Back
चंद्रपुर के गडचांदूर में मतदाता सूची में 1906 नाम दो बार: प्रशासन शिकायत दर्ज
AAASHISH AMBADE
Oct 17, 2025 06:49:34
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील मतदारयादीत १९०६ मतदारांची नावे दोनदा आढळली आहेत. ही प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रकाशित करण्यात आली. राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना या प्रारूप मतदार यादीत गोंधळ असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्यात आली. प्रभाग १ मध्ये ३१२३ एकूण मतदारापैकी २४५, प्रभाग २ मध्ये १८२२ पैकी १४९, प्रभाग ३ मध्ये २३११ पैकी २०३, प्रभाग ४ मध्ये २६६४ पैकी २००, प्रभाग ५ मध्ये २३०० पैकी १४९, प्रभाग ६ मध्ये १८३१ पैकी १४२, प्रभाग ७ मध्ये ३०५७ पैकी २८२, प्रभाग ८ मध्ये ३१५७ पैकी २६९, प्रभाग ९ मध्ये १७५६ पैकी १३३, प्रभाग १० मध्ये २४३५ पैकी १३४ असे एकूण २४ हजार ४५६ पैकी १९०६ मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडचांदूर नगरपरिषद हद्दीत २३ हजार ९४६ एकूण मतदार होते. विधानसभा निवडणुकीनंतर ५१० नवीन मतदारांची नावे समाविष्ट झालेली आहे. काही मतदारांची दुबार नावे आहेत. तर काही मतदारांची तीनदा-चारदा नावे आहे. हा गोंधळ पुढे आल्यानंतर प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 17:05:320
Report
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 16:47:051
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 16:17:222
Report
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 16:16:373
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 15:45:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 19, 2025 15:45:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 15:45:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 19, 2025 13:43:500
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 19, 2025 13:15:462
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 19, 2025 13:07:424
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 19, 2025 12:36:543
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 19, 2025 12:31:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:242
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:264
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:220
Report