Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड़ में गेवराई- माजलगाव मार्ग पर टायर जलाकर गडकोट विकास महामंडळ स्थापना की मांग

MMMahendrakumar Mudholkar
Mar 14, 2026 05:45:17
Beed, Maharashtra
बीड़: गेवराई–माजलगाव रस्त्यावर टायर जलाऊन आंदोलन; गडकोट विकास महामंडळ स्थापनेची मागणी. गेवराई–माजलगाव मुख्य रस्त्यावर टायर पेटवून政府चे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. तुळजापूर येथे जागर प्रतिष्ठानच्या उपोषण सुरू आहे; या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड़ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेवराई–माजलगाव मार्गावर आंदोलन छेडले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:17:02
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांप्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करत आतापर्यंत एकूण ५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.शिक्षण आयुक्तांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा काळातील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात आली.यापूर्वी ५ मार्च रोजी २२ जणांना निलंबित करण्यात आले होते, तर त्यानंतर आणखी २९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिले असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
103
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:01:13
134
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 14, 2026 05:47:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर जिल्ह्यातील एक्स्पोर्ट दर्जाचे द्राक्षे दुबई ऐवजी युरोपला पाठवण्याच्या निर्णय. सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला युके आणि यूएस मध्ये चांगली मागणी. सोलापूरातील द्राक्षे आता आखाती देशाऐवजी युरोपमध्ये निर्यात केला जात आहे. आखाती देशापेक्षा यूएस मध्ये द्राक्ष मालाला चांगला भाव मिळत आहे. युद्धामुळे आखाती देशात जाणार माल थांबला होता. मात्र युरोप मध्ये हा माल निर्यात केला जात आहे. विशेष म्हणजे युरोप मार्केटमध्ये भारतातील माल दुप्पट दराने खरेदी मिळत आहे. आम्ही आखाती देशात माल पाठवत होतो मात्र आता तो माल युरोपला पाठवतोय. पूर्वी युरोप मध्ये 80 रुपये दर मिळत होता मात्र आता 160 ते 165 रुपये दर मिळतोय. त्यामुळे आम्हाला समाधानकारक दर मिळत आहे.
181
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 14, 2026 05:16:06
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांचे आंदोलन अखेर मागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज होणाऱ्या चंद्रपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यात यश आले. शासनाने धोत्रे यांना अपेक्षित आश्वासन दिले. अँकर: गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करणारे पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखाणीला राज्य सरकारने काल स्थगिती दिली होती. परंतु वन्यजीव मंडळाने लोहारडोंगरी येथील खाणीला दिलेली परवानगी रद्द केली, त्यानंतर उपोषण मागे घेण्याची अट होती. सरकारने सुधारित आदेश काढला आणि वन्यजीव मंडळाने दिलेली मंजुरी पुढील बैठकीत रद्द केली जाईल अशी आश्वासन देण्यात आले. यानंतर बंडू धोत्रे यांनी उपोषण अखेर दहाव्या दिवशी मागे घेतले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी बंडू धोत्रे यांना सरकार तर्फे पत्र दिलं, त्यानंतर धोत्रे यांनी आपलं उपोषण संपविले.
173
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 05:15:40
Shirdi, Maharashtra:एकीकडे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातून सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पातून दररोज 10 ते 12 टन CNG गॅसचे उत्पादन सुरू असून ऑईल कंपन्याच्या माध्यमातून त ग्राहकांपर्यंत देखील पोहचवला जातोय. काही महिन्यापूर्वी देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या देशातील पहिल्या सहकारी कारखान्याचा माध्यमातून उभारलेल्या CNG प्लांट मधून आता उत्पादन सुरू झाले असून शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या या प्रकल्पातून दररोज CNG गॅस ग्राहकापर्यंत पोहचवला जातोय. राज्य व देशातील सहकार क्षेत्राने असे प्रकल्प कार्यान्वित केले तर अन्नदाता हा ऊर्जादाता तर होईलच मात्र आत्मनिर्भर भारत हे स्वप्न देखील पूर्ण होईल यात शंका नाही..
133
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 05:15:16
Washim, Maharashtra:धरण व लघु प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या केवळ ३२.१४ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकबुर्जी आणि सोनल हे दोन मध्यम प्रकल्प असून उर्वरित ७५ लघुप्रकल्पांमध्येही पाणीपातळी घटत आहे. एकबुर्जी प्रकल्पात ३३.०८ टक्के, तर सोनल प्रकल्पात ३१.६२ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्येही पाणी कमी झाले असून वाशिम तालुक्यात ३३.६९ टक्के, मालेगावमध्ये१९.८१ टक्के आणि रिसोडमध्ये १७.५१ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा घटत असल्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे
146
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 14, 2026 04:36:07
Kolhapur, Maharashtra: करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर गाभारा संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अंबाबाई देवीच्या भक्तांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन करता येणार नाही. मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिर संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण बाहेरून येणाऱ्या भक्तांना देवीचे दर्शन करता यावे यासाठी अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 मार्च पासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
161
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 14, 2026 04:34:36
Virar, Maharashtra:लोकेशन : विरार वसई महानगरपालिकेकडून क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा सत्कार आयुषच्या कामगिरीने वसईकरांची मान उंचावली नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. आयुष हा नालासोपाऱ्यातील नाळे गावात राहणारा आहे. आयुष म्हात्रे यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशासोबत वसई-विरार शहराचेही नाव उज्वल केले आहे. विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण भारतीय संघाने दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असून संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांचे योगदान यात अधिक महत्वाचे आहे. आयुष म्हात्रे यांच्या या योगदानाबद्दल वसई विरार शहर महापालिकेने दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या महासभेत आयुष म्हात्रे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांच्या कर्तुत्वास सन्मानित करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी आमदार क्षितीज ठाकूर, विरोधीपक्ष नेते मनोज पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने व महापालिकचे अधिकारी उपस्थित होते.
166
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 14, 2026 04:31:55
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी गाव परिसरात अस्वलीचा मुक्त संचार आढळून आला आहे. पहाटेच्या sुमारास गावातील रस्त्यांवर अस्वली फिरताना दिसली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अस्वलीचा वावर गावात दिसून आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री व पहाटेच्या वेळी बाहेर पडताना ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान वनविभागाने तातडीने लक्ष देऊन या वन्य प्राण्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच गावात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
129
comment0
Report
Advertisement
Back to top