Back
चंद्रपूर में आरोप पर किशोर जोरगेवार की प्रतिक्रिया, राजनीति गरम
AAASHISH AMBADE
Feb 11, 2026 12:03:37
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया...
ऑन श्रेयवाद आरोप
मी कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, किंगमेकर चे बोर्ड कोणी लावले? झेंडे घेऊन कोण नाचत होतं? बाप तो बाप रहेगा हे गाणं कोणी लावलं? या राज्याचा बाप एकच आहे देवेंद्र फडणवीस
प्रयत्न कोणी केले? मी 16 तारखेपासूनच उबाठाच्या नेत्यांच्या संपर्कात होतो, सगळ्यांना विचारा फायनल डील कोणी केलं? तुम्ही तर गाव सोडून जबलपूरला चालले गेले होते, मी तर घरचा कार्यक्रम सोडून महापौर करण्याच्या भूमिकेत होतो, चंद्रपूरचा महापौर करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्याकडे दिली नव्हती, कुठे त्यांना जबाबदारी दिली होती ? काहीतरी सांगायचं, मला जबाबदारी... मला जबाबदारी... मग एवढं होतं तर थांबले का नाही चंद्रपूरला, कशाला गेले जबलपूरला? मारे सांगत होते आठ दिवस पहिले स्टॅम्प पेपर तयार आहे, राजकारणात स्टॅम्प पेपरला काही अर्थ असतो का ? इथे फ्लोर टेस्ट ला अर्थ आहे, डोक्यांना अर्थ आहे.
मी संख्याबळ जुळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मी संगीता खांडेकर यांच्या नावाने व्हीप काढला, त्यामुळे काँग्रेस दबावात आली आणि त्यांनी उबाठाला महापौर पद दिलं नाही,
वडेट्टीवार एका क्षणी उबाठाला महापौर पद देण्यासाठी तयार झाले होते मात्र मी काँग्रेस नेत्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उबाठाला कसं काय महापौर पद देऊ शकता आणि त्यानंतर मग वेणुगोपाल यांनी फोन केला आणि मग वडेट्टीवार दोन पावलं मागे गेले
उबाठा सोबत करार करताना मी तिथे होतो, तुम्ही कुठे होते ? करत कोण आहे हे धुरंदर... किंग मेकर... चाणक्य... केवळ आपण बाहेर राहायचं आणि कार्यकर्त्यांची निवडणूक वाऱ्यावर सोडून द्यायची, मी काल तीन दिवसानंतर महापौर झाल्यावर घरी गेलो
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया...
ऑन बेशिस्त वर्तन चौकशी
बिलकुल याची चौकशी झाली पाहिजे, आणि कारवाई पण झाली पाहिजे, माझा पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षात अशा गोष्टींची दखल घेतली जाते आणि कारवाई पण केली जाते, मला उमेदवारी मिळू नये म्हणून तुम्ही दिल्लीला गेलात, राजीनाम्याची धमकी दिली, मला उमेदवारी दिल्यावरही तुम्ही बिरजू पाझारे ला उभं ठेवलं, रसद पुरवली आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कसा पडतो यासाठी प्रयत्न केले आणि यावर मग कारवाई देखील झाली, आपल्या पक्षाला जिल्ह्यात मंत्री पद मिळालं नाही, ही तीच कारवाई आहे, पक्षाला अडचणीत आणायचं आणि मग मारे गोष्टी करायच्या, हे योग्य नाही, ते मोठे नेते आहेत त्यांनी मार्गदर्शन करावे, पण माध्यमांसमोर अशा प्रकारे पक्षाबद्दल संभ्रम निर्माण करू नये, इथे कुठलीच गटबाजी नाही, त्यांना गटबाजी करायची असेल तर करू द्या
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया
ऑन संदूरकर महापौर अर्ज
त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा सीसीटीव्ही फुटेज काढून बघावा, खांडेकर यांच्या अर्जासोबत काही झेरॉक्स कॉपी जोडल्या गेल्या नव्हत्या, काँग्रेसच्या लोकांमध्ये चर्चा होती की हा फॉर्म बाद होईल, वेळ कमी होता आणि त्या निघून गेल्या होत्या, म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून संदुरकर यांचा फॉर्म माझ्याच सांगण्यावरून भरण्यात आला, याची कल्पना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांना त्या क्षणी देण्यात आली. जर संदुरकर यांचा फॉर्म ठेवायचा असतो तर बारा तास 24 तास आधी कधी व्हीप निघतो का, त्यांनी सांगितलं महापौर माझा गटनेता जोरगेवारांचा अशी गटबाजी कधीतरी होते का? जोरगेवारनी कधीतरी गटबाजी केली आहे का? गटबाजी तुम्ही करता.... हॉटेलमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार ठेवला होता. तेव्हा आठ नगरसेवकांना गाडीत घेऊन कोणाला आलं होतं? 24 तुमचे आहेत मग 8 कशाला घेऊन आलेत? तुमच्या सोयीनुसार कार्यक्रम घेतला. 24 लोकांचे तुम्ही नेते आहेत. आणि आठ लोकांसाठी असं वागता का आठ लोकांना घेऊन भाजपचा विजय होतो का? तुमची महापौर व्हावं ही इच्छाच नव्हती, तुम्ही केवळ वेळ काढूपणा करत होते, संदूरकर चा फॉर्म ठेवला आहे बरं झालं ,कारण तुमची भाजपचा महापौर व्हावा ही पहिल्या दिवसापासून इच्छाच नव्हती. त्यासाठी तुम्ही योग्य पावलं टाकणं सुरू केलं होतं. चुकीच्या लोकांना उमेदवारी देण्यापासूनच तुम्ही याची सुरुवात केली होती, 28 लोकांना तुम्ही बंडखोरी करायला लावली. प्रायोजित बंडखोरी तुम्ही घडवून आणली. आणि तुमचे ते प्रायोजित बंडखोर काल नाचत होते, जे फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते? काय लावलं तुम्ही हे? तुम्हाला मी प्रदेशाध्यक्ष होतो हे सांगावं लागत आहे
ऑन एबी फॉर्म चोरी
काही लोक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले आहेत. म्हणजे आरोप करण्याच्या, त्यांना कोणीतरी आरोप करण्यासाठी पाहिजे असतं म्हणून त्यांनी आज माझ्यावर आरोप केले आहेत. 17 लोकांचे एबी फॉर्म चोरीला गेले असा त्यांचा आरोप आहे. या माध्यमातून आपला पक्ष कसा चुकीचं काम करतो हे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे 17 फॉर्म चोरीला गेलेच नाही, आज त्यांनी एक काम चांगलंय की ते गटबाजी करतात हे त्यांनी मान्य केले, ज्या लोकांची उमेदवारी बदलण्यात आली त्यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पक्षाची बदनामी करणारे ,नेत्यांची बदनामी करणारे आणि निवडून येऊ न शकणारे लोक होते, ज्या गुन्हेगाराला त्यांनी संरक्षण दिलं त्याला जनतेनेच पाडलं, त्यांनी हे सर्व आरोप नैराश्यापोटी केले आहेत, एबी फॉर्म चोरीला जातील आणि भारतीय जनता पक्ष चुपचाप असेल असं होईल का, सर्व नेते तिथे होते एक एक नाव डिस्कशन करून निर्णय घेण्यात आला आणि अशावेळी तुम्ही फॉर्म चोरीला गेले म्हणता म्हणजे हे लांच्छनास्पद आहे, आपण भाजपाचे मोठे नेते आहोत याचं भान तर ठेवलं पाहिजे, आपल्या पक्षाची यातून काय इमेज तयार होते याचा तर विचार केला पाहिजे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 07, 2026 02:31:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 02:01:070
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 02:00:470
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 02:00:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 07, 2026 01:18:400
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 01:18:150
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 01:17:200
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 01:17:030
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:18:46Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मनसेतर्फे भव्य आतिषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी भव्य आतिशबाजी पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:01:570
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 16:45:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report