Back
शरद पवार और भीमराव आंबेडकर एक साथ, महाराष्ट्र की राजनीति में नया संकेत
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 12:36:50
Akola, Maharashtra
शरद पवार और प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे नेते परस्परविरोधी भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र, अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगू लागली आहे. हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी, या दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबत कयास बांधले जात आहेत. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फूट उंच पुतळा, तसेच 24 तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकत्र मंचावर दिसले, आणि त्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. मात्र, माध्यमांशी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपाचा होता. यात कोणतेही राजकीय समीकरण किंवा राजकीय संदेश शोधण्याचे काही कारण नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 14:09:050
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 14:02:170
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:331
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:573
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:454
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:172
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:122
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:043
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 08, 2025 13:12:114
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 13:03:192
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 13:03:044
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:35:380
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:31:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 12:30:590
Report