Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती के कपिलवास्तु नगर में तलवार हाथों से दहशत, गिरफ्तार

ADANIRUDHA DAWALE
Feb 03, 2026 03:03:03
Amravati, Maharashtra
अमरावतीच्या कपिलवास्तु नगरात दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न; दहशत पसरविनारा सीसीटीव्ही कॅमेळ्यात कैद दरम्यान तलवारी घेऊन दहशत पसरविताना सागर वानखडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारास दोन तलवारीसह पोलिसांनी अटक केली आहे. गाडगेनगर पोलिसात कलम 4/25 आर्म ऍक्ट सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई करावी केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 14, 2026 08:48:36
Satara, Maharashtra:सातारा - भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावताना ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान 120 इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये कार्यरत असणारे भारतीय सैन्य दलाचे जवान बाळकृष्ण निकम यांना वीरमरण आले .शहीद जवान बाळकृष्ण निकम यांची पाटण शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन नागरिकांकडून शहीद बाळकृष्ण निकम यांना अखेर चा निरोप दिला .त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी कुटुंबीयांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश करत त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.त्यांच्या मूळ पाटण पिंपळोशी गावी शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सातारा पोलीस दल आणि लष्करांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.हजारोंच्या उपस्थिती अश्रू पुर्ण नयनांनी त्यांनी अंतिम निरोप देण्यात आला
144
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 14, 2026 08:12:38
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ सेक्टर 26 येथील बामणदे मैदानावर नियोजित 'Formula 4' कार रेसिंग ट्रॅक उभारण्याच्या प्रकल्पा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविलाय. सदर मैदानावर रेसिंग ट्रॅक बनविणे हे स्थानिक खेळाडूंच्या अधिकारावर गदा आणून मैदान नष्ट करण्याचा डाव असून फॉर्मुला वन रेसिंग ट्रॅकचे काम तात्काळ थांबवून पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी केलेय. यासंदर्भात शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापौर सुजाता पाटील यांची भेट घेत सकारात्मक निर्णय न झाल्यास नेरुळ ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. नेरूळ येथील ज्या मैदानात हा कार रेसिंग ट्रॅक बनवला जाणार आहे त्या मैदानाचे शोभाभूमीकरण करून स्पर्धा झाली की तो ट्रॅक बुजवणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
176
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 07:46:43
173
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 07:15:26
Shirdi, Maharashtra:मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तणझाईची झळ आता धार्मिक स्थळांनाही… राज्यात गॅस तंåचाईचे संकट गडद होत असताना शिर्डीतील साई संस्थानचा मोठा निर्णय… गॅस बचतीसाठी साई संस्थान प्रशासनाने केला लाडू प्रसाद वितरणात बदलाव.. आता दर्शनानंतर प्रत्येक साई भक्ताला दिलं जाणार फक्त एकच लाडू पाकीट... पूर्वी भाविकांना एकापेक्षा अधिक मिळत होती लाडू पाकिटे , मात्र परिस्थिती पाहता साई संस्थानचा निर्णय… साई संस्थानकडे सध्या सुमारे २० दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक… मंदिर परिसरातील सर्व लाडू काउंटरवर प्रशासनाने लावले सूचना फलक... गॅस वापर कमी करून लाडू निर्मिती प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचा संस्थानचा प्रयत्न… राज्यात वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक संस्थांनकडूनही उचलली जाताय गॅस बचतीची पाऊले... सूचनाफलक लावलेल्या लाडू काउंटरवरून आढावा घेत भाविकांशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुंNAL JAMDADE यांनी...
262
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 06:47:18
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: आयटी पार्क मधील सामुदायिक स्वयंपाकघरात गॅसची अडचण नसल्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर खिचडी शिजवली जाते. वाफेच्या यंत्रणा, सौरऊर्जेच्या मदतीने खिचडी शिजवली जाते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, या स्वयंपाकघरात वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय तयार झाला आहे. या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पोषणमूल्ये जपून अन्न शिजवले जाते, तसेच एलपीजीवर अवलंबून न राहता सौरऊर्जेचा वापर केला जातो. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क येथे त्यांच्या वतीने सामुदायिक स्वयंपाकघर चालविले जाते. आज जिल्ह्यातील दररोज 40 हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहचविण्याचे काम केले जाते. शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38 हजार विद्यार्थी तसेच 80 बालवाड्यांमधील 3500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातो. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या IT पार्क मध्ये गॅस सिलिंडरची झंझट नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
153
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 06:35:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही - मंत्री उदय सामंत. अँकर - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही,अशी फटकेबाजी शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता, सध्या सगळीकडे 'पुष्पा' चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्या सारखं 'झुकेगा नही' म्हणण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला.शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
150
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 06:33:54
Manchar, Maharashtra:सध्या देशभरात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात काही शेतकरी बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झाल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे. ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले बायोगॅस अर्थात गोबर गॅस प्रकल्प आजच्या इंधन तुटवड्याच्या काळात अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे गाई-म्हशींचे गोठे असल्याने त्यातून मिळणाऱ्या शेणापासून बायोगॅस तयार केला जातो. या गॅसचा वापर घरगुती स्वयंपाकासाठी केला जातो. विशेष म्हणजे केवळ दोन गाई असल्या तरीही छोट्या स्वरूपात बायोगॅस प्रकल्प उभारता येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी या प्रकल्पाचा लाभ घेतला असून सध्याच्या गॅस तुटवड्याच्या परिस्थितीतही त्यांचे घर स्वयंपूर्णपणे चालत असल्याचे दिसून येतंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
135
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:17:02
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांप्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करत आतापर्यंत एकूण ५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.शिक्षण आयुक्तांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा काळातील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात आली.यापूर्वी ५ मार्च रोजी २२ जणांना निलंबित करण्यात आले होते, तर त्यानंतर आणखी २९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिले असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
164
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:01:13
195
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 14, 2026 05:47:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर जिल्ह्यातील एक्स्पोर्ट दर्जाचे द्राक्षे दुबई ऐवजी युरोपला पाठवण्याच्या निर्णय. सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला युके आणि यूएस मध्ये चांगली मागणी. सोलापूरातील द्राक्षे आता आखाती देशाऐवजी युरोपमध्ये निर्यात केला जात आहे. आखाती देशापेक्षा यूएस मध्ये द्राक्ष मालाला चांगला भाव मिळत आहे. युद्धामुळे आखाती देशात जाणार माल थांबला होता. मात्र युरोप मध्ये हा माल निर्यात केला जात आहे. विशेष म्हणजे युरोप मार्केटमध्ये भारतातील माल दुप्पट दराने खरेदी मिळत आहे. आम्ही आखाती देशात माल पाठवत होतो मात्र आता तो माल युरोपला पाठवतोय. पूर्वी युरोप मध्ये 80 रुपये दर मिळत होता मात्र आता 160 ते 165 रुपये दर मिळतोय. त्यामुळे आम्हाला समाधानकारक दर मिळत आहे.
181
comment0
Report
Advertisement
Back to top