Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरी चिंचवड़ महापालिका का 2026-27 बजट शनिवार को स्थायी समिति के समक्ष पेश होगा

KPKAILAS PURI
Feb 26, 2026 04:18:43
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी म्हणजेच २८ तारखेला स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या नव्यान निवडलेल्या सभापती समोर मांडण्यात येईल. स्थायी समितीच्या नवीन सभापतींची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत हे सादरीकरण होणार असल्याचे महापालिका प्रशासनान सांगितल. स्थायी समिती अध्यक्षपद भाजप च्या अभिषेक बारणे यांना निश्चित झालं असून शनिवारी त्याची औपचारिक घोषणा होणार आहे...!
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 26, 2026 05:46:59
Shirdi, Maharashtra:राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आज तिसरा दिवस असून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात कालचा मुक्काम आंदोलकांनी केला. 148 किलोमीटर पैकी 50 किलोमीटरच्या अंतर आंदोलकांनी पार केले असून काल मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. डॉ. अजिक नवले यांच्यासह 13 जणांच्या शिष्टमंडळाने काल मंत्रालयात चर्चा केली. या चर्चेत काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती असली तरी अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सगळ्या मागण्यांबाबत आज दुपारी 12:00 वाजेपर्यंत मंत्रालयातून काय निर्णय होतो यावरच आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट होईल. आंदोलकांनी आपल्या पुढील टप्प्याच्या लॉंग मार्च साठी तयारी पूर्ण केली असून आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात हे लाल वादळ आज धडकणार आहे. संगमनेर प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या सुरू केलाय या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:15
Nagpur, Maharashtra:नागपुरात एका घरातील झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय . कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी घरमालक शेजाऱ्याला अटक केली आहे. कुश राजेंद्र पटेल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी तो घरासमोर खेळत होता. सायंकाळी सात वाजून गेल्यावरदेखील तो घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. घरासमोर राहणाऱ्या घराच्या जिन्याखाली रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीत एकाने सहज वाकून पाहिले असता तेथे कुश बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने बाहेर काढून पारेख इस्पितळात व तेथून वर्धमाननगरातील पुगलिया इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्या घराचे पाण्याच्या टाकीला झाकण किंवा जाळी लावली नव्हती. त्यामुळे खेळता खेळता कुश त्यात पडला. कुशचे काका जितेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून टाकीचे झाकण उघड्या असलेल्या घरमालकाला गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:06
Nagpur, Maharashtra:नागपूर एम्स मेस के खाने में किडे और सुरवंट आढळले विद्यार्थ्यांच्या मेसमधील घटना, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) में विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट आढळले. मशरूमأैवजी, मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ आढळला. बुधवारी, पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये जेवताना, विद्यार्थ्यांना एक सुरवंट आढळला. सुरवंट पूर्णपणे तेलात तळलेला होता. फळांच्या तुकड्यावर एक मृत किडा आढळला आणि भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळला. शिवाय, मशरूम करीमध्ये एक स्पंजयुक्त पदार्थ आढळला, एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या मेसमधील निष्काळजीपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 26, 2026 05:00:29
Amravati, Maharashtra:27 फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी होणार बंद; हजारो विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी अँकर :- 27 फेब्रुवारी पासून अमरावती जिल्ह्यात सीसीआयची कापसू खरेदी नोंदणी बंद होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठ-दहा दिवसात कापसाचे दर हजार ते बाराशे रुपये कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सीसीआय मध्ये कापूस विकण्यासाठी नोंदणी करायला सुरुवात केली होती मात्र आता 27 फेब्रुवारी पासून सीसीआयची कापड खरेदीची नोंदणी बंद होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे कागदपत्र तयार नसल्याने शेतकरी 27 फेब्रुवारी पूर्वी सीसीआय कडे नोंदणी करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात कापसाची विक्री करावी लागणार आहे आता सीसीआयने नोंदणी बंद केली तर शेतकऱ्यांनी कापूस विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 04:32:46
Shirur, Maharashtra:गेली काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादन शेतकरी मोठ्या संकटात सापडलााय, सध्या कांद्याला किलोला ८ ते १२ रुपये पर्यंतचा बाजार मिळत असल्याने केलेला खर्च हि निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. मागील वर्षी ही वखारीत साठवलेल्या कांद्याला बाजार भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागला होता तर या वर्षी हा वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागतोय याचाच लोणी बाजार समितीतून आढावा घेतलाय
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 26, 2026 04:19:47
Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये भाजपला खिंडार पडण्यास सुरवात भाजप नेत्या ऍड साधना धुरी बविआ मध्ये अँकर : निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला लागलेली गळती आता थांबली आहे. मात्र आता चक्क भाजपालाच खिंडार पाडण्यास सुरुवात झाली आहे. वसई शहरातील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा एडवोकेट साधना धुरी यांनी बुधवारी बहुजन विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळेला अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बविआ मध्ये प्रवेश केला. साधना धुरी यांनी नुकतीच भाजप तर्फे महापालिका निवडणुक लढवली होती. बविआ मध्ये प्रवेश करताच धुरी यांनी आंद स्नेहा दुबे पंडित यांच्यावर टीका केली. त्या फक्त रील बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळामध्ये देखील भाजपाचे अनेकजण बहुजन विकास आघाडीमध्ये येतील आणि आमचा पक्ष अधिक मजबूत होईल असा दावा येथील हितेंद्र ठाकूर यांनी केला. बाईट : माजी आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 26, 2026 04:19:03
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 26, 2026 04:05:38
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला. मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसंघर्ष समितीचे लुकमान, सलीम एक्का यांच्या सह चार ते पाच जणांवर मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्या प्रकरणी मालेगावच्या किल्ला पोलिस ठाण्यात BNS कलम 132, 292, 189(2), 190 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1)(3) चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा अशा कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला. नमाज पठण प्रकरणी संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते, तर विविध राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरू झाली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 26, 2026 04:00:09
0
comment0
Report
Advertisement
Back to top