Back
अकोला में चोरी की घटनाएं बढ़ीं, लोगों ने स्थायी पुलिस चौकी की मांग की
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:00:25
Akola, Maharashtra
अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मलकापूर (अकोला परिसर) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील या परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लाखो रुपयांच्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतरही आरोग्यधाम कॉलनी परिसरात दोन संशयित चोरीच्या उद्देशाने फिरताना पुन्हा सीसीटीव्हीत दिसले. या संशयितांची हालचाल लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी चाकू काढून नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत पळ काढला. मात्र संतप्त नागरिकांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत अखेर एका चोरट्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला तत्काळ खदान पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, परिसरात वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नगरसेवक पराग गवई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अकोला शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून आता पोलिस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 03:19:180
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:18:360
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 03:15:540
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:15:220
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 03:00:57265
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 03:00:30547
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 03:00:18682
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 02:50:43888
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 02:50:14878
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 23, 2026 02:49:58910
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 23, 2026 02:49:45920
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 02:45:57901
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 02:45:30978
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 02:45:17982
Report