Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर में शिवसेना के बैनर से महापौर बनने की अटकलें तेज
PNPratap Naik1
Jan 22, 2026 06:00:49
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरात शिंदे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागात हे बॅनर लागले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असताना शिवसेनेनं हे बॅनर लावल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापूर शहरातील कलेक्टर ऑफिस चौकातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 07:19:36
Washim, Maharashtra:अवैध सावकारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात आठ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वाशिम तालुक्यातील खरोळा गावातील मारोती विठ्ठल ठाकरे या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या घरावरही धाड टाकण्यात आली असून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केल्याने संबंधित शेती व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून तपासणी सुरू असून या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 22, 2026 06:46:03
Pandharpur, Maharashtra:Solapur जिले में जिला परिषद पंचायत समिति के चुनाव से पहले राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट को धक्का देते हुए कल्याणराव काळे ने भाजपा में प्रवेश कर लिया। शरद पवार के स्थानीय विधायक द्वारा AB फॉर्म नकार दिए जाने से काळे ने भाजपा की ओर रुख किया। जिला परिषद पंचायत समिति की चुनाव में फिर भाजपा में इनकमिंग शुरू हो रही है। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता कल्याण काळे के उम्मीदवारों ने अजित पवार गुट से नामांकन दाखिल किया था। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के पास आवेदन मांगा गया पर काळे को AB फॉर्म न मिलने से पक्ष-विकास के कारण वे भाजपा में गये। अभिजीत पाटील ने स्पष्टीकरण दिया कि काळे को AB फॉर्म मांगना चाहिए था नहीं, तो उन्हें फॉर्म कैसे देना।
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 22, 2026 06:31:55
Mumbai, Maharashtra:मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल चार दिवस झाले आहेत. पुढची प्रक्रिया सुरु झाली असून विविध राजकीय पक्षांची गट नोंदणी सुरू झाली आहे. आज मनसेचे ६ नगरसेवक नवी मुंबईतील बेलापूरच्या कोकण भवनात गट नोंदणीसाठी गेले आहेत. मनसेचे गट नेते यशवंत किल्लेदार यांच्या सोबत ५ नगरसेवक मिनी बसमध्ये नवी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे वरिष्ठ नेते सोबत आहेत. स्थानिक पातळीवर कल्याण डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आला. कोकणात काय झाले तेही विचाराधीन आहे. लकी ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झाला त्यावर पक्ष कारवाई करू शकतो, त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 05:46:09
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 22, 2026 05:45:45
Nagpur, Maharashtra:नागपूर - लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीवर हायकोर्टाची व्यक्त केली चिंता, जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. - हायकोर्टाकडून स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश, प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेता न्यायालयाची सुमोटो कारवाई. - सप्टेंबरपासून पाणीपातळीत सातत्याने वाढ, चार मुख्य स्रोत आणि झऱ्यांमधून सतत पाण्याचा प्रवाह. - १५ ते २० फूटांनी पाणीपातळी वाढल्याचा अंदाज, सरोवराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता. - नैसर्गिक रचना आणि जैवविविधतेस धोका संभवतो. - ॲड. मोहित खजानची यांची ‘अॅमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती, ७ दिवसांत सविस्तर जनहित याचिका सादर करण्याचे निर्देश. - भूजल तज्ज्ञ आणि तहसीलदारांकडून पाहणी, पाणी वाढीचे नेमके वैज्ञानिक कारण अद्याप अस्पष्ट. - सखोल वैज्ञानिक संशोधनाची गरज, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 22, 2026 05:36:40
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 22, 2026 05:36:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथे यात्रा महोत्सवात हजारोंची गर्दी, संत कोंडय्या महाराज यात्रेचे मुख्य आकर्षण असते अग्निकुंड प्रभावळ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव संतनगरी 'धाबा' येथे सूरु है. या महोत्सवातील मुख्य आकर्षण अग्निकुंड प्रभावळ असते. यात्रेत लालबुंद निखा-याने भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृध्द, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखा-यांची विधिवत पुजा केली जाते. आणि मग या निखा-यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सूरवात होते. मध्यरात्री सूरु होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सूरु असतो. भक्तीचा हा अद्भूत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र -तेलंगणा-आध्रप्रदेशातील भाविक गर्दी करित असतात.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 05:35:18
Washim, Maharashtra:वाशिम में यूरिया कृत्रिम कमी, किसानों ने सेवा केंद्रों पर आपूर्ति संकट का आरोप। रब्बी हंगाम में गहू व हरभरा पिकासाठी यूरिया अत्यावश्यक असताना अनेक कृषी सेवा केंद्रांवर खत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागणी करूनही शेतकऱ्यांना परत पाठवले जात असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. काही सेवा केंद्र चालकांनी जाणूनबुजून यूरियाची टंचाई निर्माण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन यूरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करून यूरिया उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 05:34:42
Akola, Maharashtra:अकोला ते मुर्तिजापूर दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस काम होत असल्याची गंभीर तक्रार पंचायत समिती सदस्य मंगला शिरसाट यांनी केली आहे. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हे काम स्वामी समर्थ इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी पुणे यांच्यामार्फत सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामापूर्वी खोदकाम केल्यानंतर त्यात मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र सांगळूद भागात सुरू असलेल्या कामात संबंधित कंपनीने गावातील गायरानाची मातीच मुरुमाऐवजी वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध दर्शवत ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी काही काळ काम थांबवले, परंतु रात्री त्या मातीवर मुरूम टाकून हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून ग्रामस्थांचा याला तीव्र विरोध आहे. यामुळे गावातील नागरिकांच्या रोषामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची राहील, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 22, 2026 05:33:31
Shirur, Maharashtra:पुणे जिल्हा परिषद निवडणणीत जुन्नर विधानसभेत दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आलेत तर भाजप शिंदेंची शिवसेना कॉग्रेस स्वबळावर निवडणूक लढतंय तर आंबेगाव विधानसभेत ठाकरेंची शिवसेना,शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढतीय... तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिंदे ची शिवसेना आणि भाजप एकत्र आले असून दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आलेत तर ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी वेगळी लढतीय... तर शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून शिंदेंची शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे स्वबळावरती निवडणूक लढत आहेत...
0
comment0
Report
Advertisement
Back to top