Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा के भूमिगत गटर प्रोजेक्ट से नागरिकों को भारी परेशानी, कई जगह सड़कें गड्ढों में

PTPRAVIN TANDEKAR
Feb 24, 2026 03:35:33
Bhandara, Maharashtra
भंडारा शहरातील भूमिगत गटर योजनेच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रास.... जागोजागी रस्त्यावर खड्डे... भंडारा शहरात भूमिगत गटर पाईप लाईनचे काम सुरू असून ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. खासदार प्रशांत पडोळे यांनी सदर कामाची पाहणी केली. त्यात पिण्याचे पाण्याची पाईप कामादरम्यान जेशीबीने तोडली. गटर पाईप लाईनचे चेंबर सुद्धा तयार केलेले तुटलेले दिसून आले. तरी सुद्धा नगर परिषद चे मुख्य अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. त्यात फक्त मातीचा भरणा करत असल्याचेही दिसून आले. म्हणून जागोजागी खड्डे पडले आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे... म्हणून ह्या कामाची चौकशीची मागणी खासदारांनी केली आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 05:17:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कन्नडच्या नादरपुर शिवारात बिबट्याचा वावर; बिबट्या सीसीटिव्ही मध्ये कैद; ANC  कन्नड तालुक्यातील नादरपुर शिवारात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गावात  पाळीव कुत्र्यावर  बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली, ही संपूर्ण घटना शेतामध्ये लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटेच्या शांत वातावरणात बिबट्याने गोठ्याच्या परिसरात प्रवेश करून घातल्याचे स्पष्टपणे चित्रीकरणात दिसून येते. सकाळी ही घटना निदर्शनास येताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नादरपूर येथील शेतकरी दादाराव दत्तू निकम यांच्या शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे हे निदर्शनास आली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 24, 2026 05:04:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:साखर विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करत सांगलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या समोर कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील एका कुटुंबाने आंदोलन केले आहे. धरणे आंदोलन करत राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या महिला अधिकारी व पतीकडून संगनमताने दोन कोटी 87 लाखांची फसवणूक केल्याची आरोप करण्यात आला आहे. विक्रम पाटील नामक व्यक्तीने अधिकारी असणारया पत्नीच्या संगनमताने गणेश शुगरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप रणजीत जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडून या आंदोलनाची दखल घेत, योग्य ती चौकशी करून वरिष्ठांकडे याबतचा अहवाल पाठवला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान आर्थिक फसवणुकीचा आरोप झालेल्या विक्रम पाटील यांनी, रणजीत जाधव यांच्या आरोपांचा खंडन करत कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्यात आली नसून या आरोपांच्या बाबतीत कोल्हापूर न्यायालयामध्ये खटला सुरू असल्याचं स्पष्टीकरण विक्रम पाटील यांनी दिले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 24, 2026 05:03:42
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत 25 लाखांचा ऐवज लांपास केलाय, घरातील व्यक्तींना मारहाण करत 15 तोळे सोन्याचे दागिने तर 10 तोळे चांदिचे दागिन्यांसह काही रोख रक्कम हि चोरट्यांनी चोरून नेलीय. राजेंद्र कोरडे, नितीन कोरडे दिपाली कोरडे यांना मारहाण करत मुलांच्या अंगावरील दागिने हि ओरबाडून घेत मारहाण केलीय, चोरीचा हा थरार 20 मिनिटे सुरू होता, यात चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला तर चार चोरट्यानी बाहेरून दरवाजा बंद करत हा सशस्त्र दरोडा टाकलाय, दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खबर ATIचं वातावरण पसरलं असून या चोरट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 05:02:43
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 24, 2026 04:49:42
Amravati, Maharashtra:बोगस जन्म दाखल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी अमरावती महापालिकेत घेतली बैठक सापडली वादाच्या भोवऱ्यात; सोमय्यांना बैठक घेण्याचा अधिकार आहे ka काँग्रेसचा सवाल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावतांनी आयुक्तांना पत्र देत बैठकीची वैधता आणि कायदेशीर आधार या मुद्द्यांना घेऊन खुलासा मागितला आहे. स्पाइनलॅस ऍडमिनिस्ट्रेशन' म्हणत काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी महापालिका आयुक्त सौम्य चांडक यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. अमरावती महापालिकेत किरीट सोमय्या यांनी नियमबाह्य बैठक घेतल्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून महाराष्ट्रात हजारो माजी खासदार आहे ते अशी बैठक घेऊ शकतात का असा सवाल डॉ. सुनील देशमुख यांनी प्रशासनाला उपस्थित केला आहे. बैठक पूर्णतः असविधानिक, आणि आक्षेप घेणारी असल्याचेही डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्यांची बैठकीवरून महापौर आणि आयुक्तांमध्ये एकमेकांवर ढकलाढकली सुरू आहे, असंही सुनील देशमुख म्हणाले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 24, 2026 04:34:21
Beed, Maharashtra:बीड : वडवणी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाका; रब्बी पिकांचे मोठे नुकसान.. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा आमदार प्रकाश सोळंके फोन कट केला, व्हिडिओ व्हायरल..! बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगर पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. चिंचवण परिसरातील सोनाखोटा, पिंपळटक्का, रुई पिंपळा, कोठारबन, चिखलबीड, पिंपळा येथे दुपारी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, टरबूज-खरबूज, कांदे आणि भाजीपाला अशी विविध पिके जमीनदोस्त झाली आहेत. नुकसानीचा पंचनामा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी थेट आमदार प्रकाश सोळंके यांना फोन केला. मात्र आमदार सोळंके यांनी फोन कट केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतीय. बाईट: नुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 24, 2026 04:30:42
Dhule, Maharashtra:आंतरराष्ट्रीय कंपनी में सुजलोन में अधिकारी दरोडेखोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला है। याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात कंपनी의 दोन अधिकारीوں का समावेश असून, अन्य सहा दरोडेखोर आहेत। या अधिकाऱ्यांच्या मदतीनेच दरोडेखोरांनी कंपनीत दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे या दोघांना अटक केली असून, उर्वरित साधनांचा शोध सुरू आहे। पवन ऊर्जा प्रकल्पात वापरला जाणाऱ्या कॉपर वायरचा दरोडा टाकण्यात आला होता। ही वायर अतिशय महागड्या दरात विकली जाते। पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 24, 2026 04:03:46
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंभोरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून 25 वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. प्रज्वल सोम ढेंगे असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल ढेंगे यांनी आंभोरा येथील पुलावरून उडी घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी तत्काळ अड्याळ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली आहे.या घटनेमुळे परसोडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे शोधकार्याला अडचणी येत होत्या
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 24, 2026 03:48:32
Shirur, Maharashtra:मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता पाच दिवसांत खराब; कारवाईची मागणी पुण्याच्या शिरूर तालुत्यातील गणेगाव दुमाला – बाभुळसर बुद्रुक दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात आलेला डांबरी रस्ता अवघ्या पाच दिवसांत खराब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, संबंधित रस्त्याची जाडी २० मिमी असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अत्यंत कमी जाडी आढळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांच्या कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय, दरम्यान, सरपंच दिपाली नागवडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित काम तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती दिली。
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 24, 2026 03:46:28
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा बिजवाई पिकाची लागवड करण्यात आली असून सध्या अनेक ठिकाणी कांदा पीक फुलरा अवस्थेत आहे. पीक चांगले बहरात आले असतानाच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. फुलरा अवस्थेत पाऊस झाला किंवा वातावरणात जास्त ओलावा राहिला तर रोगराई वाढून कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती वाटत आहे.आधीच शेतीचा खर्च वाढला असून अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस झाल्यास शेटकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते त्यामुळे बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 24, 2026 03:45:55
Satara, Maharashtra:सातारा - वाई येथील रोहित्रांमधील (डीपी) तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. मुकेश जाधव, अनिकेत बनसोडे, अर्जुन जाधव, रोहन घाडगे, विजय शिंदे, मनोज घाडगे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अनिकेत आणि अर्जुन जाधव यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धोम कॅनॉल परिसरात रोहित्रांचे नुकसान करून तांब्याच्या तारे चोरी करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गुन्ह्यांत संशयितांकडून ३०० किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन आणि पाच मोबाईल फोन असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top