Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

संभाजीनगर में इस्लाम पार्टी की एंट्री, MIM के दबदबे को चुनौती

VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 02:48:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महानगरपालिका निवडणुकीत मालेगावमध्ये सत्ता स्थापन करून चर्चेत आलेल्या इस्लाम पार्टीने एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री केली आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळवल्यानंतर इस्लाम पार्टीचा आत्मविश्वास वाढला आहे. याच 'मालेगाव पॅटर्न'च्या धर्तीवर आता संभाजीनगर शहरात आपला विस्तार वाढविण्यासाठी पार्टीने कंबर कसली आहे. जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख यांनी संभाजीनगरमध्ये एक बैठक देखील घेतली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये संभाजीनगरमधील मुस्लिमबहुल भागात एमआयएमला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, एमआयएमला रोखण्यासाठी आता इस्लाम पार्टी मैदानात उतरली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 04:20:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : खरबूज पिकाचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक - सोलापूर जिल्ह्यातील खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक - खरबूज बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीने बोगस बियाणे विक्री केल्यामुळे खरबुजाचे पीक वाया गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार - खरबूज पीकाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची कृषी अधीक्षकांकडे मागणी. - खरबूज पीक बियाणे अनुवंशिक पद्धतीने न आल्यामुळे अनेक एकरावरील खरबूज पीक वाया गेले. - महागडे बियाणे खरेदी करूनही पीक फसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. - खरबूज पीक उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपयांचा खर्च आला मात्र खरबूज पिकातून केवळ 8 ते 10 हजाराचे उत्पन्न - सध्या बाजारात खरबुजाची 40 रुपये किंमत असतानाही या शेतकऱ्यांच्या खरबबूजाला केवळ 2 ते 5 रुपये भाव मिळत आहे - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित बियाणे उत्पादकावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. Byte : लखन माने (शेतकरी)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 04:17:51
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला वीस वर्षांची सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला वीस वर्षांची सक्त मजुरी तर दहा हजार रुपयांचा दंड - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला मोठी शिक्षा करत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय - आठ एप्रिल 2020 रोजी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रसाद देण्याच्या बहाण्याने तृतीयपंथीने 14 वर्षीय मुलावर केला होता लैंगिक अत्याचार - उशीर झाला तरी मुलगा घरी येत नसल्याने आईने पाहणे केल्यानंतर आरोपी नग्न अवस्थेत तर मुलगा विचित्र स्थितीत दिसून आला - घटनेचे गांभीर्य ओळखताच मुलाच्या आईने मंद्रूप पोलीस ठाणे गाठात केला होता गुन्हा नोंद - अखेर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला कडक शिक्षा सुनावलीय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 17, 2026 04:01:39
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये बेकायदेशीर वास्तव्याच्या आरोपांवरून भाजप आक्रमक; खडकपाडा पोलीस ठाणे येथे निवेदन. अनधिकृत वास्तव्य आढळल्यास कायदेशीर कारवाईचे पोलिसांकडून आश्वासन. कल्याण पश्चिमेतील काही हायप्रोफाइल परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहतात व चिकन-मटण विक्री, फेरीवाला तसेच घरेलू कामगार म्हणून कार्यरत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने खडकपाडा पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांना निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित व्यक्तींची कागदपत्रे तपासून बेकायदेशीर वास्तव्य आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील विविध गृहनिर्माण सोसायट्यांची बैठक घेऊन घरेलू कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी निवेदनाची दखल घेतली असून, शहरात अनधिकृतरीत्या राहणारे किंवा बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य करणारे आढळल्यास कायदेकारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 17, 2026 03:48:32
Latur, Maharashtra:लातूर .... स्किप्ट ::- शिवस्मारक यात्रेचे लातुरात आगमन... AC ::- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यातील eightही जिल्ह्यांमध्ये भव्य शिवस्मारक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे... या यात्रेचे आज दुपारच्या सुमारास लातुरात आगमन झाले... शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणांनी या यात्रचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले... या यात्रेत ५१ सजवलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळे असून, या अभूतपूर्व दृश्याने उपस्थित शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 17, 2026 03:47:37
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिला दूध उत्पादक संघ अर्थात गोळुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मार्च महिन्यात गोळुळचे रणांगण तापणार असून गोळुळ में महाविकास आघाडी के रूप में चुनाव लड़ू ऐसा घोषणा गोकुळ के नेता और कांग्रेस विधायक सतेज पाटील ने की है. सतेज पाटील के घोषणेमुळे गोळुळ दूध संघ में महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ऐसी सीधी भिड़ंत होगी जैसे दिख रही है.. पूर्व में गोळुळ में पॅनल प्रणाली से चुनाव होते थे, इसके बाद कांग्रेस नेता सतेज पाटील और राष्ट्रवादी के नेता मंत्री हसन मुश्रीफ ने एक साथ आकर गोळुळ में महादेवराव महाडिक की सत्ता उलट दी थी.. पर बाद में गोकुळ में गोकुळ चेअरमन नियुक्ति के अवसर पर मुख्यमंत्री ने हस्तक्षेप किया जिससे गोकुळ में राजनीतिक वातावरण बन गया. इसलिए इस बार गोळुळ के पंचवार्षिक चुनाव में महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जैसी सीधी लड़ाई देखने को मिलेगी।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 03:32:44
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड येथे श्री बागाजी महाराजांची यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. एकादशीपासून या यात्रेला प्रारंभ होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी कावडधारी भाविकांचे गावात आगमन होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात श्री बागाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. Yानंतर कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्रीनंतर मंदिर प्रांगणात गावातील लहान मुलांची मंदिरासमोर लोटांगण घालण्याची शेकोड वर्षांची जुनी परंपरा आजही जपली जाते. पंचक्रोशीतील भक्तगणही गावातून लोटांगण घालत आपली श्रद्धा व्यक्त करतात. लोटांगण घालणाऱ्या मुलांवर गावकरी पाण्याचा शिडकावा करतात. लहान मुलांवरील संकटे दूर व्हावीत आणि त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, या श्रद्धेतून ही परंपरा पार पडते. त्याचप्रमाणे श्री बागाजी महाराजांची रथयात्राही मोठ्या उत्साहात काढली जाते. महाराजांची मूर्ती रथात विराजमान करून गावकरी स्वतः रथ ओढत संपूर्ण गावात मिरवणूक काढतात. संपूर्ण परिसर ‘जय बागाजी महाराज’च्या घोषणांनी दुमदुमून जातो.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 17, 2026 03:32:23
Kolhapur, Maharashtra:Kop KMC Corporater Feed:- File Anc:-कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। भाजपाकडून तीन, शिवसेनेकडून दोन आणि काँग्रेस कडून तीन उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत। भाजपा आणि शिवसेनेकची नावे निश्चित झाले असून काँग्रेसने मात्र आपली नावे गुलदस्ता ठेवले आहेत। स्वीकृत नगरसेवकांसाठी इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला इच्छुकांना सांभाळताना कसरत करावी लागत आहे। यावर उपाय म्हणून भाजपने स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी सभा वर्षाचा निश्चित केला आहे, ज्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून बारा जणांना संधी मिळणार आहे。
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 03:31:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात सोलार कंपनीच्या बेजबाबदार कामामुळे शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान, तोंडाशी आलेला घास गेल्याने झी -24 तासशी बोलताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर. - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात सोलार कंपनीच्या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान - सोलार कंपनीच्या उभारणीसाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे मारण्यात येत असल्यामुळे उभी पिक नष्ट होण्याच्या मार्गावर - सोलार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान - सोलार प्रोजेक्टचे काम सुरू होत असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्या धुळीमुळे थेट शेती पिके उध्वस्त होत आहेत - तोंडाशी आलेला घास सोलार कंपनीच्या गलनाथ कारभारामुळे हिरवून गेल्याने झी 24 तास शी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर - जवळपास पावणेदोन एकरातील 10-12 लाख रुपये मिळवून देणाऱ्या कांदा बी उध्वस्त झाल्याने सोलार कंपनीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी - नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याची शेतकऱ्याने व्यक्त केली खंत
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 17, 2026 03:16:42
Beed, Maharashtra:बीड : महादेव मुंडे खून प्रकरणी उद्या दोघांची नार्को, तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार एसआयटी - परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती समोर येतेय. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने आता वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत उद्या दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्कोचाचणी पूर्ण झाली आहे. उद्या उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग केली जाणार आहे. त्यामुळे या चाचणीकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. ------ ग्राफिक्स • एसआयटीने सहा महिन्यांत केली 200 लोकांची कसून चौकशी. • 500 पेक्षा अधिक लोकांची केली कॉल डिटेल तपासणी • 12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या • आत्तापर्यंत वैज्ञानिक चाचण्या करण्यात आलेल्या या खून प्रकरणाचे महत्त्वाचे साक्षीदार असल्याची माहिती. •यात सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर खुनाचा उलगडा होण्याची शक्यता.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 17, 2026 03:15:22
Nashik, Maharashtra:दिवसा चायनीज गादीवर कुक अन रात्री दुचाकी चोरी नाशिकच्या आडगाव परिसरात दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर तसेच इमारतीच्या वाहनतळावर उभ्या केलेल्या दुचाकींचे हँडल लॉक तोडून गायब करणाऱ्या एका नेपाळ येथील युवकाला आडगाव पोलिसांनी अटक केलीये... संशयित नवीनपून तुरारमपून मगर हा दिवसा गोदाकाठी एका चायनीज दुकानावर स्वयंपाकी म्हणून नोकरी करायचा अन् रात्री दुचाकींची चोरी करत होता, असे तपासात समोर आले आहे. आडगाव पोलिसांच्या हद्दीत तपोवनातून साक्षी गणेश गोपाल मंदिर येथील रहिवासी असलेले फिर्यादी रामानंददास बैरागी यांची दुचाकीची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाला याबत छडा लावण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे सहायक अमृतधाम परिसरातून मगर यास ताब्यात घेत कसून चौकशी केली. यावेळी त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिलीये...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 03:01:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचा अध्यक्ष होणार आहे. मात्र पहिल्यांदा अध्यक्ष कुणाचा करायचा याचा निर्णय झाला नाही. सोमवारी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत पालकमंत्री संजय शिरसाट तसेच खासदार संदिपान भुमरे यांनी शिवसेनेची बाजू मांडली. तसेच किती सदस्यांच्या पाठिंबा शिवसेनेकडे आहे त्याची आकडेवारी सादर केली. छत्रपती संभाजीनगरात मनपात भाजपचा महापौर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष दिसल्यास युतीत सत्तेचे समान वाटप झाल्याचे दिसेल असा आग्रह धरलाय.. सुरुवातीला अडीच वर्षांसाठी अध्यक्ष पद हे शिवसेनेला मिळायला हवं तर महत्त्वाचे सभागृहही शिवसेनेला हवे अडीच वर्षानंतर हे सगळं भाजपाला देऊन आता जी भाजपाला मिळालं ते शिवसेनेला घेऊ अशा पद्धतीचे सत्ता नियोजन असेल अशीही चर्चा झाल्याचं कळतंय..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 03:01:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात निवडून आलेल्या नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक अधिकाऱ्यांच्या दालनात घुसणे, दरवाजाला लाथ मारणे, शिवीगाळ करणे, दादागिरी करणे असे प्रकार करत आहेत. अनेकजण तुम्हाला सभागृहात पाहून घेईन अशा धमक्याही देत आहेत, अशी तक्रार अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केलीय, याची दखल घेत अशा व्यक्तींवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागप्रमुख्यांच्या बैठकीत दिले आहेत.. साडेपाच वर्षांच्या खंडानंतर मनपा निवडणूक झाली. त्यात निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांत ५८ महिला आहेत. या सर्वांचा व त्यांच्या नातेवाइकांचा पुन्हा मनपा कामकाजात हस्तक्षेप वाढला आहे. काहीजण अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांवर ओरडणे, धमकावणे, टेबलावर हात आपटणे, असे प्रकार करत आहेत अशा तक्रारी आहेत...
0
comment0
Report
Advertisement
Back to top