Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

मराठवाड़ा की 5 महानगर पालिका चुनाव: महायुती असमंजस, अजित पवार ने लड़ने का संकेत

VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 03:00:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यात पाच महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी नांदेड आणि लातूर येथे निवडणूक होणार आहे ..या पाचही ठिकाणी अजून महायुती बाबत काहीही चर्चा झाली नाही शिवसेना भाजपचा चर्चेचा गुऱ्हाळ असूनही सुरूच आहे त्यामुळे युती होऊ शकली नाही , आज उद्या याबाबत घोषणा होईल असे नेते मंडळी सांगताय.. या पाचही ठिकाणी महायुतीतील प्रमुख भागीदार असलेलं ajit पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या चर्चेत सहभागी नाही, त्यांना सहभागी करून घेतलं नसल्याचा आरोप होतोय, अनेक ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन शिवसेना-भाजपच्या लोकांनी घेतले सुद्धा नाही अशाही तक्रारी आहेत.. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर मध्ये तर त्यांनी एकट लढण्याची घोषणा आधीच करून टाकली आहे इतर ठिकाणीही अजित पवारांचं गट एकटाच लढणार आणि आणि याबाबत आज ते घोषणा करण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मराठवाड्यात युतीत अजूनही आलबेल नसल्याचे चित्र म्हणावं लागेल....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 29, 2025 04:45:51
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 04:30:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सेप्टिक टँक साफ करत असताना गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या ईश्वरपूर नजीक असणाऱ्या पेठ येथे घडली आहे. पेठ येतील गावच्या हद्दीतील एका खाजगी कंपनीच्या सेप्टिक टॅंक साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी टॅंक मध्ये उतरलेल्या तिघा कामगारांचा ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्यादरम्यान घडली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला पाच जणांची प्रकृती ही बिघडली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सुरुवातीला सुभाष जाधव टँक मध्ये उतरले होते. मात्र टॅंक मधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच पडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन तानाजी जाधव हे टॅंक मध्ये उतरले मात्र त्यांनाही गुदमरल्याने त्रास होऊन ते जागेवर बेशुद्ध पडले. त्यानंतर कंपनीतील कामगार रंगराव माळी यांनी मदतीसाठी धाव घेतली. ते टॅंकमध्ये उतरल्यावर तेही अडकले. या तिघांनाही तातडीने उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, कामगारांच्याकडून परंतु यामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 29, 2025 04:18:23
Nashik, Maharashtra:डबर पुरवठ्याच्या नावाखाली दहा लाखांचा गंडा... मुंबईनाका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल... अँकर डबर पुरवठ्याचे आमिष दाखववत आगाऊ वीस लाख रुपये घेऊनही प्रत्यक्षात डबरचा पुरवठा न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित कार्तिक आव्हाड आणि संजीव आव्हाड यांनी आव्हाड मायनिंग कंपनीच्या नावाने डबर पुरविण्याची तयारी दाखवली होती. डबर मिळेल या विश्वासावर वीस लाख रुपये आगाऊ घेतले गेले.यानंतर सतत पाठपुरावा केल्यानंतर कंपनीच्या खात्यात केवळ दहा लाख रुपये परत जमा करण्यात आले, मात्र उर्वरित दहा लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही बांधकामाच्या ठिकाणी डबरचा पुरवठा करण्यात आला नाही, मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 29, 2025 04:16:47
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असताना जनावरांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. काही भागांत जनावरांच्या तोंडातून लाळ गळणे, खुरांमध्ये जखमा होणे तथा अतिसाराचे आजार आढळून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दूध देणारी जनावरे आजारी पडल्यास दूध उत्पादनावर ठेट परिणाम होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जनावरांना थंडीपासून योग्य संरक्षण द्यावे, त्यांना स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे, तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 29, 2025 04:04:57
Nashik, Maharashtra:जादा नफ्याचे आमिष दाखवून ८० लाखांची ऑनलाईन फसवणूक.... अँकर शेअर मार्केट ट्रेडिंगमधून जादा नफा मिळवून देण्यासाठीचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तींनी तब्बल ८० लाख १० हजार ६५० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विविध व्हॉट्सअप व टेलिग्राम क्रमांकांवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. स्वतःला शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवत त्यांनी ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे एकूण ८० लाख १० हजार ६५० रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 29, 2025 04:03:41
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात सीसीआयमार्फत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र ‘कपास किसान’ मोबाईल अ‍ॅपद्वारे करावी लागणारी नोंदणी आणि अत्यल्प वेळेत होणारे स्लॉट बुकिंग यामुळे अनेक शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहत लागतं आहे. मानोरा तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मंजूर झाले असले तरी कापूस विक्रीसाठी अ‍ॅपवर नोंदणी बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे किंवा अ‍ॅप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यातच दर शनिवारी केवळ पाच मिनिटांसाठीच स्लॉट बुकिंग उपलब्ध करून दिले जात असल्याने अनेक शेतकरी स्लॉट मिळवू शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असून,सीसीआयकडून खरेदी न झाल्यास हमीभाव व भाव फरकाच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जातअसल्यामुळे स्लॉट बुकिंगसाठी दिलेला वेळ वाढवावा आणि प्रक्रिया अधिक सुलभ करावी,अशी मागणी कापूस शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 29, 2025 04:03:17
Buldhana, Maharashtra:केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीला अपघात... केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला. या कार मध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतาปराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक असे तिघे गंभीर जखमी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. गंभीर जखमींना वाशीम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा अपघात घडल्याने याबद्दलची माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आली.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 29, 2025 04:03:09
Amravati, Maharashtra:3 जनवरीला बच्चू कडू यांचा चंद्रपूर येथे भव्य आक्रोश मोर्चा; शेतकऱ्याच्या किडनीचा हिशोब घेण्यासाठी बच्चू कडू आक्रमक चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता या प्रकरणी बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून येत्या 3 जनवरीला बच्चू कडू चंद्रपूर येथे भव्य आक्रोश मोर्शा काढणार आहे. कर्जापाई किडनी विकणाऱ्या रोशनच्या घरापासून हा मोर्चा निघणार आहे. मानवी अवयवाची तस्करी झाली आहे यावर संशोधन झाले पाहिजे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात एक समिती असले पाहिजे रोशन ला जे 74 लाखाणे लुटल्या गेलं त्याला ते 74 लाख परत मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या विदर्भात जर असं होत असेल तर मग इथले भय संपत का नाही? ह्या सगळ्या घटना थांबत का नाही? हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही लाँग मार्च आक्रोश मोर्चा काढत आहे जोपर्यंत निर्णय होत नाही व पैसे मिळत परत मिळत नाही तोपर्यंत त्या आक्रोश मोर्चाची धग कायम राहील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला है. बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 04:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर, अमली पदार्थांची तस्करी आणि मतदारांना प्रलोभने देण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागांत आणि प्रवेशद्वारांवर 'स्थिर पथके' तैनात करण्यात आली आहे. ही पथके चोवीस तास कार्यरत राहून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. ​स्थिर पथक हे प्रामुख्याने चेक पोस्टवर तैनात असते. या पथकामध्ये एका कार्यकारी दंडाधिकाऱ्यासह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. या पथकाची मुख्य जबाबदारी म्हणजे बेकायदेशीर रोकड, दारू, शस्त्रे आणि मतदारांना वाटण्यासाठी आणले जाणारे भेटवस्तू रोखणे. प्रत्येक तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे या पथकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. शहराच्या सीमावर्ती भागातील नाक्यांवर ही पथके तैनात करण्यात आली असून, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 29, 2025 03:50:59
Washim, Maharashtra:अँकर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे तीन लाख महिला लाभार्थी असून, त्यापैकी अजूनही ३५ ते ४० हजार महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची कमतरता तसेच माहितीअभावी अनेक महिलांना अद्याप ई-केवायसी करता आलेली नाही. मुदत संपल्यास या महिलांना दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top