Back
धुळे महापालिका चुनाव: धर्म बनाम विकास की भीषण जंग शुरू
PPPRASHANT PARDESHI
Dec 27, 2025 17:31:33
Dhule, Maharashtra
धुळे महापालिकेची निवडणूक राज्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत वेगळी आणि चर्चेची आहे. वोट जिहादमुळे हा जिल्हा संपूर्ण देशात चर्चेत आला. विधान सभा निवडणुकीतही दोन धर्मांची उभी फाळणी मतदानात पाहायला मिळाली. त्यामुळे विकासाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरून धर्माच्या रंगात हि महापालिका निवडणूक रंगते का हे पाहणे रंजक असणार आहे.
धुळे महापालालिकेच्या ७४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या दोन वर्षापासन पालिकेवर प्रशासक राज आहे. त्याआधी या महापालिकेत भाजप स्वयंबळावर पहिल्यांदा सत्तेत आले होते. ७४ पैकी ५१ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलं होते, या दरम्यान शकडो कोटींच्या विकासाचा दावा भाजपने केला. सोबतच विरोधकांना आपल्या पक्षात घेत त्यांची ताकद कमी करण्याचा कामही भाजपने समांतर सुरु ठेवले. त्या फायदा लोकसभा निवडणुकीत होईल असं वाटत असताना विशिष्ठ समुदायाने , एकतर्फी मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र भाजपने हिंदुत्वाची री ओढणे सुरु केले असून, विकास आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावर भाजप निवडणूक लढेल असे चित्र आहे.
युती होताना दिसत नाही , त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर ५१ जागा जिंकू असा दावा करीत आहेत. भाजप राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीला घाबरला असल्याचा दावा माजी आमदार फारुख शहा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे निवडणुकीत रंगत आली असून भाजप कार्यकर्त्यांना शहा यांच्या वक्तव्यामुळे चेव आला आहे.
या सर्वांमध्ये एम आय एम देखील महत्वाची ठरणार आहे. अल्पसंख्यांक भागात एम आय एम ला मत मिळाली तर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडीचे गणित बिघडणार आहे. एम आय एम गेल्या काही निवडणुकांमध्ये निर्णयक भूमिकेत आहे.
शहराचा राजकीय इतिहास वैविध्यपूर्ण राहिला आहे. कधी तेलंगी घोटाळ्यात चर्चेत आलेले अनिल गोटे इथले आमदार होतात तर कधी एम आय एम चा आमदार अनपेक्षित निवडणून येतो. आता भाजपमय जिल्हा आहे त्याचा फायदा शहरात राजकीय स्थैर्यासाठी होती कि धुळेकर सत्ते विरोधात कौल देतात हे निवडणुकीत स्पष्ट होईल
एकंदरीत धुळ्याची निवडणूक नाराजांच्या पक्ष विरोधी कारस्थानामुळे जास्त गाजेल असं चित्र शहरात आहेत. एक अनार सौ बिमार अशी अवस्था असल्याने निवडणाऱ्यांचा मार्ग पक्षातील तिकीट न मिळालेले उमेदवार अवघड करतील.
प्रशांत परदेशी, प्रतिनिधी, धुळे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowDec 27, 2025 17:31:470
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 17:19:140
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 27, 2025 16:00:440
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 14:31:250
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 14:31:080
Report
ABATISH BHOIR
FollowDec 27, 2025 14:30:260
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 27, 2025 13:54:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 13:54:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 13:47:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 27, 2025 13:46:370
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 27, 2025 13:30:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 27, 2025 12:53:030
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 27, 2025 11:52:220
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 11:51:520
Report