Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में गणगौर उत्सव: महिलाओं ने परंपरा के साथ शोभायात्रा और विसर्जन किया

JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 02:45:16
Akola, Maharashtra
गणगौर उत्सव हा हिंदू धर्मातील पारंपरिक आणि विशेषतः महिलांचा उत्सव मानला जातो. हा उत्सव माता गौरी (पार्वती) आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी गणगौरची पूजा करतात. या उत्सवात गौरी-शंकराच्या प्रतिमांची स्थापना करून पारंपरिक गाणी, भजने आणि पूजा केली जाते तसेच शेवटच्या दिवशी शोभायात्रा काढून विसर्जन केले जाते.अकोला शहरात पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात गणगौर उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होत माता गौरी आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली.शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक सजावटीसह गणगौर मातांच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी गाणी-भजने गात पूजा केली तसेच सुख-समृद्धी आणि सौभाग्याची प्रार्थना केली. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली.अकोला शहरातील बजाज कुटुंबीय यांनी आपली 90 वर्षाची परंपरा यंदाही जोपासली, बजाज कुटुंबीय गेल्या 90 वर्षांपासून या शोभा यात्रेच आयोजन करत आहे.या शोभायात्रेत महिलांनी, युवतींनी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्य करत गणगौर मातांच्या प्रतिमांचे शहरातील खोलेश्वर येथील विसर्जन कुंडात विसर्जन करण्यात आले.गणगौर उत्सवानिमित्त अकोला शहरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 03:46:28
Amravati, Maharashtra:मेळघाटात भीषण पाणीटंचाई, मोथा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा; जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता. मेळघाटातील मोथा या सुमारे 1 हजार 433 लोकसंख्या असलेल्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सध्या 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळा वाढत असताना ग्रामीण भागात पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:46:14
Bhandara, Maharashtra:*सिलेंडरसाठी रांगा, ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली गॅस इन्शुरन्स व पाईपची सक्ती....वरठीत नागरिक संतप्त...* भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे भारत गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून “मेंटेनन्स”च्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आधीच गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा सक्तीमुळे त्यांचा आर्थिक भार वाढत आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेत एजन्सी धारकांकडून ही पद्धत राबवली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:45:44
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील तीनही महसूल उपविभागांतील १०९ वाळू घाटांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलेली याचिका २० मार्च रोजी निकाली काढण्यात आली. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे याचिकाकर्त्यांचे आक्षेप फेटाळून लावत सर्व घाटांवरील वाळू उत्खननावरील स्थगिती हटविण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून, उत्खनन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, याचिका निकाली काढलेल्या या १०९ वाळू घाटांमध्ये घरकुलासाठी राखीव असलेल्या १२ घाटांचाही समावेश होता. या निर्णयामुळे जिल्हा महसूल विभागाने समाधान व्यक्त केले
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 22, 2026 03:45:33
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:45:26
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:31:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इराण- इस्रायल, अमेरिका युद्धाच्या परिणाम इंधन पुरवठ्यावर झालाय, केंद्र सरकारने ५ मार्चपासून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. यामुळे संभाजी नगर एमआयडीसीत गॅसवर उत्पादन घेणारे ७० टक्के लघु, मध्यम स्वरूपाचे उद्योग ठप्प झाले आहेत. या परिस्थितीत कंपन्यांनी कुशल कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी रोज कंपनीत बोलावून मशीन सर्विसिंगची कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, रेल्वेस्टेशन आणि ऑरिक मधील लघु, मध्यम व मोठ्या कंपन्यांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. यापैकी ४० ते ५० टक्के कंपन्यांना उत्पादनासाठी एलपीजी गॅसची गरज असते. या कंपन्यांना विविध कंपन्यांकडून कमर्शियल गॅस सिलिंडरचे कनेक्शन आहे, तर शेंद्रा ऑरिक आणि वाळूजमधील काही कंपन्यांना पाइपलाइनदारे गॅसचा परवठा करण्यात येतो. व्हेंडर कंपन्यांना मोठ्या कंपन्यांनी काही काळ त्यांच्याकडून गॅसचा पुरवठा केल्याने कंपन्या सुरू आहेत. मात्र आगामी काळात सगळं ठप्प पडण्याची चिन्ह आहेत...
592
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:30:24
595
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:15:25
1020
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 22, 2026 03:02:24
1035
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 22, 2026 03:00:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात गेल्या चार दिवसात हवामानात मोठे बदल, शनिवारी तापमानात दोन अंशांनी वाढ - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहरावर ढगांचे सावट पसरले आहे तर शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल तापमानात 1.2 अंश सेल्सिअशी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण असूनही उन्हाचा चटका जाणवत असल्याने सोलापूरचे तापमान 40°c पर्यंत पोहोचल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झालाय. दुपारपर्यंत कडक ऊन त्यानंतर आभाळ आणि रात्री पाऊस अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झालीय.
1091
comment0
Report
Advertisement
Back to top