Back
अकोला गैस एजेंसी के बाहर भारी भीड़, गैस सिलेंडर की तंगी से लोग परेशान
JJJAYESH JAGAD
Mar 16, 2026 07:04:59
Akola, Maharashtra
अकोला शहरातील जुने शहर परिसरातील राजेश्वर गॅस एजन्सीसमोर सध्या नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही ग्राहकांना एजन्सीच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे एजन्सीवर येणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे उन्हात उभे राहून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंंबांचे स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही कुटुंंबांनी पर्याय म्हणून पुन्हा घरगुती चुलीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, काही ग्राहकांनी गंभीर आरोप करत एजन्सीकडून बुकिंग असतानाही सिलेंडर इतर ग्राहकांना जास्त दराने विकले जात असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस सिलेंडरची टंचाई दूर करावी आणि सर्वसामान्यांना घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 08:45:150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 08:36:1527
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 16, 2026 08:33:5017
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 08:16:39157
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 07:54:0483
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 16, 2026 07:53:2891
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 16, 2026 07:49:5486
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 07:36:21150
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 07:35:4798
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 07:35:17170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 16, 2026 07:34:45199
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 07:07:01154
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 07:05:27112
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 07:03:4820
Report