Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

छत्रपति संभाजीनगर में आज धुंध, मंगलवार को बारिश की संभावना; तापमान 16-29°C

VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर  शहरात हवामानाचा लपंडाव सुरू आहे, आज उद्या सकाळी शहरवासीयांना दाट धुक्याचा सामना करावा लागणार आहे, तर मंगळवारी शहरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील.बकिमान तापमान १६ अंश सेल्सियस. तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहराच्या काही भागात हलका पाऊस किंवा रिमझिम पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात किंचित घट होऊन पारा २८ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, हा पावसाळी प्रभाव केवळ एक दिवसापुरताच मर्यादित असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शहर परिसरात किमान तापमानात वाढ होत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान १६ ते १७ अंशावर जाऊन तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jan 26, 2026 07:01:36
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.आठ दिवस चालणारी ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.वाशीम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील विविध ग्रामीण भागातील हजारो शेतकरी दरवर्षी या यात्रेला उपस्थित राहतात आणि नाथ नंगे महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात.या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनीत विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञान,नवीन पिके, सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती,कृषी अवजारे यांची माहिती देण्यात येत आहे.यासह महिला बचत गटांनी आपली विविध उत्पादने कृषी प्रदर्शनीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनसह नागरिक मोठ्या संख्येने या प्रदर्शनीला भेट देत असून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आपल्या शेतीत उपयोग करून उत्पन्न वाढीसाठी मदत होणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं。
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 26, 2026 06:32:40
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव कॉलेज स्टॉपवर झाला स्फोट... - फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा झाला अचानक स्फोट.. - चार जण गंभीर जखमी, तर जखमीत 15 वर्षाच्या मुलाचाही समावेश... - मालेगाव कॉलेज स्टॉपवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रंगिबेरंगी फुग्यांमध्ये गॅस भरून वर आकाशात उडविण्यासाठी तरुण, महिला, लहान बालकांनी एकच गर्दी केली होती. त्याच क्षणी अचानक त्या सिलेंडर चा स्फोट झाल्याने दोन महिला, दोन पुरुष हे गंभीर जखमी झाले असून आता त्यांना उपरचार्थ नाशिक येथे हलविण्यात येत असून एक 15 वर्षाच्या मुलगा देखील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती समजताच युवासेनेचे अविष्कार भुसे यांनी रुग्णालयात धाव घेतली असून युवासेनेचेकार्यकर्ते यांनीदेखील मदत कार्य सुरू केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 06:32:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया... जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...... ON गणेश नाईक गणेश नाईक जे काही बोलत आहे, डायरेक्ट नाव घेणं त्यांना अवघड जात असेल वारंवार चॅलेंज करायचा प्रयत्न जर त्यांनी केला तर आम्ही देखील शांत बसणार नाहीत ON ZP बंडखोर जे बंडखोरी करणारे आहेत त्यांना समजून सांगू नाही ऐकले, महायुतीचे पक्षाचे नेते त्यावर निर्णय घेऊ ON धाराशिव तेथील शिवसैनिकांनी तक्रार केली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे ON भगतसिंग कोसारी भगतसिंग कोषारी यांना पद्मभूषण जो जाहीर झाला आहे, त्यांचा आम्ही स्वागत करतो ON NCP राज्यात आम्ही सोबत आहोत राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील गेले असेल, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आता बैठक होत आहे आणि त्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि विचार केला जाईल ON भारत हिरवा करू त्यांनी जे वक्तव्य केला आहे त्याचा प्रत्येक समाज घटकांना विरोध केला आहे असे वक्तव्य केल्यामुळे त्यांची चाल काय आहे हे लक्षात येते हा देश कुण्या एका जाती धर्माचा नाही, या देशाची संस्कृती जपण्याचे काम प्रत्येक भारतीय करतो म्हणून त्यांनी केलेले हे वक्तव्य मुसलमान समाजाला देखील आवडलेले नाही मस्ती आणि त्याच्यात असलेली गुर्मी आम्ही सर्वजण निश्चित काढू त्याामुळे किती आव्हान द्यायची ते दे एकदा जर आम्ही रस्त्यावर आलो तर पळता भोई थोडी होईल अशा पद्धतीने जातीवादी वक्तव्य कशासाठी करतोय,कसली मस्ती आहे तुम्हाला पाच-पन्नास नगरसेवक आले त्यामुळे का तुम्ही राज्यावर अतिक्रमण आक्रमण करणार आहात का? ही जी काही हैदराबादी चाल आहे ती महाराष्ट्रातील सर्व जनतेला कळालेली आहे असे वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ तो निर्माण करत आहे आम्ही तर विरोध करूच मात्र संघर्ष करायचे वेळ आली तर संघर्षही करू मुळात आम्ही तक्रार केलेली आहे जी नगरसेविका निवडून आली तिने माफी नामा सुद्धा दिला परंतु तिथे जाऊन तिला उचकवणे त्या वक्तव्यापासून पुन्हा घुमजाव करण तू हे भड़क विधान असेच राहू दे हे जे काही दबाव आणल्या जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 26, 2026 06:22:15
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे बाइट ऑन प्रजासत्ताक दिन एक भारतीय के रूप में हमारे सभी के लिए आज का दिन गर्व का है। हमने हमारे पड़ोसी देशों को देखते हुए यह निश्चित रूप से मानना चाहिए कि हमारे संविधान ने नागरिक बनने के नाते हमारा जीवन कितना सुखद बनाया है, हमारे अधिकार मिले हैं और हमारा भारत कितना मजबूत है, यही दिन मनाते समय हमें यह अनुभव होता है। इम्तियाज जलील वक्तव्य- जिन्होंने हमारे भारत देश में डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दी गई संविधान को स्वीकार न करने के बावजूद शरिया कानून लेकर लोकतंत्र समाप्त करना, इस देश को इस्लामीकरण कर इस्लाम राष्ट्र बनाना चाहता है, ऐसे किसी भी लक्ष्य की गया-धज शक्ल के खिलाफ हमारा मानना है कि देश के शीर्ष नेतृत्व तक कोई भी इन नज़रों से हमारा देश नहीं देख सकता। हमारे इतिहास में शिवाजी महाराज से संभाजी महाराज तक के इतिहास में इस्लामिक आक्रमणकारियों को महाराष्ट्र की भूमि में गाड़ दिया गया है। इस प्रकार के विचारों के विरुद्ध मैं श्रीमान मोहम्मद मोदीजी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी से समस्त देशवासियों के लिए यह स्पष्ट कर रहा/रही हूँ कि धर्मांतर सहित हिंदू धर्म को अपनाने से पहले देश की सुरक्षा, संस्कृति और सम्मान को प्राथमिकता दी जाएगी। बाइट- नितेश राणे पालकमंत्री
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 06:21:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात VIP कक्षात बसलेल्या एक नेत्यामुळं चर्चा सुरू झाल्या आहेत... शिंदे सेनेच्या या नेत्यांचे नाव विकास जैन आहे, मतमोजणीच्या दिवशी पोलीस आणि विकास जैन यांच्यात मतमोजणी केंद्रावर वाद झाला होता त्यानंतर पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये विकास जैन जखमी झाले असेही विकास जैन यांचं म्हणणं होतं मात्र पोलीस चौकशीनंतर विकास जैन यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर हल्ला करणे या गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हेच विकास जैन आज पोलीस मैदानावर आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अगदी पहिल्या रांगेत बसलेले दिसले , याबात पोलिसांनी मात्र आता सारवासारव सुरू केली आहे, सात वर्ष शिक्षेच्या असल्य हा गुन्हा आहे त्यामुळे अटक करायची गरज नाही त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि आजचा कार्यक्रम नागरी होता इथं कोण येणार कोण नाही याबाबत बंदी करता येत नाही असं पोलीस यांचं म्हणणं आहे तर पोलिसांनी योग्य तपास करावा आणि कारवाई करावी असा टोला उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.. रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त अंबादास दानवे, नेते उबीटी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Jan 26, 2026 06:19:10
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Jan 26, 2026 06:03:34
Yavatmal, Maharashtra:७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. पोस्टल ग्राउंडवर आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, यांचेसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पथसंचलन आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. सरकारचे शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य असून त्यादृष्टीने उपाययोजना व शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्या जात असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले。
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Jan 26, 2026 05:50:22
Shirdi, Maharashtra:सलग सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने साईचरणी नतमस्तक होत आहेत.याच दरम्यान साईंच्या झोळीत रोख रकमेसह सोन्या चांदीचे दानही देणगी स्वरूपात अर्पण करत आहे.अमेरिका येथील देणगीदार साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.नक्षिकाम असलेला हा सुवर्ण मुकुट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शगोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून,या सुवर्णजडित मुकुटाची किंमत सुमारे १ कोटी ०१ लाख ३८ हजार रुपये इतकी आहे.यावेळी संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्तांचा साईबाबांची शाल आणि मूर्ती देऊन सन्मान करण्यात आलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 26, 2026 05:49:49
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज मधील जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केलाय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाती कोरी आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. स्वाती कोरी ह्या जनता दलाचे माजी आमदार दिवंगत एडवोकेट श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि नगराध्यक्ष पद भूषिवलेल आहे. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपासोबत युती केली, तरी देखील एडवोकेट शिंदे मात्र अखेरपर्यंत समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहिले. पण त्यांच्या कन्या प्राध्यापक कोरी ह्या भाजप पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.. या पक्षप्रवेश सोहळा निमित्त बोलताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप आणि जनता दलाचा समाजवाद एकच असल्याचे सांगितले.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Jan 26, 2026 05:49:33
Amravati, Maharashtra:शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते अमरावतीत ध्वजारोहण; गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्द सत्कार अँकर :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दादा भुसे यांनी परेड निरीक्षण केले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंत बोथे याना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान जिल्ह्यासह राज्यातील शासकीय योजनांची प्रगती सरकारची कामगिरी यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रकाश टाकला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Jan 26, 2026 05:49:14
Pune, Maharashtra:देशभरात आज 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या विशेष बैंडसह पोलिस प्रशासनातील वेगवेगळ्या पोलिस पथकांनी आणि विद्यार्थ्यांनी संचालन केल. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पालकमंत्री विखे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
0
comment0
Report
Advertisement
Back to top