Back
पीपीपी मॉडल से सरकारी अस्पताल निजी भागीदारी के रास्ते, अकोला समेत तीन शहरों में चर्चा
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 02:04:22
Akola, Maharashtra
Anchor : आरोग्य सेवांमध्ये खासगीकरणाचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय खासगी भागीदारीत (पीपीपी) देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकोल्यासह लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी कंपन्यांकडे सोपवण्याची तयारी शासनाने सुरू केली असून, याबाबत आरोग्य विभागात हालचाली वेगाने सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलसाठी शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधात संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपनीकडे देण्याचा प्रस्ताव आहे. रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारीही संबंधित कंपनीमार्फत नियुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील सेवा रचना, नियंत्रण, तसेच रुग्णांवरील खर्च मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात चर्चेत आहे.शासन पीपीपी मॉडेलमुळे सेवा अधिक उच्च प्रतीची मिळेल, असा दावा करत असले तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचे काय होणार, हा प्रश्न गंभीरपणे पुढे येत आहे.दरम्यान, या निर्णयाला विरोध करत काँग्रेसने जोरदार भूमिका घेतली.अकोल्याचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी थेट रुग्णालयात जाऊन आंदोलनात्मक पद्धतीने विरोध नोंदवला. त्यांनी हा निर्णय रुग्णविरोधी असल्याचे सांगत शासनाने तत्काळ प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
146
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 03:31:580
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 20, 2025 03:30:450
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 20, 2025 03:30:140
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 03:19:28131
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 03:18:0276
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 20, 2025 03:17:3870
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 03:16:20157
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 03:04:23150
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 20, 2025 03:03:24153
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 20, 2025 03:02:26160
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 03:02:0352
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 03:01:33130
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 02:48:3897
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 02:47:15196
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 02:47:03194
Report