Back
डव्वा ग्रामपंचायत में अविश्वास प्रस्ताव के बाद भारी हंगामा, पुलिस ने लाठीचार्ज
PTPRAVIN TANDEKAR
Oct 15, 2025 05:51:44
Bhandara, Maharashtra
डव्वा ग्रामपंचायतीत अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ... पोलिसांचा लाठीचार्ज! माझी वसुंधरा अभियानात देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या गावात तणावपूर्ण वातावरण गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीत काल मोठा गोंधळ झाला. माझी वसुंधरा अभियानात देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या गावात, महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. मात्र बहुमत न मिळाल्याने तहसीलदारांनी प्रस्ताव फेटाळला, आणि त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. स्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
डव्वा ग्रामपंचायत गोंदिया जिल्ह्याचं नाव देशपातळीवर नेणारे हेच गाव. मात्र, काल इथे घेतलेल्या ग्रामसभेत अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ उडाला. ग्रामपंचायतीत एकूण १२ सदस्य असून, सरपंचासह ८ सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने होते. परंतु प्रस्ताव पारित होण्यासाठी ९ सदस्यांचे बहुमत आवश्यक असल्याने तो अपयशी ठरला. प्रस्ताव फेटाळताच सभागृहात आणि बाहेर गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र परिस्थिती चिघळताच पोलिसांना लाठीचार्ज करून जमाव पांगवावा लागला. या घटनेमुळे डव्वा गावात एकच खळबळ उडाली आहे.
ज्या गावाने जिल्ह्याला देशपातळीवर पोहोचवलं, त्या गावातच आता राजकीय वादामुळे तणाव निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर डव्वा ग्रामपंचायतीची चर्चा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात रंगली आहे. डव्वा ग्रामपंचायतीत झालेल्या या गोंधळानंतर प्रशासन सजग झालं असून, पुढील ग्रामसभा सुरळीत पार पडावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 16:00:593
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 15:50:524
Report
HBHemang Barua
FollowOct 15, 2025 15:03:003
Report
AVArun Vaishnav
FollowOct 15, 2025 15:02:391
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 15, 2025 14:49:525
Report
JMJAVED MULANI
FollowOct 15, 2025 14:48:415
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 14:37:39Yeola, Maharashtra:येवला फ्लॅश
नाशिकच्या येवल्यात पावसाची संत धार. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अल्पशा विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात. शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण.
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 15, 2025 14:34:283
Report
KJKunal Jamdade
FollowOct 15, 2025 14:16:096
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:54:453
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 15, 2025 13:54:316
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 15, 2025 13:49:387
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:47:525
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 15, 2025 13:47:046
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 15, 2025 13:46:474
Report