात्र सर्व ग्रामस्थांनी केलेला ठरावाची जाणीव ठेवावी पाहिजे असं देखील काही ग्रामस्थांनी म्हटला आहे... कोळगाव येथील ग्रामपंचायत ने केलेला ठराव गावातील वातावरण शांत राहावं आपसातील संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे इतर गावांनीही ग्रामसभेमध्ये असे विकासात्मक ठराव केल्यास गावात निश्चितच सकारात्मक बदल होतील यात शंका नाही
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 10, 2026 10:46:30
Navi Mumbai, Maharashtra:इस्त्राइल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धाच्या या संघर्षामुळे भारतीय निर्यात मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून भारतातील सुमारे ४० ते ४५ हजार कंटेनर समुद्री मार्गावर तसेच परदेशातील बंदरांवर अडकून पडले होते. आता हे कंटेनर परत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या कंटेनरमध्ये अंदाजे १ ते १.५ अब्ज डॉलर किमतीचा निर्यात माल आहे. कंटेनर अन्य देशांकडे वळवावे लागले किंवा भारतात परत आणावे लागले, तर निर्यातदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, जो कंटेनर एक हजार डॉलर लागत होते तेच आता सहा ते सात हजार डॉलर भरावे लागत आहेत. जेएनपीटी बंदरात अनेक फळांचे आणि भाज्यांचे कंटेनर अडकून पडले आहेत. कंटेनर अन्य युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी आपत्कालीन व अतिरिक्त शुल्क लागू केले असून, त्यामुळे प्रति कंटेनर वाहतूक खर्च ३ ते ५ लाखापर्यंत वाढला आहे. कंटेनरमधील माल नाशविंत असल्याने निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. GNPT कडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार अशा कंटेनरवर ग्राउंड रेंट १००% माफ करावा आणि प्लगिंग चार्ज ८०% माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक्स्पोर्टचा माल लोकल मार्केटला आणला गेला तर निर्यातदारांचे ५०% नुकसान होईल असे दिसत असल्याने हा माल एक्स्पोर्ट कसा होईल याकडे निर्यातदारांचे लक्ष लागून आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 10:30:54
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में उद्योगांना गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांकडे असलेला गॅस साठा संपत आला असून तब्बल 30 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन आणि ब्यूटेन घरगुती वापरासाठी राखीव केल्याने उद्योगांना गॅस पुरवठा तातडीने थांबवण्यात आला. शेंद्रा, वाळूज आणि चित्तेगाव औद्योगिक वसाहतींमधील सुमारे 30 कारखान्यांकडील साठा संपत आला असून येणाऱ्या दोन दिवसांतच टाळे लावले जाऊ शकते. उद्योगांमध्ये ऑटो, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांवर परिणाम होतोय. उद्योजकांनी मुख्यमंत्री भेटीची तयारी केलीय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 10:21:07
Akola, Maharashtra:अकोला शहरात पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणाला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील बाळापूर नाका परिसरात ही घटना घडली. गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर काही तरुणांनी पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या शुभम झुंज याला फायर सिलेंडर, दगड आणि लाठीकाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार संबंधित कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मारहाणीच्या वेळी जातिवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जखमी तरुणाने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयित आरोपी पक्षाकडूनही प्रतितक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारींवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 10, 2026 10:18:21
Dhule, Maharashtra:धुळे जिले में गैस सिलेंडर उपलब्ध न मिलने से होटल बंद करने की स्थिति आ गई है, जिसे हॉटेल मालिकों पर असर पड़ा है। इसलिए ये व्यवसायिक हताश हो गए हैं। गैस सिलेंडर की कमी के कारण धुळे जिले के होटल व्यवसायी भी बड़ी चिंता में हैं। गैस सप्लाई न होने से होटल चालू रखना संभव नहीं। आज शाम के बाद गैस सिलेंडर उपलब्ध न हो पाए तो होटल बंद रखने के अलावा विकल्प नहीं बचेगा—यह हॉटेल व्यवसायियों ने व्यक्त किया है। इससे होटल कर्मचारियों और मजदूरों के रोजमर्रा खर्च समेत होटल खर्चों पर दबाव पड़ेगा और होटल व्यवसाय पर संकट खड़ा होगा। कुछ जगह चूल्हों पर खाना बनाने की व्यवस्था भी अब देखने को मिल रही है। गर्मी के कारण चूल्हे पर पूरे होटल को चलाना संभव नहीं बताया गया है। शासन को तत्काल व्यवसायिक सिलेंडर की सप्लाई सुचारु करनी चाहिए, अन्यथा होटल कारोबार बंद करने के अलावा कोई विकल्प नहीं रहेगा—यह प्रतिक्रया है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 10:17:03
Chandrapur, Maharashtra:आखातातील युद्धामुळे देशभरात पॉली प्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा होणार आहे. पॉली प्रोपिलीन प्लास्टिक बॉल पेट्रोकेमिकल बाय प्रोडक्ट आहेत. या उद्योगाचा कच्चामाल असलेल्या या बॉल्सची निर्मिती पेट्रोकेमिकल कंपन्यांनी थांबवली आहे. केंद्र सरकारकडून तातडीने एलपीजी निर्मितीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्नरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा कच्चामाल तयार करण्यापेक्षा एलपीजी निर्मितीकडे सर्वांचा भर आहे. परिणामी देशभरातील पॉलिमर बॅग तयार करणारे उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे. कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सिमेंट- साखर आणि अन्नधान्य पॅकिंग करणाऱ्या उद्योगांवर होणार आहे. बॅग तुटवडयाचा पुरवठा साखळीवर परिणाम होणार असून ग्राहकांना यांची झळ सोसावी लागणार आहे, तर उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. संकटातील उद्योजकांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दखल देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 10:03:25
Akola, Maharashtra:आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे जगभरात इंधन टंचाईचे संकट निर्माण होताना दिसत आहे. त्याचा परिणाम आता देशासह राज्यातही जाणवू लागला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. अकोला शहरातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात व्यावसायिक सिलेंडरवर सध्या बंदी आणली आहे, जेणेकरून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहू शकेल. मात्र या निर्णयाचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे. अकोल्यात व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. येत्या एक ते दोन दिवसांत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होऊ शकतो. काही हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही हॉटेल असोसिएशनकडून देण्यात आला आहे. अकोला शहरात सुमारे 350 ते 400 हॉटेल्स आहेत तर सुमारे 400 सिलेंडर या व्यवसायिकांना रोज लागतात. मात्र आता व्यवसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांची चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 10, 2026 09:48:54
Nasik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - अमेरिका इस्राईल इराण युद्धाचा उद्योगांवर मोठा परिणाम... - नाशिकमध्ये LPG, PNG,MNGL चा मोठा तुडवडा... - अंबड - सातपूर येथील १०० पेक्षा जास्त कंपन्यांकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक... - आज दिवसभरात व्यावसायिकांवर कंपन्या बंद ठेवण्याची वेळ, एक दिवस पुरेल इतकाच गॅस उपलब्ध असल्याने व्यावसायिक चिंतेत... - गॅस पुरवठादारांकडून अनिश्चित काळापर्यंत पुरवठा होऊ शकणार नाही असे अधिकृत मेल उद्योजकांना पाठवले... - गॅसच्या तुटवड्यामुळे नाशिकच्या सातपूर आणि अंबडमधील छोट्या मोठ्या तब्बल २००-२५० कंपन्यांवर होणार परिमाण... - LPG गॅसमध्ये गेल्या दोन दिवसात प्रति किलो 36रुपयांनी वाढ, दरात वाढ झाल्याने व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 10, 2026 09:15:44
Nagpur, Maharashtra:2c ला CCTV विडिओ जोडला आहे नागपूर अनेकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नागपुरातील त्या पिसाळलेल्या म्हशीचा दहशतीचा CCTV विडिओ झी 24 तासवर आपण पाहू शकतो... महाल परिसरातल्या जुना हिस्लॉप कॉलेज ते भट सभागृह या दोन किलोमीटरमध्ये या म्हशीने 10 अनेकांना उडविले... यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला... अनेक गाड्यांच मोठ नुकसान झालेय .... या घटनेदरम्यान ही बेभान म्हैस छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुढे जाताना सीसीटीव्ही चित्रित झाली .. एरवी सकाळी साडेनऊ वाजता प्रचंड वर्दळीचा आणि वाहतुकीच्या या मार्गावर या बेभान झालेल्या म्हशीमुळे कोणतीच वाहने मुख्य मार्गावर दिसत नसल्याच सीसीटीव्ही दिसत आहे... या पिसाळलेल्या म्हशीच्या शिंगावर कपडेही दिसत आहे... यावरून या म्हशीन काही लोकांना उडवल्यानंतर ते कपडे शिंगावर अडकल्याचे शक्यता आहे.... या घटनेमुळे काल सकाळी महाल पासून भट सभागृहापर्यंत प्रचंड दहशतीच वातावरण होतं आणि मोकाट जनावरांचा प्रश्न अतिशय गंभीरपणे पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय
0
comment0
Report
Advertisement
Back to top