Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुले जिले में बरसात के नुकसान से किसान आंसू, सरकार से मदद की मांग

PPPRASHANT PARDESHI
Oct 05, 2025 18:01:02
Dhule, Maharashtra
धुळे जिले में परतीचे पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. कापूस उत्पादक शेतकरी तर रस्त्यावर आला आहे. गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत. परतीच्या पाऊसात ओला झालेला कापूस वेचून विकायला परवडत नाही, अशी स्थिती आहे. त्याच वेचणी झालेला कापूस कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या कापसाला तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. प्रशासन मात्र निकषांचा हवाला देत पंचनामेच करत नाहीत आणि लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाकडे फिरकायलाही तयार नाहीत.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 05, 2025 18:00:36
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील चिंचखेडा शेतशिवारात बिबट्याने एक शेळी व तीन बोकळावर हल्ला करून ठार केले आहे. तसेच देऊर बुद्रुक गावातील भैय्या नानाभाऊ पारधी याच्या घरात काही दिवसात देवाचा कार्यक्रम असून त्यांनी ७० ते ८० हजाराचे बोकळ कार्यक्रमासाठी आणलेले असून त्यांच्या मालकीचे चिंचखेडा शेतशिवारात पत्र्याच्या शेडमध्ये शेळी व तीन बोकळ बांधलेले होते. अचानक बिबट्या शेड मध्ये शिरला व हल्ला करत त्यांचा फडशा पाडून ठार केले होते. यात शेतकरी भैय्या नानाभाऊ पारधी यांचे मोठे नुकसान झालेले असून त्यांनी भरपाईचीदेखील मागणी केली आहे. यावेळी वन विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा देखील करण्यात आला होता. तसेच या घटनेमुळे देऊर बुद्रुक गावासह परीसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे. तसेच देऊर बुद्रुक गाव परिसरांमध्ये यापूर्वी बिबट्या निघाल्याच्या घटना देखील वारंवार घडल्या आहेत. तरी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी देऊर बुद्रुक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 05, 2025 18:00:19
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 05, 2025 17:02:26
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्ष प्रारंभाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने शहरातील पोलीस फुटबॉल मैदानातून शिस्तबद्ध पथसंचलन निघाले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मूळ गावी चंद्रपुरात झालेले पथसंचलन संख्येच्या संदर्भात ऐतिहासिक ठरले. कार्यक्रमाला संघाचे अ. भा सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेला वंदन, आणि शस्त्रपूजनाने कार्यक्रमाचा प्रारम्भ झाला. स्वयंसेवकांच्या सामूहिक व्यायाम आणि गितगायनानंतर केलेल्या संबोधनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सज्जन शक्तीच्या एकत्रीकरणातून भारताच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत असल्याचे प्रतिपादन प्रदीप जोशी यांनी केले.
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 05, 2025 16:16:59
Pandharpur, Maharashtra:विधान परिषेदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मनोमिलनाचे वेध लागले असले तरी आता ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नंतर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी अशा माणसांबरोबर युती होणार नाही म्हणजे नाही असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे रामराजेच्या संभाव्य मनोमिलनाच स्वप्न भंगणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतेच मनोमिलन करण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं होतं. मात्र एकतर्फी ही भावना असून चालत नाही समोरच्यामध्ये सुद्धा ही भावना असावी लागते. असे म्हणत आपले राजकीय विरोधक माजी खासदार रंजीत सिंह आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. यावर पहिल्यांदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वेळ निघून गेल्यानंतर रामराजे यांना म्हणून मनो मिलनाचे वेध लागले आहेत. असे म्हणत अप्रत्यक्ष एकत्र येण्याला नकार दिला होता. यानंतर माजी खासदार रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना नडणाऱ्या व्यक्तीच्या सोबत और पाठीमागे मागे जायचं नाही. कुठलीही अनैसर्गिक युती होण्यार नाही असे म्हणत राम राजे यांच्या सोबत मनोमिलन होणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे.
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 05, 2025 16:16:48
Nashik, Maharashtra:निवडणूक जाहीर झाल्यावर काहीही चर्चा करतात आम्ही तिघेजण आहोत समीकरणे मांडू, त्यावर काळजी करू नका आपल्या जबाबदारीवर फोकस करा जिंकून देण्याचे काम एकनाथ शिंदे करेल अव्वांवर विश्वास ठेवू नका ज्या जागा जिंकणार नाही त्या आपण निवडून दाखविल्या आहेत तुमच्या निवडणुका छोट्या आहेत विस्तृतपणे सांगत नाही अनेक उदाहरण आहेत कठीण निवडणूक आपण सोपी केली हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही नाशिकला अनेक कारखाने येणार आहे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली झाला आहे उद्योजक यायला लागले परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला आहे जीएसटी कमी झाल्याने महिलांना मोठा फायदा झाला जीवनावश्यक वस्तूंकी किंमत कमी झाली आरोपाला आरोपांने उत्तर देत नाही घटनाबाह्य सरकार, मुख्यमंत्री पद जाणार म्हणत होते पण मी विचलित झालो नाही कामाने उत्तर दिले, किती जळफळाट झाला त्यांना ज्याने बुथप्रमुख म्हणून काम केले तो मुख्यमंत्री झाला काहीही झालं का एकनाथ शिंदे पडलं का सरकार ? दुसरं ही सरकार आणलं विरोधी पक्षनेता करता येत नाही एवढं संख्याबळ मी त्यांना सांगितले चांगला ज्योतिषी तर बघायचा आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे जनतेने दाखवून दिले बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हा आम्ही उठाव केला शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तेव्हा आम्ही विचार केला त्यांनी किती किस पाडून पाडून वीस आले ? आपण किती लढलो आणि किती आले बघा आपला खुर्चीचा अजेंडा नाही त्यांनी खुर्ची पायी सगळं घालवलं लोकांच्या समस्या काय आहेत हा आपला अजेंडा आपल्याकडे विचार आहेत विकास, विचार आणि विश्वास आपली त्रिसूत्री नाशिकमधील खड्डे बद्दल अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही पगार कसला घेतात ? सेवा देण्याचा ना जो काम करेल त्याचा आम्ही सन्मान करू महापालिका माझ्या अंडर येतात खड्डेमुक्त नाशिक केल्याशिवाय राहणार नाही सिडकोच्या जागेबाबत फ्री होल्ड करून टाकू ज्यांनी काम केले नाही त्यांना तडाखा बसलाच पाहिजे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आपलं काम सुरू झालं पुढील २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त केली जाईल एवढं वर्षे त्यांना कुणी अडविले अभ्यासिका, व्यायाम शाळा बंद आहे म्हणे नाममात्र भाडे करून सुरू करा असे सांगितले वास्तू सुरू करा अशा सूचना दिल्या मी एकदा आणि दोनदा सांगतो नंतर सांगत नाही शेवटी बांधीलकी लोकांशी आहे पूर्ण ताकदीने काम करा आपलं प्रगती सरकार आहे स्थगिती सरकार नाही महायुतीला गालबोट लागेल असे बोलू नका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आपल्याला नाय द्यायचा वार्डाचे समीकरण बघा, आमची टीम काम करत आहे तुमची आणि सर्व्हेची माहिती बरोबर असली पाहिजे विधानसभा जिंकली म्हणजे लढाई संपलेली नाही पण पुढील निवडणुका जिंकणे सोपे होईल कार्यकर्ते निवडणूक संपल्यावर नावडते होता कामा नये तो कायम आवडता राहिला पाहिजे त्याचे काय अपेक्षा असते संकटात मदत लागते कधी पोलीस स्टेशन, कधी कोर्ट बाकी काय असते मुख्यमंत्री असताना पाणी नाही म्हणून फोन आले मी wrong नंबर नाही म्हंटलो माहिती घेऊन तिथल्या माणसाला दिला आणि काम कर म्हणून सांगितले बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी दिलेली शाखा न्यायमंदिर आहे लेक लाडकी तशी सून लाडकी राबविली वैष्णवीच्या घरी आम्ही गेलो होतो तेव्हा त्या म्हणाल्या होत्या दिघे साहेब असता तर चटकन न्याय मिळाला असता पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करतो बघतो करतो असे नाही लगेच निर्णय घेतला तो टोल वसुलीचा निर्णय कायमचा बंद केला
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 05, 2025 15:45:43
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 05, 2025 15:19:57
Virar, Maharashtra:*सफाळे–विरार रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली* *क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन निघालेली रो-रो बोट म्हारंबळपाडा जवळ अडकली* 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहने अडकली दोन तासांपासून बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा پाईप तुटला* दोन ते अडीज तासांन्तर अडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश अँकर -सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात तब्बल दोन तास अडकली होती. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा अधिक — तब्बल 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा अधिक वाहने या बोटीत होती. अचानक बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याने ही बोट समुद्रातच थांबली. गेल्या दोन तासांपासून प्रवासी आणि वाहनधारक समुद्रातच अडकून होते, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करून, कोस्टगार्ड आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर समुद्रात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे .. बाईट२- रो रो सेवेतील अडकलेले प्रवासी
6
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 05, 2025 14:31:46
Virar, Maharashtra:अँकर -सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली आहे. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा अधिक — तब्बल 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहने या बोटीत होती. अचानक बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याने ही बोट समुद्रातच थांबली. गेल्या दोन तासांपासून प्रवाशी आणि वाहनधारक समुद्रातच अडकून आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून, कोस्टगार्ड आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 05, 2025 14:16:12
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार में खड्डों के विरोध में बहुजन विकास आघाड़ी आक्रामक हुई है... विरार के पालिका मुख्यालय के बाहर आज बहुजन विकास आघाडी के हजारों कार्यकर्ताओं ने सड़क के खड्डों के विरोध में आंदोलन किया.. इस मौके पर बहुजन विकास आघाडी के सर्वेसर्वा और पूर्व विधायक हितेंद्र ठाकूर, पूर्व विधायक क्षितिज ठाकूर और पूर्व विधायक राजेश पाटील सहित कई पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे.. वसई विरार में भाजपा की सत्ता आने के बाद खड्डेमय सड़कों की मरम्मत नहीं हो रही है.. इसलिए कई लोगों की दुर्घटना में मृत्यु हो चुकी है और कई घायल हुए हैं.. फिर भी प्रशासन जाग नहीं रहा है, इसलिए पालिका प्रशासन के विरोध में बहुजन विकास आघाडी ने प्रदर्शन किया।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 05, 2025 13:04:07
Shirdi, Maharashtra:राधाकृष्ण विखे , जलसंपदा मंत्री आजचा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण होता सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आगामी सरस्वराजाने निवडणुकीत हाच आत्मविश्वास ऊर्जा देणारा ठरणार आहे अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे, आज अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल आहे, शेतकऱ्यांचे पाठीशी आम्ही उभे आहोत लवकरात लवकर सरकारकडून मदत मिळेल माझ्या भाजपच्या वाटचालीत अमित शहांचाच वाटा होता, त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो महत्त्वाचा होता यात अमित शहांची महत्त्वपूर्ण भूमिका है
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 05, 2025 12:52:47
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 05, 2025 12:52:35
Kalyan, Maharashtra:कल्याण–शील रस्त्यावर दररोज होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. डोंबिवली वरून शील रोड जाण्यासाठी लागणारे 5 मिनिटांचे अंतर दोन ते तीन तास थांबावं लागतंय. या विलंबामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. रस्त्यावरील सिग्नल व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे रस्ता सतत ठप्प होतोय. सिग्नल न चालणे, अर्धवट सुरू असलेले रस्त्याचे काम, आणि बेकायदेशीर पार्किंग — या तिन्हींचा परिणाम नागरिकांवर होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज नागरिकांनी रस्त्यावर उतरून बाईक रॅली काढली या वेळी या मार्गावर नागरिकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. आमच्या सहनशीलतेचा अंत झाला! रुग्णवाहिका तासन्‌तास अडकतात, मुलं शाळेला उशीर करतात, आणि आम्ही रोज कामावर उशीर पोहोचतो. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा, सिग्नल व्यवस्थित सुरू करा, अन्यथा पुढचं आंदोलन अधिक मोठं असेल! असे सांगत या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
1
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top