Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगांव में बिजली के जोर से झटका से 50 वर्षीय महिला की दुखद मौत

KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:34:41
Shirdi, Maharashtra
कोपरगाव शहरात आज एका घटनेत ,शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय ज्योती प्रकाश त्रिभुवन या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात पाणी भरत असतांना ज्योती त्रिभुवन या महिलेला इलेक्ट्रिक मोटारीचा जोरदार शॉक लागला,त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली सदर महिलेच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली असून. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Feb 10, 2026 07:33:36
Satara, Maharashtra:सातारा - जनतेने निवडणूक हातात घेतल्या मुळे दैदिप्यमान यश पाटण मध्ये मिळाले आहे. बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी ही निवडणूक जिंकली आहे. जिल्ह्यात त्रिशंकू निकाल लागला असल्याने शिवसेनेची भूमिका ही महत्वाची असली तरी अद्याप मी कोणाशीही या बाबत चर्चा केलेली नाही. भाजपने देसाई यांची कोंडी करत भाजपच्या बड्या नेत्यांनी पाटण मध्ये येऊन देसाई यांचा टांगा पलटी करू, पालकमंत्री नमले, विशेष पॅकेज देण्याची भाषा केली त्याचा काहीही परिणाम झाला नाही. देसाई कुटुंबावर प्रेम करणारी ही जनता आहे. ही जनता आमचे कुटुंब आहे त्यामुळे आमच्या पाटण मतदारसंघातील जनता अशा लोकांना अजिबात थारा देत नाही. त्यामुळे असे कितीही नेते आले तरी आम्ही त्याची चिंता करत नाही असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. या आधी जिल्हा परिषदेत फक्त 3 शिवसेनेचे सदस्य होते. मात्र आत्ता तो आकडा 15 झाला आहे. पाचपट संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत करण्याची वाटचाल सुरू आहे. भाजपच्या गणेश नाईक यांनी पालकमंत्री देसाई यांना मालकमंत्री अशी टीका केली होती. त्याला देसाई यांनी उत्तर दिलं आहे. ही जनताच माझी मालक आहे. माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी सोबत जिल्हा परिषदेच्या सत्तेत जायचं की नाही या बाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे देसाई यांनी सांगितलं आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 10, 2026 07:20:49
Thane, Maharashtra:गोवेली जिवनदीप महाविद्यालय येथे एकुण 1204 व 3 अपंग विद्यार्थी बसले बारावीच्या परिक्षेला.. गुलाबाच फुल देऊन केले परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत... अँकर... संपूर्ण राज्यात आज बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून आज इंग्रजीचा पेपर आहे या निमित्ताने कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संचालक रविंद्र घोडविंदे सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गोवेली येथील परिक्षा केंद्रवर मुख्य केंद्र संचालक म्हणून प्रकाश तानाजी रोहणे सर काम पहाणर आहेत. या परीक्षा केंद्रावर परीसरातील 4 शाळांचे एकुण 1204 व 3 अपंग विद्यार्थी बसले आहेत. गोवेली कॉलेज, रायते विभाग हायस्कूल, होरायझन स्कूल रायते, एस.आर.डी. पब्लिक स्कूल निंबवली गुरवली येथील वबारावीचे विद्यार्थी या केंद्रात परिक्षेसाठी बसले आहेत. या ठिकाणी 50 परिवेक्षक, 5 रिलीव्हर,10 शिफाई व इतर एकणु 80 कर्मचारी कार्यरत आहेत. 49 वर्ग खोल्या एकुण 1204 विद्यार्थी आज बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेसाठी बसले आहेत. यंदा कॉपी वर नियंत्रण ठेवण्याकरिता सर्वच परिक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अशाच प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी देखील तैनात करण्यात आला आहे. बाईट-प्रकाश तानाजी रोहणे, केंद्र संचालक
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 10, 2026 07:18:46
Yavatmal, Maharashtra:शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत गोंधळ अद्याप संपलेला नाही, यवतमाळ जिल्ह्यात लाभार्थ्यांची आकडेवारी पडताळली असता त्यात पाचशेच्या घरात पुरुष लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान ई केवायसी मध्ये महिलांनी लिंग नोंदणी करताना पुरुषा पुढील रकाना निवडल्याने घोळ झाला असावा असा अंदाज महिला व बालकल्याण अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सहा लाख 92 हजार 563 पात्र लाभार्थी महिला आहेत. यातील अनेक महिलांना योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. ई केवायसी न केल्यामुळे किंवा चुकीची ई केवायसी केल्यामुळे तसेच अर्ज प्रक्रियेतील त्रुटी पडताळणी नीट न झाल्यामुळे 68 हजार 616 लाडक्या बहिणी लाभापासून वंचित आहे. यंत्रणेने पडताळणी केली असता त्यात पाचशेच्या जवळपास पुरुषांचे अर्ज आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शासनाने या सर्व लाभार्थ्यांचा लाभ थांबविला आहे. एकूणच सर्वसामान्य गरजू महिला ज्या या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना फटका बसेला आहे. या लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त करताचं, शासनाने 6 फेब्रुवारीला शासन निर्णय काढून ई केवायसी पोर्टल 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याची मुदत वाढ दिली. लाभ थांबविण्यात आलेल्या महिलांनी नजरचुकीने चुकीची केवायसी केली असल्याची बाब पुढे आली. ज्यात महिलेच्या नावावर आधार कार्ड असताना लिंग नोंदणी पुरुषाची झाल्याचे दिसून येत आहे. त्या सर्वांची पुन्हा पडताळणी केल्या जात आहे, असे महिला व बालकल्याण अधिकारीांनी स्पष्ट केले. ज्यांची अद्याप ई केवायसी झाली नाही त्यांनी ती 31 मार्चपर्यंत करावी असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यावेळी धडाक्यात नोंदणी करून लाभार्थी महिला निवडण्यात आल्या. निवडणुकांनंतर सत्ता स्थापन झाल्यावर या योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा आल्याचेही दिसून आले. त्यामुळे पडताळणी करून अनेक चुकीची नावे आता वगळल्या जात असली तरी योजनेतील घोळ मात्र अद्यापही संपलेला नाही.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 10, 2026 07:04:08
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात १२ वी च्या परीक्षेला सुरुवात अँकर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. कोकण विभागीय मंडळाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रांवर ८ हजार २९२ विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर १५ हजार ७१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दोन्ही जिल्हे मिळून यंदा एकूण २४ हजार २ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी म्हणजे सकाळी १०.३० वाजता केंद्रावर प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूचना आणि त्यांची तपासणी करण्यात आली. कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके आणि सीसीटीवी व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 10, 2026 07:02:54
Nagpur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालयाचे व्हिडिओ वापरावे - ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देत ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. - कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंच्यातवर प्रशासक नेमच्याचा राज्य शासनाच्या निर्णय होता.. - जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर निवडणूक न घेता प्रशासक नेमण्याच्या आदेशाला खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.. - 23 जानेवारीच्या शासनाचे आदेशामुळे लोकशाही व्यवस्थेवर आणि त्याच्या रचनेवर विपरीत परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.. - कार्यकाळ संपताच निवडणूक होणे आवश्यक, प्रशासक नेमत वर्षभर निवडणुका टाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ही केला होता.. - आदेशाची अंमलबजावणी तूर्त करू नये ,पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 10, 2026 07:02:30
Thane, Maharashtra:शहापूर खाडे विद्यालयात बारावी परिक्षेसाठी एकुण 1136 विद्यार्थी बसले. 4 अपंग विद्यार्थ्यांचा सहभाग. आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परिक्षेचा इंग्रजीचा पेपर असून शहापूरातील ग. व. खाडे विद्यालय या परीक्षा केंद्रावरती एकूण 1136 विद्यार्थी बसले असून यामध्ये 4 अपंग विध्यार्थ्यांचा सहभाग आहे. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे हे या परीक्षा केंद्रावर मुख्य नियंत्रक म्हणून काम पहाणार आहेत. एकुण 46 वर्ग खोल्या असून या ठिकाणी 46 पर्यवेक्षक कार्यरत असून 8 रिल्हीवर आहेत. तसेच 10 परीक्षा नियंत्रक या ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच शहापूर तालुक्यातील एकूण 1341 केंद्रावर आज बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली आहे. सर्वच परीक्षा केंद्रावर चौक पोलीस बंदोबस्त लिखित तैनात करण्यात आलेला आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 10, 2026 07:02:14
Ambernath, Maharashtra:अम्बरनाथ नगरपालिका के 'संख्याबळा' की सुनवाई 16 तारिख को। अंबरनाथ नगरपालिका की सिं्देसेना और भाजपा के साथ मिली कांग्रेस द्वारा अम्बरनाथ विकास आघाडी में समूह के संख्याबळ पर पेच बना हुआ है। निर्णय किस समूह का आधिकारिक है, यह स्पष्ट करने के लिए जिल्हाधिकाऱ्यां के सनेसावनी शुरू है। सोमवार को हुई सुनावणी के दौरान जिल्हाधिकारियों ने आगे की सुनावणी 16 फरवरी रोजी निर्धारित करने की जानकारी दी है। जिल्हाधिकारियों ने अम्बरनाथ विकास आघाडी समूह को 32 नगरसेवक संख्या निश्चित बताई थी, लेकिन इस समूह से चार नगरसेवक बाहर निकल कर शिंदेसेना के साथ समूह बना लिया, जिसे भी 32 की ही संख्या निर्धारित की गई। इस कारण सही कौन सा समूह आधिकारिक है, यह स्पष्ट नहीं था। इस मामले में अम्बरनाथ विकास आघाडी ने उच्च न्यायालय में याचिका दायर की थी। तब समूह के संख्याबळ का पेच जिल्हाधिकाऱ्यांनी सोल्वावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 10, 2026 06:45:22
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 10, 2026 06:17:41
Ambernath, Maharashtra:बदलापुरात पाण्याची पाईपलाइन फुटली हजारो लिटर पाणी जातेय वाया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जातेय, खरवई जलशुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी ही दोन फुटाची पाईप लाईन काल सकाळी फुटली असून गेल्या 24 तासात या पाईपलाईन मधून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या मधोमध दहा फूट खाली ही पाईपलाईन असल्याने या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामात वेळ लागणार आहे , हा मुख्य रस्ता खोदल्यावरच या पाईपलाईनचे काम करण्यात येईल असं जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल, मोठं तोपर्यंत शेकडो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे。
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 10, 2026 05:19:45
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भूम तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार उघड झाला आहे. टेबलवर नाचू नका, असं सांगितल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील साहित्य फोडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भूम तालुक्यातील पाथरूड गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल भोरे जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करत होते. भूम तालुक्यातील उमाचीवाडी येथील आईसाहेब हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. तीन वाहनांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 10, 2026 05:03:02
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 10, 2026 04:45:26
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौर ॲड. स्नेहल उटग बिनविरोध... वंचित बहुजन आघाडीची ऐनवेळी माघार... लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौरपदी काँग्रेसचेच ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झालीय.. महापौर आणि उपमहापौर पदांसाठी वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली...या निवडीनंतर महापालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला... लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ४३, भाजपने २२ आणि वंचित बहुजन आघाडीने ०४ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ०१ जागा जिंकली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती असल्याने या दोन्ही पक्षांची महापालिकेवर सत्ता आली. महापालिकेतील सत्तेत आम्हाला स्थान नाही मिळाले तर या दोन्ही पदांसाठी निवडणुका होतील अशी भूमिका घेत वंचितने महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते... काँग्रेसने आश्वासन दिल्यानंतर वंचितने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:36:19
0
comment0
Report
Advertisement
Back to top