Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपति संभाजीनगर चेतक चौक पर वृद्ध महिला से सोने की चेन छीन CCTV में कैद

VKVISHAL KAROLE
Nov 06, 2025 02:02:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरच्या चेतक घोडा चौक परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे, एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. घटनेदरम्यान महिलेचा तोल जाऊन त्या किरكوळ जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 06, 2025 03:36:06
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यात राज टेक आणि पार्श्विनी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण चार जणांचा मृत्यू बुडून झाला आहे. पारशिवनी येथे दोन तरुणांचा बुडून मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील पारशीवनी येथील भागीमहारी तलावात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण सह सहा मित्रमंडळींसह भागीमहारी तलावावर सुट्टीचा आनंद घेण्याकरीता आलेले होते. पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे आलेल्या मित्रांपैकी अविनाश आनंद (बिहारचा) पाण्यात पोहण्याकरीता उतरलेला होता. तो पाण्यात गटांगळ्या घेतांनी दिसताच इतर मित्र त्याला वाचविण्याकरीता गेले असता, त्यापैकी संकल्प मालवे (चंद्रपुर) हा पण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तर एका जणाला वाचविण्यात मित्रांना यश आले. या मृतकापैकी अविनाश आनंद हा प्रियदर्शी महाविद्यातील बी.ई तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता तर संकल्प मालवे हा सेंट पाॅल कनिष्ठ विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी होता. रिल बनवण्याच्या नादात ही घटना घडल्याची चर्चा आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 03:30:18
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्याचा रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा–भाचीचा मृत्यू.. - हर्षाली विनोद माकडे (१३, रा. भोजापूर-मानापूर) आणि अजय वामन लोहबरे (३३, रा. खात) अशी मृतांची नावे आहेत. - हर्षाली रबरी ट्यूबच्या मदतीने पोहण्याचा सराव करत होती. ट्यूब निसटल्याने ती पाण्यात बुडू लागली. - तिला वाचविण्यासाठी मामाने उडी घेतली, पण खोल पाण्यामुळे दोघेही बुडाले. - या घटनेदरम्यान हर्षालीचे वडील तलावाच्या काठीवरच उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. - या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेय.. - परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्याने तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 06, 2025 03:19:42
Akola, Maharashtra:अकोला शहरातील तिलक रोड परिसरात असलेल्या जेजे मॉलमध्ये मध्यरात्री तीनच्या sुमारास भीषण आग लागली. ही आग एवढ्या वेगाने पसरली की काहीच क्षणांत संपूर्ण मॉलला आगने वेढलं.आगीमध्ये लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मॉलमधील मोठ्या प्रमाणातील कपडे आणि इतर दुकाने आगीच्या तडाख्यात सापडली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाने अथक प्रयत्न करत काही तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.सध्या अग्निशमन विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून पंचनामा सुरू असून, आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचे स्वरूप तपासले जात आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 06, 2025 03:19:28
Washim, Maharashtra:आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने वाशीम जिल्ह्यात मोठी रणनीती आखली आहे. निवडणूक व्यवस्थापनात पारंगत नेते राजू पाटील राजे यांची जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन आणि संघटन कौशल्य दाखवत जिल्ह्यात दोन आमदार निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या यशस्वी कामगिरीच्या पार्श्वभूमीवरच पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राजू पाटील राजे यांचा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेले दृढ नाते आणि जिल्हाभरातील मजबूत संघटन जाळं यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल,असा पक्षांतर्गत विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 03:07:21
Shirdi, Maharashtra:Anc - कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बुधवारी संध्याकाळी अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने هल्ला करत ठार मारले. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. यावेळी भाजपचे युवानेते विवेक कोल्हे तेथे पोहोचले व त्यांनी वन अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच फायलावर घेतले.अनेक बिबटे फिरत असताना तुम्ही जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले. तुम्हाला मुरमाचे ट्रॅक्टर पकडून तोडी पाणी करायला वेळ आहे मग जनजागृतीचे कार्यक्रम का घेत नाही असं जाब विचारत कोपरगावचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी निलेश रोडे यांच्यावर विवेक कोल्हे चांगलेच भडकले. शेवटी दोन तास रास्ता रोको चालल्यानंतर वनविभागाच्या वतीने लवकरच नरभक्षक बिबट्याचं बंदोबस्त करण्यात येईल असा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 06, 2025 03:02:21
Satara, Maharashtra:सातारा- साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथील प्रसिद्ध असे श्री रामेश्वर मंदिर आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अडीच हजार दिव्यांनी उजळले. हे मंदिर क्षेत्रमाहूलीत 353 वर्षा पूर्वी बांधण्यात आले असून कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावरील या मंदिरात श्री रामेश्वर जीर्णोद्धार मंडळ यांच्या तर्फे मागील सात वर्षांपासून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 2500 दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळुन निघाला विशेष म्हणजे या परिसरात प्रथमच सामाजिक कार्यकर्ते कामेश कांबळे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक अशी आकाशातील फटाक्यांची आतिषबाजी ही डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. याबरोबरच या श्री रामेश्वर मंदिरावर आकर्षक असा लेझर शो हा देखील लक्षवेधक ठरला यावेळी श्री रामेश्वर मंदिरातही आकर्षक सजावट करण्यात आली होती हा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी सातारा शहरातून कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 06, 2025 03:01:36
Akola, Maharashtra:अकोला शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानक या मुख्य मार्गावरील राजमाता जिजाऊ सभागृहासमोर घाण पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या या सभागृहलगतची नाली चोक होऊन दूषित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असून, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर मार्गावर जिल्हा व सत्र न्यायालयासह अनेक शासकीय कार्यालये असल्याने हा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी संघटनांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ नालीची स्वच्छता, दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 06, 2025 03:01:06
Nashik, Maharashtra:त्रिपुरारी पोर्णिमा अर्थात देव दिवाळी देवतांच्या दिवाळी निमित्ताने नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दिपदानासाठी मोठ्या संख्येने भाविक रामकुंडावर जमले होते. देव दिवाळीच्या निमित्ताने गोदावरी घाट दिव्यांनी उजळून निघाला होता त्रिपुरारी राक्षसाचा वध म्हणून या दिवसाला देव दिवाळी साजरी करण्याची प्रथा असल्याने आजच्या दिवशी दीपदान केल्याने पुण्य प्राप्त होत असे देखील म्हटल्य जातं. आणि त्यामुळे दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या गोदावरीच्या तीरावर मोठ्या संख्येने भाविक या देव दिवाळीच्या निमित्ताने गोदावरी नदीत दिपदान करताना पाहायला मिळाले. रोज होणाऱ्या गोदावरी आरतीला देखील मोठी गर्दी झाली होती
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 06, 2025 02:50:16
Washim, Maharashtra:वाशीम: कार्तिक महिन्यानिमित्त पारंपरिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्तिक महिन्याच्या अखेरीस आणि काकडा आरतीच्या समाप्तीनिमित्त गावाच्या चौकात मंगलाष्टकांच्या गजरात तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह लावण्यात आला. या सोहळ्यात गावातील लहान मुलांनी साकारलेल्या वेशभूषा, नृत्य आणि उत्साहाने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. ग्रामीण भागात आजही संस्कृती आणि परंपरेचे जतन जिवंत असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. विशेष म्हणजे, गावातील नवी पिढीही ही परंपरा तितक्याच उत्साहाने पुढे नेत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 06, 2025 02:50:00
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 06, 2025 02:47:12
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात गुरु नानकदेवजी यांच्या ५५६ व्या प्रकाश-पर्वानिमित्त सिंधी समाजाच्या वतीने भव्य नगरकीर्तन व शोभायात्रेचे आयोजन उत्साहात पार पडले. श्री गुरुनानक जयंतीनिमित्त काढलेल्या या शोभायात्रेला cityातील सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सिंधी कॅम्प येथून पारंपरिक वेशभूषेत आणि गुरुवाणीच्या जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेले रथ, पताका, ढोल-ताशांचा गजर, कीर्तन मंडळे आणि गुरु परंपरेचे संदेश देणारी झांकी यामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरु नानक यांच्या शिकवणीचा संदेश दिला.या शोभायात्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे महिलांच्या सहभागातून संपूर्ण शोभायात्रा मार्गाची स्वच्छता मोहीम राबविल्याने.यावेळी गुरुवाणीचे पठण व ‘सर्व धर्मात एकता’चा संदेश समाजातील ज्येष्ठांकडून देण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्गांवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत शोभायात्रेचे स्वागत केले.या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे शहरात बंधुतेचा, शांततेचा आणि एकात्मतेचा संदेश जिवंत झाला. गुरुनानकदेवजी यांच्या “सर्वांच्या भल्यासाठी कार्य करा” या संदेशाचा नाद संपूर्ण अकोला शहरात दुमदुमला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 06, 2025 02:46:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदतनिधी वाटपाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाच्या पेरण्यांसाठी बियाणे व इतर बाबींसाठी शासनाने सुमारे ४ हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड व जालना, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यांना निधी मिळणार आहे. तर विभागातील खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी २४ कोटी ६३ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. पिकांच्या भरपाईपोटी ४ हजार ५१ कोटींचे अनुदान शासनाने मंजूर केले असून २९ लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 'डीबीटी'द्वारे २ हजार ८६ कोटींचा निधी जमा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले...
0
comment0
Report
Advertisement
Back to top