Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड़ ग्रामपंचायत सदस्य ने पैसे नहीं मिलने पर पानी नहीं छोड़ने की धमकी दी

MMMahendrakumar Mudholkar
Feb 04, 2026 11:00:43
Beed, Maharashtra
बीड - जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या-ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्याचे वक्तव्य. - बीडच्या अंथरवण पिंपरी तांडा गावातील प्रकार. बीडमधील एका बेताल आणि किळसवाण्या वक्तव्याची... जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या असं म्हणत ग्रामपंचायत सदस्याने गावकऱ्यांना एकप्रकारे धमकी दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहुयात वाचाळवीर ग्रामपंचायत सदस्याची कहाणी...!! @@ हजाराच्या आतमध्ये लोकसंख्या असलेले हे अंथरवण पिंपरी नावाचे गाव... बीड शहरापासून दोन कोसावर असलेल्या या गावात पेयजल योजना मंजूर झालिये. त्याचे काम देखील झाले आहे. योजनेंतर्गत गावाला पाणी देखील मिळाले आहे. योजना पूर्ण झाले असताना देखील निधी मात्र अद्याप मिळाला नाही. आणि याच निधीवरून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दिनेश पवार यांची जीभ घसरली... आता मी तसा बोललोच नाही. व्हिडिओ मध्ये छेडछाड करून माझी बदनामी केल्याचा दावा दिनेश पवार यांनी केला आहे. बाईट: दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य.. @@ गेल्या दहा वर्षापासून गावात कोणीही घरपट्टी किंवा नळपट्टी देत नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीवर मोठा बोजा झाला आहे. त्याच अनुषंगाने मी ग्रामस्थांनी कर भरणा करावा अशी मागणी केली. मात्र माझा संपूर्ण व्हिडिओ न व्हायरल करता त्यामध्ये छेडछाड करून चुकीचे अर्थ काढत व्हिडिओ व्हायरल करून माझी बदनामी केली. याप्रकरणी मी रीतसर तक्रार करणार असल्याचेही दिनेश पवार म्हणाले.. बाईट: दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य.. @@ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदस्य दिनेश पवार यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली असली तरी त्यांनी केलेलं हे वक्तव्य किळसवाणेच आहे. जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या असं वक्तव्य करून नेमके गावाला काय पाजायचे होते हे मात्र त्यांनाच ठाऊक...!! महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 04, 2026 12:16:48
Pune, Maharashtra:Anchor: काल आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील पुणे-मुंबई लेनची वाहतूक तब्बल 20 तासांहून अधिक काळ पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की आडोशी बोगदा ते सोमाटणे दरम्यान सुमारे 50 ते 55 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची अक्षरशः उपासमार झाली. पाणी, चहा आणि अन्नासाठी वाहनचालकांची धावपळ उडाली होती. अखेर उर्से टोलनाक्याजवळील ‘कार्णीवल’ फूड मॉल वाहनचालकांसाठी एकमेव आधार ठरला. येथे चहा, पाणी व नाश्त्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. परिस्थिती इतकी गंभीर होती की कॅश काऊंटरवर कूपन घेतल्यानंतरही “आम्हालाच आधी खाद्यपदार्थ मिळावा” यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. दीर्घकाळ अडकून पडलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर थकवा, अस्वस्थता आणि नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित न राहता, महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 04, 2026 11:51:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज शिवसेनेला दाबू नका – गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा.... रेणापूरच्या कामखेड्यात शिवसेना नेत्याचं आक्रमक भाषण, राजकीय वातावरण तापलं.... AC :- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं आहे. शिवसेनेला दाबू नका… १०० दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही १० दिवस वाघासारखं जगून मरायला आलेलो आहोत, असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना खुलं आव्हान दिलं. इतकंच नाही तर, “जेल हे मर्दांसाठी असतं. मी वर्षभर जेलमध्ये राहिलो आहे. ३०७, ३०२, ३५१ मला सगळं पाठ आहे. आजही माझ्यासोबत पुढं-मागं पोलीस आणि मधे मी बसलोय, हाच आमचा रूबाब आहे,” अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत विरोधकांना ठणकावून इशारा दिला. या वक्तव्यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे. साऊंड बाईट :- मंत्री गुलाबराव पाटील
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 11:47:54
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीका दिलीप सोपल 6 वेळा निवडून आले मात्र यावेळेला गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते दिलीप सोपल हे अजात शत्रू आहेत. आमदार कसा असावा तरी सोपल साहेबांसारखा असावा. अनुभवी आणि कलाकार माणूस आहे. अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तोच कार्यकर्ता आम्हाला निवडून देतात. मी शिवसेनेचा प्रमुख असलो तरी कार्यकर्त्यामागे उभा राहणारा कार्यकर्ता आहे. सोपल साहेब मनापासून दोस्ती करतात आणि निभावतात देखील. 1971 साली रोजगार हमीसाठी तत्कालीन आमदार निंबाळकर यांनी इथे आंदोलन केले. त्यानंतर रोजगार हमीबाबत कायदा झाला आणि तो केंद्राने स्विकारला. आज मी इथे आलोय. वैराग तालुका कारावा ही मागणी आहे. मी मंत्रिमंडळात आहे त्यामुळे ती मागणी नक्की पूर्ण करेन. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 45 हजार कोटी खर्च येतो मात्र आम्ही ती सुरूच ठेवणार. कोणी माई का आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिलेय त्याचे काय? असा प्रश्न विचारतात. मात्र ते देखील आम्ही देणार. मुख्यमंत्री सोबत आमची एक बैठक झालीय. सोपल साहेब इतके वर्षे काम केलेय. समाजसेवा करताय तुम्ही संघर्ष पाहिलाय. वैराग अप्पर तहसील कार्यालय, जवळगाव धरणात पाणी सोडणे आणि बार्शी उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा या मागण्या आहेत. मी सुद्धा सरकारमध्ये आहे काळजी करू नका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीका. काही लोकं म्हणतात निधी कुठून आणणार. अरे हा एकनाथ शिंदे पण सरकार मध्ये मी आहे. विकासाकामे करताना दुजाभाव करत नाही. सर्वाधिक सह्या करण्याचे रेकॉर्ड असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नगरपंचायत मी दत्तक घेतो. आत्ता सांगा कोणती नगरपंचायत पाहिजे. ते खाते माझ्याकडे आहे. नगरपंचायतीला आचारसंहिता नाही. वैराग नगरपंचायतीसाठी तुम्ही 34 कोटी रुपयांचे निवेदन दिले. त्यातील पहिला टप्पा उद्याच देतो. नो चर्चा डायरेक्ट रिझल्ट... बघतो करतो, ठेवतो असलं काही नाही. दिलीप सोपल 7 वेळा निवडून आले. आता आठव्या वेळी देखील येतील मागील वेळी चूक झाली आता नाही होणार आम्ही सोपलांचा मान मरातब ठेवणार. SOUND BYTE : एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 11:07:39
Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांचाही भाजप नेतृत्वावर हल्लाबोल ...... रायगडच्या भाजपमध्ये आंधळे , बहिरे, मुक्यांचं राजकारण ....... रवींद्र पाटील यांचे घराणे संपवण्याचा विडा भाजप वाल्यांनी उचलला ...... आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला संशय ....... राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन शिवसेनेला बाजूला ठेवले ........ रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद सर्वश्रुत असतानाच आता शिवसेना आणि भाजप मधील दरीही वाढत चालली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असतानाच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्ह्यातील भाजप नेतृत्वावर तोफ डागली आहे. रायगडच्या भाजपमध्ये आंधळे, बहिरे आणि मुक्यांचं राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन आलेल्या नेत्यांनी शिवसेनाला बाजूला ठेवल्याचा आरोप आमदार दळवी यांनी भाजप नेते सतीश धारप यांचं नाव न घेता केलाय. आपण एकत्र येऊन असा प्रस्ताव मी आमदार रवींद्र पाटील यांच्या समोर ठेवला होता. पण भाजप मधील काही लोकांनी रवींद्र पाटील यांच्या घराण्याला संपवण्याचा विडा उचलला असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 11:03:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग अँकर - आमच्यासारखे 242 आमदार आहेत,म्हणून मुख्यमंत्री आहेत,असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे सांगलीच्या खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी केलंय,तसेच मुख्यमंत्र्यांना विचारा,सुहास बाबर कोण आहेत,असं चॅलेंज आमदार बाबर यांनी विरोधकांना दिलंय.सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केलं आहे.तसेच आपण काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा चालवतो,असं देखील आमदार बाबर यांनी सांगितले.विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले आहे. साऊंड बाईट - सुहास बाबर - आमदार- शिवसेना शिंदे - विटा-खानापूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 11:02:48
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 10:49:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील वैराग मधील महाआघाडीच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब - बार्शी तालुक्यातील वैराग मध्ये आज महाआघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्याने उद्धव ठाकरेंचा फोटो गायब केल्याची चर्चा - बार्शी तालुक्यात जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र - बार्शी तालुक्यातील ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतेय निवडणूक - मात्र दिलीप सोपल यांना आपल्याच पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि माशालीचा पडला विसर - भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना अशी होतेय निवडणुक
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 10:33:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना पोलिसांनी आज अचानक हद्दपारची नोटीस बजावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाच्या ऐन तोंडावर उमेदवाराच्या पतीला हद्दपारची नोटीस देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. नोटीस मिळताच उदय पाटील यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पराभवाच्या भीतीपोटी विरोधी उमेदवारांनीच पोलिसांवर दबाव टाकून ही हद्दपारची कारवाई करवून घेतल्याचाbola आरोप समर्थकानी केलाय
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 04, 2026 10:32:05
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत भाजपाला मोठा धक्का. नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र. 23ब च्या नगरसेवक पदाला न्यायालयाची स्थगिती. न्यायालयाने 12 फेब्रुवारी पर्यंत दिला तात्पुरता स्थगिती आदेश. नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी नायालयात केली होती याचिका दाखल. त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने घातली तात्पुरती स्थगिती पुढील सुनावणी होईपर्यंत स्वतःला नगरसेवक म्हणून सादर करू शकणार नाहीत रुपाली भगत नगरसेवक पदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज करू शकणार नाहीत रुपाली भगत असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top