Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

हिदायत पटेल हत्या केस: नागपुर हाईकोर्ट ने दोनों आरोपीयों की अग्रिम जमानत खारिज की

JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:01:55
Akola, Maharashtra
काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याप्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात घडलेल्या अत्यंत गाजलेल्या काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याप्रकरणात आरोपींना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुद्दीन मोहम्मद आदिल आणि काँग्रेसचे अकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे.ही घटना ६ जानेवारी २०२६ रोजी घडली होती आणि त्यापासून हे दोन्ही आरोपी करार आहेत.हिदायत पटेल नमाज अदा करून गावातील मशिदीत बसले होते. त्याच वेळी आरोपीने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तापासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांनुसार, मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबातही आरोपींच्या सहभागाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमधूनही आरोपींचा सहभाग स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे या दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:18:36
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 23, 2026 03:15:54
Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानीला ‘वारा घालण्याच्या’ पारंपरिक सेवेची सुरुवात ANC-श्री तुळजाभवानी मंदिर येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’ पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून, अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे。
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:15:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाच्या तपासात आता आर्थिक - उलाढाल समोर येत आहे. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढेंकडून हडपलेल्या ६५ लाखांपैकी १२ लाख खर्च करून जग्वार कार घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली असली तरी, उर्वरित ४३ लाखांहून अधिक रकमेचा गुंत्ता अद्याप सुटलेला नाही. या पैशांचा वापर नेमका कुठे झाला हा उलगडा पोलिस अद्याप करू - शकले नाहीत. आरोपीने घेतलेली ही कार अपघातात निकामी झाली होती. आरोपीने ती दुरुस्तीसाठी कोकणवाडी येथील एका गॅरेजमध्ये ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार ताब्यात घेतली. मात्र, पैशांच्या हिशेवात आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असून समाधानकारक उत्तरे देत नाही. आरोपीने गुन्ह्यात वापरलाेला मोबाइल पुण्यात लपवून ठेवला आहे. तो हस्तगत करण्यासाठी एक पथक पुण्याला रवाना होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:15:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, एप्रिल ते जून या कालावधीत सोयगाव तालुका वगळता वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, पैठणसह इतर तालुक्यांतील ५९३ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांची आखणी केली आहे. जिल्ह्यातील ५९३ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि इतर पूरक उपाययोजना राबविण्यासाठी तब्बल ३५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:00:57
Kolhapur, Maharashtra:शस्त्र तस्करी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मध्यप्रदेशात छापा टाकून चार पिस्तुले जप्त केली आहेत. याप्रकरणी गावठी पिस्तूल बनवणाऱ्या कारागिराला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सरnaam नहारसिंह बरनाल अस मध्यप्रदेश मधील सिंगनूर इथून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसापूर्वी इचलकरंजी मधील शस्त्र तस्कर मनीष नागोरी याला पोलिसांनी अटक केली होती, या तपासात नागोरी मध्यप्रदेश मधून गावठी पिस्तूल आणायचा अशी माहिती समोर आली, त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यप्रदेशात कारवाई करत चार गावठी पिस्तुले जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला सरनाम आणि त्याच्या कुटुंबातील इतर तरुण चाव्या बनवण्याची कामे करतात. यातूनच त्यांनी गावठी पिस्तुले बनवण्याचा उद्योग सुरू केल्याच समोर आल्या आहे. सरनाम बरनाल या आरोपीच्या मूळ गावी पिस्तूल बनवण्याचा कारखाना असल्याचा संशय देखील पोलिसांनी आल्याचा संशय.
265
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 03:00:30
547
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:00:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांसह गॅसपुरवठ्यावर संकट आहे. दररोज जेवढे घरगुती गॅस सिलिंडर वितरण केले जायचे, त्याच्या पाचपट बुकिंग दरोज होत असल्याने गॅस वितरक एजन्सीसमोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात दररोज २० हजार १३० तर शहरात सरासरी १० हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरीत होणे शक्य आहे. असे असताना रोज ६० हजार सिलिंडरची रोज मागणी होत आहे. हा सगळा प्रकार पाहून एजन्सीधारकांसह पुरवठा विभागही चक्रावून गेले आहे. ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा सुरू असली तरी गॅस सिलिंडर केव्हा मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे कुणालाही निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. इंडियन ऑइलकडे २ लाख ८३ हजार, इण्डेनकडे ४ लाख १० हजार तर बीपीसीएलकडे ४ लाख ८३ हजार सिलिंडर ग्राहक आहेत.
682
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 02:50:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आर्थिक कोंडीमुळे कायमच तिजोरी रिती राहणाऱ्या छत्रपती संभाजी नगर 4 जिल्हा परिषदेला यंदा मात्र 'लक्ष्मी' पावल्याचे चित्र आहे. अलीकडेच मुद्रांक शुल्काच्या थकबाकीसह बँकेत जमा निधीवरील व्याजातून तब्बल ४० कोटी ४३ लाख रुपये, तर १५व्या वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ मधील 'अबंधित' निधीची सुमारे ६.५ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने जि. प.ची आर्थिक घडी सावरू लागली आहे. जिल्हा परिषदेची बहुतांश विकासकामे शासनाच्या अनुदानांवरच अवलंबून असतात. परिणामी, निधीअभावी अनेक योजना रखडत होत्या, तर काही कामे अपुरीच राहत होती. अशा परिस्थितीत प्रलंबित मुद्रांक शुल्काची थकबाकी आणि जमा निधीवरील व्याजाची मोठी रक्कम मिळाल्याने तिजोरीला एकदम बळ मिळाल्याची भावना आहे...
888
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 23, 2026 02:50:14
878
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 23, 2026 02:49:58
Nashik, Maharashtra:- नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग - ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी - SIT आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू - मंदिराचा पुजारी, वॉचमन आणि देखभाल करणारा कर्मचाऱ्याला केले होते पाचारण - मंदिर आणि बंगल्यातील हालचालींबाबत घेतली सविस्तर माहिती - व्हीआयपी भक्त आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची माहिती तपासाच्या केंद्रस्थानी होती - जमीन खरेदी-विक्री व्यवहारात सहभागी असलेले लोकही रडारवर - मंदिर आणि बंगला गावापासून दूर असल्याने हालचाली गुप्त राहत होत्या - धार्मिक कार्यक्रमावेळीच वाढायचा राबता, इतर वेळी परिसर शांत राहायचा - चौकशीनंतर तिघांना सोडण्यात आले, मात्र तपास अधिक गतीমান झाल्याची माहिती
910
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 02:45:57
Jalna, Maharashtra:जालना : भोकारदन तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे नाही,शेतकरी संतप्त अँकर : जालन्यातील भोकरदन तालुक्यासह परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जोरदार वादळामुळेही हानी झाली आहे. गहू, मका, हरभरा यांसारख्या पिकांना या अनपेक्षित हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिके आडवी पडली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून अद्याप प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
901
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 02:45:30
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शाहू मिल सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रयत्न करू, त्याचबरोबर ही मिल शासनाने चालवावी यासाठी पाठपुरावा करू असं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले आहे.. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आंदोलकांनी शाहू मिलची पाहणी केली, त्यावेळी आंदोलकांना खासदार शाहू महाराजांनी आश्वासन दिले. यावेळी खासदार शाहू महाराज आणि आंदोलकांनी मिलमध्ये जाऊन जुना स्पिनिंग मिल, भोंगा आणि अन्य इमारतीची देखील पाहणी करण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी 27 मार्च रोजी शाहू मिल समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय देखील शाहू मिल स्मारक कृती समितीने जाहीर केले.
978
comment0
Report
Advertisement
Back to top