Back
अकोला के रुईखेड में श्री बागाजी महाराज यात्रा भक्तिभाव से सम्पन्न
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 03:32:44
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड येथे श्री बागाजी महाराजांची यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. एकादशीपासून या यात्रेला प्रारंभ होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी कावडधारी भाविकांचे गावात आगमन होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात श्री बागाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. Yानंतर कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्रीनंतर मंदिर प्रांगणात गावातील लहान मुलांची मंदिरासमोर लोटांगण घालण्याची शेकोड वर्षांची जुनी परंपरा आजही जपली जाते. पंचक्रोशीतील भक्तगणही गावातून लोटांगण घालत आपली श्रद्धा व्यक्त करतात. लोटांगण घालणाऱ्या मुलांवर गावकरी पाण्याचा शिडकावा करतात. लहान मुलांवरील संकटे दूर व्हावीत आणि त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, या श्रद्धेतून ही परंपरा पार पडते. त्याचप्रमाणे श्री बागाजी महाराजांची रथयात्राही मोठ्या उत्साहात काढली जाते. महाराजांची मूर्ती रथात विराजमान करून गावकरी स्वतः रथ ओढत संपूर्ण गावात मिरवणूक काढतात. संपूर्ण परिसर ‘जय बागाजी महाराज’च्या घोषणांनी दुमदुमून जातो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 05:19:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:17:390
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 05:16:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:15:240
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 17, 2026 05:06:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:06:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:20:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:17:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 17, 2026 04:01:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 17, 2026 03:49:51Amravati, Maharashtra:पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पीडीएमसी रुग्णालयात आणि मुलींच्या वसतिगृहात शिरले पाणी; पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला जलमय, मध्यरात्रीची घटना
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 17, 2026 03:49:020
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 17, 2026 03:48:320
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:47:370
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:32:230
Report