Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

परीक्षा केंद्र में शिक्षक ने छात्रा के साथ दुर्व्यवहार; निलंबन, कानूनी कार्रवाई शुरू

VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 03:04:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा ड्युटीवर असलेल्या या शिक्षकाने विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करून त्रास दिला. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगताच संतप्त नातेवाईकांनी परीक्षा केंद्र गाठले. संस्थाचालकांसमोर शिक्षकाने आपली चूक कबूल करताच, नातेवाईक आणि संस्थाचालकांनी त्याला चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याने इतरही विद्यार्थिनींना त्रास दिला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता अधिकृत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Feb 28, 2026 04:35:38
Beed, Maharashtra:खडकी देवळा येथील कानिफनाथ मंदिर परिसरात दरवर्षी भरत असलेल्या यात्रेत एक धक्कादायक व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. परंपरेच्या नावाखाळे तान्हुल्या बालकांना मंदिराच्या कळसावरून खाली फेकण्याची अघोरी प्रथा येथे आजही सुरूच आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये माहेरवाशिणींचा मोठा सहभाग असतो. मात्र दर्शनानंतर निष्पाप बालकांना उंच कळसावर नेले जाते आणि वरून खाली उभ्या असलेल्या चार व्यक्तींच्या हातातील चादरीत फेकले जाते. क्षणभर चादर हातातून निसटली, समन्वय बिघडला किंवा तोल गेला तर त्या चिमुकल्याच्या जीवाचे काय? या विचारानेच अंगावर काटा येतो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा म्हणजे बालकांच्या जीवाशी उघडपणे खेळण्याचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओलांडणारा हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हस्तक्षेप करावा, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.. परंपरेच्या नावाखाळ्या चालणाऱ्या अशा जीवघेण्या प्रथांना आळा बसणार का, की आणखी एखादा अनर्थ झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 04:35:19
Chandwad, Maharashtra:दिवसेंदिवस शेतीमालाचे घसरत असलेले दर ही शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब होत चालली आहे कांदा शेती परवडत नसल्याने नाशिकच्या चांदवड येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र सध्या भाजीपाला पिकाला देखील भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी टोमॅटो अवघा 100 ते 150 रुपये प्रति कॅरेट विकला जात आहे.एका कॅरेट मध्ये साधारण 15 ते 20 किलो टोमॅटो बसतात म्हणजे टोमॅटोला अवघा पाच ते सात रुपये किलोचा दर मिळत आहे यात उत्पादन खर्च देखील निघत नाही यासह उत्पादन केलेला टोमॅटो बाजारात विक्री करण्यासाठी घरातून पैसे द्यावे लागत असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे या संदर्भात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती मधून आढावा घेतला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 28, 2026 04:32:42
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर – दिल्ली विमानसेवा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य आणि प्राधिकरणाचे अधिकारांची बैठक झाली, यामध्ये कोल्हापूर दिल्ली विमानसेवा सुरू करण्याबरोबरच शिर्डी, गोवा, नागपूर, इंदोर, चेन्नई, विशाखापट्टणम , सुरत, अहमदाबाद , हैदराबाद, तिरुपती या मार्गावर देखील विमानसेवा लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्यासह इतर सदस्यांनी विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीत केली.
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Feb 28, 2026 04:32:33
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 04:31:51
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरात धानोरकर गटाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात खा. धानोरकर यांच्या भावनांचा स्फोट, मनपातील सत्ता समीकरणात हरल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या भावना, ' मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, पण एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच" ,असे केले। जाहीर अँकर:-- चंद्रपूरात धानोरकर गटाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात खा. धानोरकर यांच्या भावनांचा अखेर स्फोट झाला. मनपातील सत्ता समीकरणात हरल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि निवडक कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. ' मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, परंतु वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन,' अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. "दिल्लीत काँग्रेस नेत्या खा. प्रियंका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात." अशी खंत खा. धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केली. आशीष अम्बाडे
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 28, 2026 04:17:55
Satara, Maharashtra:सातारा शहर और उपनगर परिसरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरणारी दहशत याचा बिमोड करण्यासाठी भाजप कडून सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील विविध परिसरात काही टवाळखोर तरुण उघडपणे कोयते आणि इतर घातक Shस्त्र यांचा वापर करून दहशत माजविण्याचे प्रयत्न करत आहेत. या गुंडांच्या दहशतीमुळे महिला आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून शहरामध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करून सातारा शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करावा, अशी मागणी भाजपकडून निवेदनाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 28, 2026 04:16:49
Ahilyanagar, Maharashtra:Ahilyanagar के Daithane Gunjal क्षेत्र में दैठणे गुंजाळ और हिवरे बाजार में एक अज्ञात बीमारी से पिछले 14 दिनों में 26 गाएं मर चुकी हैं, 12 गाएं प्रभावित हैं, दूध व्यवसाय पर बड़ा प्रभाव पड़ा है. गाँव से लगभग 25 किलोमीटर दूर अहिल्यानगर शहर से Daithane Gunjal गाँव में लगभग एक हजार गाई दूध देती हैं, जिन्हें पिछले पंद्रह दिनों से किसी रोग ने घेर रखा है. रोग लगने के बाद गाय चार-पांच दिनों में मृत्यु के कंठ में पहुंच जाती है. मरने वालों की संख्या 26 बताई जा रही है और कई गाएं संक्रमित हैं. चरागाह से निकलने के बाद यह बीमारी अचानक गायों के शरीर में फैल रही है और वे जागा पर बैठी रहती हैं, पानी छोड़ रहे हैं और हाथ-पैर खंडित हो कर मर रही हैं. दूध उत्पादक किसान इन मौतों से डरे हुए हैं और विमा कवर नहीं रहने पर प्रतिपूर्ति की मांग कर रहे हैं. प्रभावित किसानों ने कहा है कि एक गाय पर कम से कम 70 से 75 हजार रुपये तक के नुकसान की भरपाई देनी चाहिए. शव परीक्षण और रक्त-टिशू नमूने पुणे स्थित पशुवैज्ञानिक विभाग और पशु रोग केंद्र को जांच के लिए भेजे गए हैं; नमूनों की जांच के परिणाम अभी उपलब्ध नहीं हैं. स्थानीय अधिकारी और पशुपालक सरकार से तुरंत सहायता की मांग कर रहे हैं ताकि दूध-उत्पादन प्रभावित न हो और किसानों को राहत मिल सके. इस घटना पर चिकित्सा-केंद्रों के कर्मचारी जांच कर रहे हैं और स्थिति के अनुसार कार्रवाई की योजना बन रही है.eda. लैलेश बारगजे, झी 24 तास अहिल्यानगर
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 28, 2026 04:16:00
Satara, Maharashtra:सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच दादासाहेब काळे यांनी हा उपक्रम राबवला. आंधळी-टाकेवाडी रोडवरील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांसह 500 हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या. थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि ढाल देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि बैलगाडा कमिटीने विशेष परिश्रम घेतले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 28, 2026 04:00:49
Washim, Maharashtra:RTÉ अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता पालकांना अर्ज करताना किमान दहा शाळांची निवड करणे बंधनकारक राहणार आहे. सन २०२६–२७ शैक्षणिक सत्रासाठी १७ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून प्रवेश लॉटरी पद्धतीने दिले जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात ९५ खाजगी शाळांनी नोंदणी केली असून २५ टक्के जागा आरटीई अंतर्गत राखीव आहेत. आतापर्यंत ७७५ पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा आरटीई पोर्टलवर दिसणार असून २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करता येणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 28, 2026 03:31:19
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 28, 2026 03:31:01
Nashik, Maharashtra:अज्ञात भामट्यांकडून तीन जणांना ९० लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्यााची घटना घडली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले. अँकर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी तीन जणांना ९० लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली. निलेश मधुकर भडके आणि प्रज्वल प्रभाकर देवकर यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने ऑक्टोबर २०२५ मध्ये संपर्क साधला व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळू शकेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर अज्ञात आरोपीने या तिघांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अज्ञात इसमाने रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ९० लाख ४७ हजार ७४४ रुपये आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन व इंटरनेटद्वारे जमा केले. मात्र बरेच दिवस होऊनही गुंतवलेल्या रकमेवर व्याजही नाही आणि मुळ रक्कमही मिळाली नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहे....
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 28, 2026 03:30:46
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये एका मुलासह तीन मुलींचे अपहरण.... अँकर शहरातील वेगवेगळ्या भागात एका मुलासह तीन मुलींचे अपहरण करण्यात आल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अपहरणाचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. आई वडील हे काल रात्री घरात झोपले होते. त्यावेळी मुलगी व शेजारच्या बिल्डींगमध्ये राहणारी मुलगी यांना अज्ञात इसमाने काही तरी आमिष दाखवून घराबाहेर बोलावले. या दोन्ही मुलींना कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अपहरणाचा दुसरा प्रकार द्वारका परिसरात घडला.मुलगा दुपारी १२ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी येण्यासाठी निघाला होता. त्यावेळी या मुलाला गाठून अज्ञात इसमाने त्याला अडवून त्याला कशाचेतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत अपहरण केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अपहरणाचा तिसरा प्रकार गंगापूर रोड येथे घडला. मुलगी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरी एकटीच होती. या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले. या पर्ढकऱणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top