Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळे नगरपालिका में विपक्षी नेता पद के लिए MIM बनाम NRC में भिड़ंत

PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 04:48:35
Dhule, Maharashtra
धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचे सत्ता स्थापन होणार असली तरी, विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? याची जास्त चर्चा होत आहे. कारण की भाजप नंतर दहा नगरसेवक असलेल्या एमआयएम ने विरोधी पक्ष नेतेपदी एम आय एमचा नागारसेवक विराजमान होईल असं दावा केला असतांना, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार फारुक शहा यांनी देखील विरोधी पक्षनेते पदाचा दावा केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 आणि शिवसेनेचे पाच नगरसेवक मिळवून सर्वाधिक संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगरसेवक विराजमान होईल असा दावा फारुक शहा यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सामना विरोधी पक्षनेते पदासाठी रंगेल असे एकंदरीत दिसून येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 05:46:09
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 22, 2026 05:45:45
Nagpur, Maharashtra:नागपूर - लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीवर हायकोर्टाची व्यक्त केली चिंता, जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. - हायकोर्टाकडून स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश, प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेता न्यायालयाची सुमोटो कारवाई. - सप्टेंबरपासून पाणीपातळीत सातत्याने वाढ, चार मुख्य स्रोत आणि झऱ्यांमधून सतत पाण्याचा प्रवाह. - १५ ते २० फूटांनी पाणीपातळी वाढल्याचा अंदाज, सरोवराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता. - नैसर्गिक रचना आणि जैवविविधतेस धोका संभवतो. - ॲड. मोहित खजानची यांची ‘अॅमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती, ७ दिवसांत सविस्तर जनहित याचिका सादर करण्याचे निर्देश. - भूजल तज्ज्ञ आणि तहसीलदारांकडून पाहणी, पाणी वाढीचे नेमके वैज्ञानिक कारण अद्याप अस्पष्ट. - सखोल वैज्ञानिक संशोधनाची गरज, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 22, 2026 05:36:40
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 22, 2026 05:36:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथे यात्रा महोत्सवात हजारोंची गर्दी, संत कोंडय्या महाराज यात्रेचे मुख्य आकर्षण असते अग्निकुंड प्रभावळ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव संतनगरी 'धाबा' येथे सूरु है. या महोत्सवातील मुख्य आकर्षण अग्निकुंड प्रभावळ असते. यात्रेत लालबुंद निखा-याने भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृध्द, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखा-यांची विधिवत पुजा केली जाते. आणि मग या निखा-यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सूरवात होते. मध्यरात्री सूरु होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सूरु असतो. भक्तीचा हा अद्भूत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र -तेलंगणा-आध्रप्रदेशातील भाविक गर्दी करित असतात.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 05:35:18
Washim, Maharashtra:वाशिम में यूरिया कृत्रिम कमी, किसानों ने सेवा केंद्रों पर आपूर्ति संकट का आरोप। रब्बी हंगाम में गहू व हरभरा पिकासाठी यूरिया अत्यावश्यक असताना अनेक कृषी सेवा केंद्रांवर खत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागणी करूनही शेतकऱ्यांना परत पाठवले जात असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. काही सेवा केंद्र चालकांनी जाणूनबुजून यूरियाची टंचाई निर्माण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन यूरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करून यूरिया उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 05:34:42
Akola, Maharashtra:अकोला ते मुर्तिजापूर दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस काम होत असल्याची गंभीर तक्रार पंचायत समिती सदस्य मंगला शिरसाट यांनी केली आहे. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हे काम स्वामी समर्थ इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी पुणे यांच्यामार्फत सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामापूर्वी खोदकाम केल्यानंतर त्यात मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र सांगळूद भागात सुरू असलेल्या कामात संबंधित कंपनीने गावातील गायरानाची मातीच मुरुमाऐवजी वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध दर्शवत ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी काही काळ काम थांबवले, परंतु रात्री त्या मातीवर मुरूम टाकून हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून ग्रामस्थांचा याला तीव्र विरोध आहे. यामुळे गावातील नागरिकांच्या रोषामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची राहील, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 22, 2026 05:33:31
Shirur, Maharashtra:पुणे जिल्हा परिषद निवडणणीत जुन्नर विधानसभेत दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आलेत तर भाजप शिंदेंची शिवसेना कॉग्रेस स्वबळावर निवडणूक लढतंय तर आंबेगाव विधानसभेत ठाकरेंची शिवसेना,शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढतीय... तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिंदे ची शिवसेना आणि भाजप एकत्र आले असून दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आलेत तर ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी वेगळी लढतीय... तर शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून शिंदेंची शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे स्वबळावरती निवडणूक लढत आहेत...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 22, 2026 05:15:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी तब्बल 746 अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या गणांसाठी 1289 इतके अर्ज दाखल झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 122 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षासह अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तुमि सर्वच पक्षांसोबत बंडखोरीचं आव्हानदेखील उभं राहायला आहेत 27 जानेवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे तर जत तालुका वगळता अन्य जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुती झालेली नाही, त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 22, 2026 05:00:58
Chandrapur, Maharashtra:अँकर:-- चंद्रपूर शहर मनपात निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षात महापौर पदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील युद्ध गेले काही दिवस अनुभवले जात आहे. दोन्ही गटांनी एकमेकांचे नगरसेवक उचलून नेत अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. अशा स्थितीत केवळ माध्यमांपुढे काँग्रेस पक्षातील वादाचे जाहीर प्रदर्शन होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मदतीने हा वाद तुर्तास शमला असल्याचे पुढे आले आहे. काल रात्री उशिरा हर्षवर्धन सपकाळ आणि हा विजय वडेट्टीवार यांच्यात संवाद झाल्याची माहिती असून यासंदर्भात खा. धानोरकर यांनाही सबुरीने घेण्याचा निरोप देण्यात आला आहे. सध्या तरी दोन्ही गटांची एकमेकांविरोधात नाराजी कायम असून तलवारी मात्र म्यान झाल्या आहेत. या संवादातून नक्की फार्मूला काय निघाला हे मात्र कोडे असले तरी ज्या गटाचा महापौर असेल त्याच्या दुसऱ्या गटाला स्थायी समिती तर मदत करणाऱ्या पक्षाला उपमहापौरपद दिले जाण्याची चर्चा आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 04:49:01
Washim, Maharashtra:अँकर: विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात नांदेड रेल्वे विभागाने मागील वर्षभरात कडक कारवाया करत महसूलात उच्चांक गाठला आहे वाशिम रेल्वेस्थानकाचा समावेश असलेल्या या विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमांतून ११.०६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.ही कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत २०२.२३ टक्क्यांनी अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर नियोजनबद्ध व अचानक तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या.यात ११४ फोर्ट्रेस चेक,१७ मॅसिव्ह चेक,७ मॅjis्ट्रेट चेक तसेच ११ स्पॉट चेक मोहिमांचा समावेश होता.याशिवाय संवेदनशील ठिकाणी अँम्बुश चेकिंग नियमितपणे घेण्यात आले.ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून तिकीट काढून प्रवास करण्याचे अहवान करण्यात आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 04:46:39
Dhule, Maharashtra:शहादा तालुक्यात महावितरणचा गंभीर हलगर्जीपणामुळे ऑक्सीजन वर असलेल्या आजोबाची प्रकृती चिंताजनक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वीज बिल भरूनही खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाने 50 किलोमीटर क्षेत्रातून आलेल्या अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. वीज पुरवठा नसल्यामुळे ऑक्सिजन वर असलेल्या आजोबाला सुरळीत ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती. दुसऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या ऐवजी रुग्णालयाच्या विद्युत पुरवठा खंडित केला गेल्याची सर्वांना सारवास नंतर करण्यात आली. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क केल्यानंतर देखील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. विद्युत पुरवठा नसल्यामुळे आम्हाला रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावा लागला असं डॉ.श्रीराम पाटील यांनी सांगितले. परिसरात एकही शासकीय रुग्णालय नसल्यामुळे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. सध्या दुसऱ्याकडून वीजपुरवठा घेऊन रुग्णांना उपचार देत आहेत तर, काही रुग्णांना शहादा येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top