Back
छत्रपति संभाजीनगर में रमाई घरकुल घोटाला: इम्तियाज जलिल ने पर्दाफाश
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 14:38:53
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर: एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल पत्रकार परिषद
इम्तियाज जलील पॉइंटर
रमाई आवास योजनेत राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकुल घोटाळा
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुराव्यांसह छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुरू असलेल्या कोट्यवधींच्या 'रमाई घरकुल' घोटाळ्याचा पर्दाफाश केला.
योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्य देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट फाईल्स तयार करण्यात आल्या.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (राहणार राहुलनगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, वार्षिक ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले.
एकनाथ संभाजी शिंदे (राहणार आंबेडकर नगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आले
रेशन कार्डमध्ये शिंदे यांच्या कुटुुंबातील सदस्यांची (लता, श्रीकांत, वृषाली आणि रुद्राक्ष) नावेही समाविष्ट केली गेली आहेत.
एकूण १७५ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा प्राथमिक अंदाज.
कागदोपत्री ज्या घरांसाठी पैसे उचलले गेले, त्यापैकी सुमारे ३० हजार घरं प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत.
एका कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या नावांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये लाटल्याचा आरोप.
महेंद्र सोनवणे (भाजप माजी नगरसेवक)
७०० हून अधिक बनावट फाईल्स तयार केल्याचा आरोप.
त्यांच्या मुलाच्या नावे ३१ बँक खाती असून त्यात मोठी उलाढाल झाली आहे.
अरुण बोर्डे: ३०० फाईल्स (सुमारे ७५ कोटी रुपये).
अमित भुईगळ: १५० फाईल्स.
याशिवाय रुपचंद वाघमारे, राहुल सोनवणे, जितेंद्र सोनवणे आणि भाजप नेते जालिंदर शेंडगे यांच्या नावांचाही जलील यांनी उल्लेख केला.
३१ मार्चपूर्वी बिले काढण्यासाठी महापालिका आयुक्तांवर मंत्र्यांचा (अतुल सावे यांच्या नावाचा उल्लेख) दबाव असल्याचा आरोप.
२३ कोटी रुपयांच्या फाईलवर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून, विभागप्रमुखांवरही दबाव टाकला जात आहे.
महापालिकेने ४० कोटींची मागणी केली, मात्र हे पैसे नक्की कोणाला दिले जाणार याचे उत्तर समाजकल्याण आयुक्तांकडे नाही.
हे सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार
महापालिका आयुक्तांना 'दिलेल्या पैशातून किमान १० टक्के घरं तरी शोधून दाखवा' असे आव्हान दिले आहे.
जर कारवाई झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 15:32:120
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 15:01:350
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 12, 2026 13:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 13:09:120
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 13:07:170
Report