Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

शॉर्ट-सर्किट से सोयगांव के सावळदबारा खेतों में भीषण आग, किसानों को नुकसान

VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर च्या सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत मका, गहू पिकांसह ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले असून अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचा फटका बसला आहे. महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Mar 22, 2026 04:17:55
Malegaon, Maharashtra:नाशिक के बागलाण तालुक्यातील सालोटा किल्ल्याच्या आगीत नुकसान झाले. जागतिक पातळीवरील UNESCOच्या यादीत समाविष्ट ऐतिहासिक साल्हेर व सालोटा किल्ल्यांस दो संशयितांनी आग लावल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. वन विभागाने आग आटोक्यात आणले व तातडीने दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. आग सालोटा किल्ल्यावर लागल्यानंतर शेजारील साल्हेर किल्ल्यावरही आग लागल्याने विविध जातीचे झाडे, वनौषधी, वनस्पती, गवत, लहान-मोठे वन्यजीव भस्म झाले. या वनक्षेत्रात गुराखींकडून मिळालेल्या माहितीनुसार किल्ल्यावर फिरायला गेलेले दोन अल्पवयीन मुले विडी ओडत असताना त्यांनी जळती काडी जागेवर फेकल्यामुळे आग लागली.
898
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 22, 2026 04:17:41
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सुमारे ४.९५ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अपूर्ण आहे.वाढत्या उन्हामुळे विहिरी कोरड्या पडत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.कामातील विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली असून येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून गावाला लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाईट : संजय काळे,ग्रामस्थ वनोजा बाईट : ज्ञानेश्वर मुखमाले, ग्रामस्थ वनोजा बाईट : संतोष खोरणे,ग्रामस्थ वनोजा
965
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 22, 2026 04:15:57
Yavatmal, Maharashtra:शेतात, मंदिरात किंवा जुन्या घरांच्या खोदकामावेळी अनेकदा जमिनीत पुरातन वस्तु आढळतात, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर गावात तर घराच्या खोदकामावेळी सोन्याचा हंडा मिळाला अशी जोरदार चर्चा पसरली. ग्रामस्थांनी तेथे प्रचंड गर्दी केली. खोदकाम करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोदकाम सुरू केले, मात्र निघालेल्या वस्तू या सोन्याच्या नव्हत्या तर तांब्या पितळीची भांडी जमिनीतून निघाली. प्रमोद कार्लेकर यांना घरकुल मिळाल्यामुळे त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना हे मातीत गाडलेले जुने पितळ आणि तांब्याचे भांडे सापडले. दरम्यान जमिनीत सोनेाचा हंडा असल्याची चर्चा झाल्याने, वडकी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व जमिनीतून मिळालेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या.
960
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 03:46:28
Amravati, Maharashtra:मेळघाटात भीषण पाणीटंचाई, मोथा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा; जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता. मेळघाटातील मोथा या सुमारे 1 हजार 433 लोकसंख्या असलेल्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सध्या 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळा वाढत असताना ग्रामीण भागात पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
1046
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:46:14
Bhandara, Maharashtra:*सिलेंडरसाठी रांगा, ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली गॅस इन्शुरन्स व पाईपची सक्ती....वरठीत नागरिक संतप्त...* भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे भारत गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून “मेंटेनन्स”च्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आधीच गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा सक्तीमुळे त्यांचा आर्थिक भार वाढत आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेत एजन्सी धारकांकडून ही पद्धत राबवली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
960
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:45:44
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील तीनही महसूल उपविभागांतील १०९ वाळू घाटांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलेली याचिका २० मार्च रोजी निकाली काढण्यात आली. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे याचिकाकर्त्यांचे आक्षेप फेटाळून लावत सर्व घाटांवरील वाळू उत्खननावरील स्थगिती हटविण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून, उत्खनन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, याचिका निकाली काढलेल्या या १०९ वाळू घाटांमध्ये घरकुलासाठी राखीव असलेल्या १२ घाटांचाही समावेश होता. या निर्णयामुळे जिल्हा महसूल विभागाने समाधान व्यक्त केले
987
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 22, 2026 03:45:33
1015
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:45:26
1026
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:31:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इराण- इस्रायल, अमेरिका युद्धाच्या परिणाम इंधन पुरवठ्यावर झालाय, केंद्र सरकारने ५ मार्चपासून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. यामुळे संभाजी नगर एमआयडीसीत गॅसवर उत्पादन घेणारे ७० टक्के लघु, मध्यम स्वरूपाचे उद्योग ठप्प झाले आहेत. या परिस्थितीत कंपन्यांनी कुशल कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी रोज कंपनीत बोलावून मशीन सर्विसिंगची कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, रेल्वेस्टेशन आणि ऑरिक मधील लघु, मध्यम व मोठ्या कंपन्यांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. यापैकी ४० ते ५० टक्के कंपन्यांना उत्पादनासाठी एलपीजी गॅसची गरज असते. या कंपन्यांना विविध कंपन्यांकडून कमर्शियल गॅस सिलिंडरचे कनेक्शन आहे, तर शेंद्रा ऑरिक आणि वाळूजमधील काही कंपन्यांना पाइपलाइनदारे गॅसचा परवठा करण्यात येतो. व्हेंडर कंपन्यांना मोठ्या कंपन्यांनी काही काळ त्यांच्याकडून गॅसचा पुरवठा केल्याने कंपन्या सुरू आहेत. मात्र आगामी काळात सगळं ठप्प पडण्याची चिन्ह आहेत...
1040
comment0
Report
Advertisement
Back to top