Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410501

चाकण में आवारा कुत्तों के हमले से 32 वर्षीय महिला की मौत

HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 08:36:15
Chakan, Maharashtra
पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या. मध्यरात्री दोनच्या sुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरार कैद झाला असून महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर जखमा केल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुमारे पंधरा मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी स्थानिकांना विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 09:41:43
Kalyan, Maharashtra:केडीमसीतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी. अच्छा महासभेमध्ये मधुर मात्रे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत नसल्याने हकलपट्टी निश्चित. आजच्या महासभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा नगरसेवक उपस्थित एक नगरसेवक अनुपस्थित ANC -कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एक असलेल्या मधुर म्हात्रे यांच्यावर अखेर पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस देऊनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे तसेच पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे हे निवडून आल्यानंतरपासूनच शिवसेना शिंदे गट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही मधुर म्हात्रे यांनी पक्षाच्या नाव नोंदणीसह गटाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या महासभेच्या दिवशीही पक्षाने दिलेला आदेश धुडकावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अखेर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर केडीएमसीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आता १० नगरसेवक शिल्लक राहिले असून पक्षशिस्त पाळण्याबाबत इतर सदस्यांना देखील स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे आज महासेभेत ubt चे दहा नगरसेवक उपस्थित असून मधुर म्हात्रे आज ही महासभेत ubt सोबत अनुपस्थित असल्याने नक्कीच कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 09:38:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचेवडगाव गावात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. 8 ते 10 घरांची पूर्ण पडझड झाली असून 40 ते 50 घरांचे नुकसान झाले आहेत. अनेक घरांची पत्रे उडून गेली असून शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. 83 वर्षीय रुक्मिणी दिनकर कांबळे यांच्या घराचे पत्रे उडल्यामुळे घर कोलमडले. या परिस्थितीने गावकऱ्यांना मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाचा परिणाम शेतांवरही असलेला दिसत असून ज्वारी, मका आणि गवताच्या गंजींचे नुकसान झाले आहे. प्रशासन पंचनामे सुरू ठेवणार असल्याची माहिती आहे, मात्र मदत कधी मिळेल याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ग्रामस्थांनी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
100
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 09:37:01
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर नगरपालिकाकी स्थायी समिति अध्यक्ष पद पर उबाठा शिवसेना के मनस्वी संदीप गि-हे का विजय। सत्ता-धारी भाजपा-शिवसेना-उबाठा-अपक्ष आघाडी और विपक्ष कांग्रेस के पास स्थायी समिति में 8-8 मत थे, नियम अनुसार ईश्वरचिठ्ठी के फैसले से मनस्वी गीहे का निर्णय हुआ। 66 सदस्यीय मनपा में कांग्रेस सबसे बड़ा दल था, भाजपा के पास शिवसेना शिंदे गट समेत 24 सदस्य थे। किसी को बहुमत (34) नहीं मिला। महापौर-उपमहापौर सत्ता स्थापना के लिए कई समीकरण बदले गए, पर अंततः भाजपा-शिवसेना-उबाठा-अपक्ष आघाडी ने सत्ता पर कब्जा कर लिया। स्थायी समिति में सत्ता और विपक्ष के बराबर 8-8 मत रहे, ईश्वरचिठ्ठी का फैसला किसके पक्ष जाएगा, इस पर सबकी नजरें थीं। भाजपा ने उबाठा शिवसेना के साथ बरती गई दोस्ती को इस ताजा विजय से पुख्ता किया है。
54
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 09:36:41
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाजात फिरणाऱ्या दुचाकीचे सायलेन्सर काढून रोलर खाली केले. पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून बुलेट तसेच इतर दुचाकी वाहन चालक सायलेन्सरमध्ये बदल करून त्यातून विचित्र आवाज, कानाला त्रास देणारे आवाज काढून वाहन चालवत होते. शाळा महाविद्यालय परिसरात असे प्रमाण वाढले होते. पंढरपूर शहर वाहतूक शाखेने अशा दुचाकींचे विविध आवाजात वाजणाऱ्या 70 सायलेन्सर काढून जप्त केले. तसेच आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात या सायलेन्सरवर रोलर फिरवून त्यांना चपटे करून नष्ट केले. भविष्यात कोणी अशा पद्धतीने कर्णकर्कश आवाजात दुचाकी चालवली तर अशा प्रकारे कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिला आहे.
65
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 16, 2026 09:35:36
Akola, Maharashtra:अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन प्रकरणातील कथित एपस्टीन फाईल्स मध्ये काही जागतिक नेत्यांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील काँग्रेसचे माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत तात्काळ राजीनामा देण्याची मागणी भरत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली आहे. दिवेकर यांनी पाठवलेल्या पत्रात अमेरिकेतील एपस्टीन प्रकरणात अनेक जागतिक नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचीही नावे चर्चेत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीचाही उल्लेख करत दिवेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच या सर्व घडामोडींमुळे पंतप्रधानांवर दबाव येऊन अमेरिकेसोबत कृषी व्यापार करार करण्यात आला असून त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा देऊन नव्या व्यापार करारांपासून दूर राहावे, अशी मागणी दिवेकर यांनी केली आहे.
98
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 09:35:20
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या हनुमान गढीला 121 कोटीचा निधी दिल्याने काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. अमरावतीच्या हनुमान गढीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार्टनरशिप आहे का—यशोमती ठाकूर यांचा हा सवाल. अमरावतीमध्ये आमदार रवि राणा यांनी निर्माण केलेल्या हनुमान गढीला 121 कोटीचा निधी मंजूर केला यावर काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हनुमान गढी व्यावसायिक जागा आहे आणि या ठिकाणी वन विभागाचे सर्व नियम तोडण्यात आले असून अमरावतीच्या जहागीरपुर देवस्थान, कांदण्यापूर विकास आराखडा, वलगाव विकास आराखडा, यासह विविध पौराणिक देवस्थानांना निधी दिला नाही, परंतु हनुमान गढ़ीला निधी दिला गेल्यामुळे सरकारमध्ये पार्टनरशिपचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील आणि अमरावतीतील धार्मिक स्थळे पौराणिक देवस्थानांना सरकार निधी का देत नाही, हा सवालही त्यांनी उपस्थित केला.
115
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 16, 2026 09:34:30
Satara, Maharashtra:सातारा : माण तालुक्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीत अनपेक्षित घडामोड घडली असून मंत्री जयकुमार गोरे यांना राजकीय धक्का बसला आहे. ईश्वर चिठ्ठीच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख यांच्या गटाला यश मिळाले. माण पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगाडे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड करण्यात आली. दोन्ही गटांकडे समान सदस्य असल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. या चिठ्ठीचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागल्याने प्रभाकर देशमुख यांच्या गटाने सभापती पदावर विजय मिळवला. या निकालामुळे माण तालुक्यातील राजकारणात नवा रंग चढला असून मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे।
33
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 08:58:04
Nashik, Maharashtra:गॅसच्या तुटवड्यामुळे मासिक मेस बंद पडण्याच्या मार्गावर, कॉलेज, क्लासचे विद्यार्थ्यांना शहरातून पुन्हा गावाकडे जाण्याची वेळ... अँकर: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम अनेक बाबींवर होताना पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये ग्रामीण भागासहित इतर शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस मध्ये जेवण मिळत नसल्याने पुन्हा गावाकडे निघून जाण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या अनेक मेस या बंद पडण्याच्या मार्गावर असून ज्या ठिकाणी 200 ते 250 विद्यार्थी जेवण करत होते त्या ठिकाणी थाळी सिस्टीम सुरू करून दिवसभरात चाळीस ते पन्नास नागरिकांनाच जेवण देण्याची वेळ मेस चालकांवर आली आहे. बाहेरून जेवण बनवून मेस मध्ये फाळी सिस्टीम सुरू करत तात्पुरती जेवणाची व्यवस्था केली जात आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
138
comment0
Report
Advertisement
Back to top