Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

राणा दांपत्य के खिलाफ चुनावी टकराव की संभावना, भाजप-युवा स्वाभिमान में युति पर चर्चा

ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 08:39:48
Amravati, Maharashtra
राणा दांपत्य येत्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता; रवी राणा यांचा भाजपला युतीचा प्रस्ताव, भाजप कार्यकर्त्याचा स्वबळाचा इशारा नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र युती न झाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढू अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाने घेतली आहे. त्यामुळे राणा दांपत्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. दरम्यान युक्ती संदर्भात भाजप कार्यकर्त्यांना विचारले असता भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे राणा आणि भाजप यांच्यात युती होणार नसल्याचं बोलल जात आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 10:27:05
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 13, 2025 10:26:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवनी केल्यानंतर ही आघाडी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली होती. पण आता मात्र चंदगड नगरपरिषद निवडणूकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय. चंदगड नगर परिषद निवडणूक निमित्ताने केवळ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, तर महाविकास आघाडी सोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आघाडी असणार आहे अस कोल्हापूर जिल्हा शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि.बी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भाजप वगळता इतरांशी आघाडी करा असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जिल्हास्तरावर निरोप दिला असल्याचे देखील व्ही. बी. पाटील यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीला घेऊनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे असा दावा ही. बी. पाटील यांनी केला आहे..
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 13, 2025 10:26:26
Thane, Maharashtra:ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 2.38 करोडचा मेफेड्रोन जप्त; दोन आरोपी अटक. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत मेफेड्रोन (Mephedrone) हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 9 किलो 71 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करत दोन संशयितांना अटक केली असून, जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 2,38,57,900/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सापळा रचून अब्दुल्ला शेख आणि कमलेश अनंत सोनवणे यांच्यासह आणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 9 किलो 71 ग्रॅम मेफेड्रोन असा मोठा साठा जप्त करण्यात आला. येणाऱ्या काळात देखील मोठी करडी नजर ठाणे, अमली विरोधी पथकाची शहरात असल्याचं ठाणे क्राईम ब्रांच पथकाचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितलं.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 09:33:22
Amravati, Maharashtra:इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे अमरावतीत फलक लागल्याने भाजप आक्रमक; अर्ध्या तासापेक्षा अधिकचा काळ आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिया. खासदार अनिल बोंडें यांच्या नेतृत्वात पदाधिकारी पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले असता, अनिल बोंडे यांच्या सहभागाने अर्ध्या तासापेक्षा अधिकचा काळ आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिया दिला आहे. अमरगती शहरातील मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक लागतेच कसे असा सवाल खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्तांना विचारला आहे. लव्ह जिहाद निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचा आरोप अनिल बोंड यांनी केला असून हे जिहादी रॅकेट उध्वस्त केले पाहिजे, याचे धागेदोरे राष्ट्र विघातक शक्तींशी जोडल्या गेले आहे यावर कारवाई करण्याची खासदार अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 13, 2025 09:22:48
Akola, Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते.मात्र आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव 22व्या क्रमांकावर जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे मिटकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मी वैयक्तिकरित्या समाधानी आहे. प्रवक्तेपद किंवा पद नसणं महत्त्वाचं नाही, अजितदादांचा कार्यकर्ता असणं माझ्यासाठीचं मोठं आहे." या[m]ुळे आता मिटकरींच्या या प्रतिक्रियेनं अनेक तर्कांना पूर्णविराम मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 13, 2025 09:18:58
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 09:04:43
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्हा बनला बिबट्याचा हॉटस्पॉट... १५०० पेक्षा जास्त बिबट्यांची संख्या.... परिसरातील 70 टक्के पेक्षा ऊस क्षेत्र....तर भक्ष म्हणून जर्सी गाईंचे गोरे खोंड सहज होतात उपलब्ध... शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून भर दिवसा बिबटे या परिसरात मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरती हल्ले करू लागलेत,या परिसरात कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमुळे बारमाई शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने ऊस शेती मोठ्या प्रमाणात असून बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तर भक्ष म्हणून शेतकऱ्यांकडून नुकतेच जन्मलेले जर्सी गाईचे गोरे खोड मोकाट सोडले जात असल्याने बिबट्या याचा भक्ष म्हणून उपयोग करतोय,एकीकडे दुधाला बाजार भाव नाही तर दुसरीकडे हे खोंड सांभाळून याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे शेतकरी हे खोंड मोकाट सोडून देत आहेत. सावित्रा थोरात (शेतकरी), माऊली ढोमे (शेतकरी), गोहत्या बंदीमुळे या गोऱ्यांना कत्तलीसाठी कोणी घेऊन जात नसल्याने शेतकरी असे मोकाट सोडून देत आहेत त्यामुळे या परिसरात बिबट्याची संख्या वाढली असून शासनाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करून गोहत्या बंदी संदर्भातला विचार करून या गोय्रांना सांभाळण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी शेतकरी शासनाला विनंती करत आहेत. तर शेतकऱ्यांनी असे गोरे मोकाट सोडून देण्याऐवजी वन विभागाशी संपर्क केला तर या गोय्रांचा भक्ष्य म्हणून पिंजरामध्ये ठेवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट चे इंजेक्शन देण्यासाठी भक्ष म्हणून या गोय्रांचा उपयोग केला जाऊ शकतो असं वनविभागाकडून स्पष्ट केलं गेलंय... त्यामुळे या पुढच्या काळात शासन गोहत्या कायद्यासंदर्भात आणि या मोकाट गोऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेत आणि काय उपाययोजना करत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
1
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 13, 2025 09:00:59
Oros, Maharashtra:ऑन पार्थ पवार घोटाळा पार्थ पवार यांनी केलेल्या घोटाळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठा महाघोटाळा आहे. अजित पवार यांच्या तोंडी सांगण्यावरून हा करार रद्द होऊ शकतो का ? रद्द करण्याची प्रोसिजर पूर्ण केल्यााशिवाय हा करार रद्द कसा काय होऊ शकतो ? या घोटाळ्यात जे जे जबाबदार आहेत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊन याची चौकशी करावी. ऑन बावनकुळे अशा एका मोठ्या प्रकरणात केवळ पाचशे रुपये भरून घेतल्याचे उदाहरण महसूल मंत्री बावनकुळे यांनी दाखवावं . महसूल वाढविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्याने प्रयत्न केले असतील आणि त्याला झापण्याचं काम महसूल मंत्री करत असणे तर त्या कर्मचारी वर्गाने त्यांच ऐकू नये आणि कारवाई करावी ऑन अजित दादा राजीनामा अजित दादा तुम्ही अजून कोणती सदसद्विवेक बुद्धी वापरणार आहात. तो तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाने केलेली भानगड तुमच्या वाचनात येते.तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असेल तर अजून कोणती सदसद्विवेक बुद्धी वापरणार आहात ऑन अजितदादा बाबत पक्षाची भूमिका सत्तेचा दुरुपयोग करून अजित दादांनी केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत अशा प्रकारचा हा पहिलाच गैरप्रकार नाही त्या कंपनीने यापूर्वी असे दोन गैरप्रकार केलेले आहेत. मीरा-भाईंदरला प्रताप सरनाईक आणी नरेंद्र मेहता यांनी चौदाशे कोटींची जमीन तीनशे कोटी ला घेतली. आणि मामुली दंड भरला.असे खूप गैरप्रकार होत आहेत. शिंदे सेनेकडून आणि अजित दादा गटाकडून होणारे गैरप्रकार बाहेर काढायचे आणि या दोन गटाला पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं हेच भाजपचं कारस्थान आहे...
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 08:20:26
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात घडलेल्या कथित चमत्कार प्रकरणावर आता वाद रंगतोय.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साईबाबा संस्थानकडे तपासाची मागणी केली आहे.उत्तराखंडहून शिर्डीला साईंंच्या दर्शनासाठी आलेल्या कुटुंबाने दर्शनानंतर अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा केला होता.ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समितीने वैज्ञानिक चौकशीची मागणी केली आहे.श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यावी ,अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी , अशी समितीची मागणी आहे. तसं पत्र देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साई संस्थानला पत्र दिलं आहे...
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:20:15
Nashik, Maharashtra:गिरीश महाजन भाषण points माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या सोबत अनेक जण आज भाजपात प्रवेश केलंय माजी उपमहापौर गुरुमित बग्गा,माजी नगरसेवक नंदीनी बोडके यांच्या सोबत अजून काही जणांनी प्रवेश केलंय शिरीष कोतवाल यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन आले आहेत पण हा प्रवेश तुमचा शेवटचा राहील इतर पक्षांची काय अवस्था आहे मी काही सांगण्याची गरज नाही आता तुम्ही मुख्य प्रवहात आला आहात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रगती करत आहोत मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश सुरक्षित आहे अतिशय दूरदृष्टी असलेला व्यक्ती आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊन आमच्या पक्षात आला आहात कोतवाल यांनी 8 वेळा विधानसभा निवडणुक लढले आहेत यात दोन वेळा ते निवडून आले आहेत विद्यमान आमदार राहुल आहेर आणि तुम्ही मिळुन काम करा
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:19:11
Nashik, Maharashtra:भाजप प्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी माजी आमदार शिरीष कोतवालांची घेतली फिरकी.. अँकर - नाशिकच्या चांदवड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आज नाशिकमध्ये भाजप कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी शिरीष कोतवालांची गिरीश महाजन यांनी चांगलीच फिरकी घेतली. कोतवाल तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये होते ना ? या गिरीश महाजनांच्या प्रश्नावर कोतवाल यांनी राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना आणि नंतर काँग्रेस असं सांगताच महाजन यांनी डोक्याला हात लावत आता भाजप हा शेवटचा पक्ष आहे तुम्ही मुख्य प्रवाहात आले आहात, पुढे कुठे जाऊ नका असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिटला होता..
1
comment0
Report
Advertisement
Back to top