Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

मुरतिजापुर नगरपालिका चुनाव: बीजेपी ने कायम की सत्ता, हर्षल साबळे विजयी

JJJAYESH JAGAD
Dec 21, 2025 16:00:59
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला कायम राखत निर्णायक विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार हर्षल साबळे हे ७१८ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार हरीश पिंपळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणत केवळ सत्ता कायम ठेवली नाही, तर आमदार हरीश पिंपळे यांचे बंधू भूपेंद्र पिंपळे यांचाही विजय झाल्याने, “भाजपने गडही आणला आणि सिंहही” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.ही निवडणुकीत अत्यंत चुरशीची ठरली. मतमोजणीच्या अकराव्या फेरीपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख इम्रान शेख खलील आघाडीवर होते. मात्र बारावी फेरी निर्णायक ठरली. या फेरीत भाजपचे हर्षल साबळे यांनी आघाडी घेत निर्णायक विजय साकारला.या निकालामुळे मूर्तिजापूरमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी स्थानिक राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 21, 2025 16:17:47
Kalyan, Maharashtra:पंधरा तारखेला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.. जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक भागामध्ये कार्यकर्ता मेळावे\n\nदोन दिवसा अगोदर दोन्ही पश्चिम मध्ये असं आयोजन झालं आणि आज डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये\n होत आहे\n\nनिवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांना वेळ देणे व चार्ज करणे हे गरजेचे आहे त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजन केले आहे \n\nमहाराष्ट्र मध्ये 288 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत ... 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष चे उमेदवार निवडणूक लढत होते आणि त्यामध्ये 134 ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत \n\nभाजपही तळागाळातील आणि गावागावात बुध लेवल वरती काम करणारी पार्टी \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने सांगतात 51% लढाई आपल्याला जिंकायची आहे त्यामुळे मॅन टू मॅन संपर्क असला गरजेचा आहे \n\nकेंद्रातल्या व राज्यातील योजना सर्वत्र पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे याचा यश भाजपच्या पदरात पडत आहे \n\nअंबरनाथ व बदलापूर या दोन्ही भागात केलेले प्रचंड मदत बुध वरचे नियोजन... केंद्राच्या व राज्याच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश आलं \n\nदेवेंद्र फडणीस यांच्यावरती बदलापूर अंबरनाथ दोन्ही ठिकाणचे लोकांनी विश्वास ठेवलं \n\nएक दिवस तुम्ही मतदान करा लक्ष द्या पाच वर्षे मी तुमच्यावर लक्ष ठेवलं असं देवेंद्रजींनी सांगितलं आणि लोकांनी त्यांची विनंती मान्य केली त्यामुळे हे यश महाराष्ट्रात मिळालेला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 21, 2025 16:16:42
Kolhapur, Maharashtra:काँग्रेस आमदार सतेज पाटील byte मुद्दे ऑन प्रज्ञा सातव विरोधी पक्ष नेता निवडता येऊ नये म्हणून प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश झाला का याचे उत्तर आता मुख्यमंत्रीच देऊ शकतील राज्यात विरोधी पक्ष नेताच ठेवायचा नाही असं सत्ताधाऱ्यांचं धोरण आहे भाजप ज्यांच्यामुळे सत्तेत आल त्या अजितदादांच्या पक्षांचे नगरसेवक सुद्धा फोडत आहेत प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशा दिवशी मी त्यांच्याशी बोललो होतो काही अडचण आहे का असे विचारलं होतं मात्र काही अडचण नसल्याचं त्यांनी मला फोनवर सांगितलं ऑन वडगाव CCTV CEO ना जनतेने उत्तर दिलं, वडगावमध्ये आमचीच सत्ता आली दबावाचं राजकारण कितीही करू शकता, पोलिसांच बळ वापरू शकता नांदेडमध्ये मतदारांना अडवून ठेवलेल पहिलं दडपशाहीतून भाजपच्या बाजूने निकाल लागला, पैशाचा, पोलीस यंत्रणेचा गैरवापर ऑन उमदेवार पाळवा पळवी शेवटी शेवटी कोण गेलं तिथं मी जाणार, अजूनतरी सगळे सोबत आहेत पडत्या काळात काँग्रेसकडे जास्त उमेदवारी अर्ज कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा असणार ऑन काँग्रेस परफॉर्मन्स काँग्रेसने 3000 हुन अधिक जागा लढवलेल्या त्यातील एक हजारपर्यंत जागा आलेल्या आहेत निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतील घोळ, प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करण्याची मुभा अजित पवार यांनी दोन दिवस आधीच प्रचाराची मुदत वाढेल असं वक्तव्य केलेलं, याचाच अर्थ त्यांना आधीच सगळं माहिती होतं एकीकडे महायुतीची प्रचंड आर्थिक ताकद आणि तर एका बाजूला सामान्य कार्यकर्ता होता काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला जे यश मिळालं त्याच अभिनंदन सगळ्या यंत्रणा वापरल्या जातायत म्हणजे मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास नाही, जनतेतून त्यांना आत्मविश्वास नाही नगरपालिका निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात बोलले, विरोधात टीका टिप्पणी केली जात आहे तिघेही वेगवेगळे भांडतायत आणि लोकांना नाटक दाखवतायत पण ते तिघे एकच आहेत महापालिका निवडणुकीत या सगळ्या गोष्टींना जनता फसणार नाही ही अपेक्षा ऑन मुश्रीफ घाटगे कागलचा विषय वेगळा आहे, ते एकत्र येतील असं वाटलेले नव्हतं महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन बांध आहेत आमचा बांध वेगळा आहे, आमचा गुलाल आम्ही उधळतोय त्यांचा गुलाल ते उधळतायत ऑन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आश्वासन महापालिका गणित वेगळं असणार आहे गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जिथं जिथं सभा घेऊन निधी देतो असं सांगितलं ते द्यावं तिजोरीच्या चाव्या उघडा, लोकांनी बहुमत दिलंय तर आश्वासन पूर्ण करा ऑन काँग्रेस नियमावली चिन्हाच्या बाबतीत आघाड्यांची चिन्ह फॉर्म भरल्यानंतर निवडणुक आयोगाने जाहीर केलं, हे आधी जाहीर करायला हवं होतं RO ना सूचना द्यायला हव्या की दबावाखाली येऊनं फॉर्म बाद करू नये, पारदर्शक व्हावं आमचा RO वर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आम्ही उमेदवारांना सूचना केलेल्या आहेत आम्ही उमेदवारांना सांगितलं आहे की, फॉर्म भरताना एक व्हिडिओ काढायचा, हा व्हिडिओ जपून ठेवायचा प्रत्येक पानाचा पुराव्यासकट व्हिडिओ काढायचा अशा सूचना उमेदवरांना दिल्या आहेत आमचा फॉर्म बाद केला जाऊ शकतो, त्यामूळे याची आम्ही काळजी घेणार राज्यामध्ये महापालिकेचे फॉर्म भरताना काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना या उमेदवरांना सूचना ऑन मुश्रीफ मैत्री आमच्या ज्येष्ठ मित्रानी माझ्यासाठी शब्द टाकावा तुटलेली दोरी कधीपण गाठ बांधता येऊ शकते महापालिकेला त्यांच्याकडे पर्याय नाही, वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळी समीकरण असतात आज आमची दोरी तुटलेली आहे
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 21, 2025 15:15:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 21, 2025 14:48:50
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 21, 2025 14:06:19
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरातील पराभवानंतर भाजपात दुफळीचे वादळ घोंगावले आहे. दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने मोठा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली होती; परंतु जिल्ह्यातील माजी भाजप खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विजयासाठी मंत्रीपद कशाला हवे असा प्रश्न विचारला. निवडून आलेल्या आमदार-लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांना निवडून आणायचे असते अशी भूमिका मुनगंटीवार यांना चिडवते. आणखी म्हटलं की मंत्रीपद आणि विजय यांच्यात प्रत्यक्ष संबंध नाही. आम्ही चंद्रपूरचा काँग्रेसचा गड जिद्दीने भाजपकडे खेचून आणला आहे; आगामी निवडणुकात पुन्हा भाजपला विजय मिळवून देऊ, असे त्यांनी व्यक्त केले.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 21, 2025 13:48:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के भद्रावती में पुर्नएकदा पाचव्या टર્મ नगराध्यक्षपद धनुष्यबाणच कायम राहिलाय, हा एक विक्रमच आहे. यंदा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही तासांच्या फरकाने एकाच मैदानावर सभा झाल्या होत्या. विदर्भात शिवसेना संघटन कमकुवত असल्याचा विरोधकांचा कायम दावा आहे. मात्र पक्षाचे तगडे संघटन अन्य पक्षांच्या नगर परिषदेत तरी टिकाव लागू देत नसल्याचे दिसत आहे. याचा फायदा पक्षात दोनदा फुटीनंतरही धनुष्यबाण हाती घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांना मिळत ihren मोठा विजय झाला आहे. उत्तम व्हॉलिबॉल खेळाडू आणि चिकाटीचे प्रशिक्षक अशी त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे केंद्र-राज्य सत्तेत असलेल्या भाजपचे अनिल धानोरकर तृतीय स्थानी फेकले गेले तर शिवसेना शिंदे गटाची लढत काँग्रेसशी झाली.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 21, 2025 12:53:59
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 21, 2025 12:53:38
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.. काँग्रेस पक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार आहे... राजाभाऊ पातकर जिल्हाअध्यक्ष ANC- केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या मुलाखतींसाठी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही मुलाखत प्रक्रिया पार पडत असून, संघटनात्मक ताकद, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि पक्षाशी निष्ठा या निकषांवर इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 21, 2025 12:16:28
Yeola, Maharashtra:येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून शहरातील मोमीनپورा भागात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला या घटनेत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी तातडीने येवला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संबंधितांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 21, 2025 12:05:44
Akola, Maharashtra:अकोल्यातील अकोट नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अकोट नगरपरिषद निवडणुकीत जवळपास सर्वच महिला उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजपचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे गटाच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प ) उमेदवार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभी होत्या.या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोटमध्ये ही निवडणुक आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यांचे खंदे समर्थक तथा जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः सभा घेतली होती, मात्र त्यांच्या गटाला केवळ दोन नगरसेवकांपुरतेच समाधान मानावे लागले. दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र तिन्ही प्रमुख ठिकाणी भाजपने बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे.अकोटच्या जनतेने भाजपच्या विकासाच्या कामांवर विश्वास टाकला आहे.तर भाजपने हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केला आहे
115
comment0
Report
Advertisement
Back to top