Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

नाशिक-पुणे हाईस्पीड मार्ग शिर्डी से बदले पर संगमनेर-अकोले के नागरिक आक्रोशित

KJKunal Jamdade
Dec 11, 2025 08:45:33
Shirdi, Maharashtra
नव्याने तयार होणारा नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळवल्याने संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरीक आक्रमक झाले आहेत.. आज अकोले रेल्वे संघर्ष समीतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणी नागरिक रस्त्यावर उतरले होते.. नागरीकांनी रास्तारोको करत तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या... नाशिकहून पुण्याला जाणारा हायस्पीड रेल्वेमार्ग सिन्नर येथून अकोले आणी संगमनेरच्या सरहद्दीवरून जाणार होता त्यासाठी सर्व्हे झाला आणी भूसंपादनही झाले आहे मात्र आता रेल्वेमंत्रालयाने हा मार्ग बदलून शिर्डीहून नेण्यास मंजूरी दिल्याने संगमनेर आणी अकोलेचे नागरीक संतप्त झाले आहेत.. आज अकोले रेल्वे संघर्ष समीतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्तारोको करत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता.. या मोर्चात सर्वपक्षीय नागरीक सहभागी झाले आणी हा रेल्वेमार्ग अकोले संगमनेरहूनच झाला पाहीजे अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 11, 2025 10:04:27
Parbhani, Maharashtra:अँकर- कधी न कधी शेतकर्यांना कर्जमाफी मिळते म्हणून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे हे कर्ज उचलल्याचे शेतकऱ्यांना माहितीच पडू नये याची बँका सुद्धा खबरदारी घेतांना दिसून येत आहे, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पीक कर्ज कधीतरी कर्ज माफीत बसवून आपले उखळ पांढर करण्याचा प्रकार एका तरुणामुळे समोर आलाय. बघुयात हा खास रिपोर्ट. व्हीओ- निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत कोलमडली असल्याने शासन कर्ते शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देतात,महायुती सरकारने सुद्धा कर्ज माफी देण्याचं आश्वासन दिलं होतं, सोसायटीच्या संचालकांनी केलेल्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांना शासन पीक कर्ज वाटप करीत असते. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव विविध कार्यकारी सोसायटीने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 117 कर्जदारांच्या नावाने 1 कोटी 6 लाख 24 हजार 410 रुपयांचे पीककर्ज 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी वाटप केले असल्याचे गुंजेगाव सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आले. विशेष बाब म्हणजे या यादीत नाव असलेल्या अनेक शेतकर्यांना असे काही कर्ज आपण काढल्याचे त्यांना माहीतच नाही,कारण हे कर्ज ना शेतकऱ्यांच्या पासबुक मध्ये होत ना,सातबाऱ्यांवर,शिवाय राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक बीबीशन सुर्यवंशी मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना बँक स्टेटमेंट देत नाहीये, गावात लावलेल्या यादीत ज्ञानोबा पांडलवाड यांच्या केवळ 80 आर जमिनीवर 2 लाख 96 हजार 900 रुपयांचे तर त्यांचे बंधू विक्रम पांडलंवाड यांच्या नावे 1 लाख 27 हजार 980 रुपयांचे कर्ज त्यांच्या परस्पर उचलण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी,जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लेखी तक्रार करीत बँक व्यवस्थापन आणि सोसायटीच्या पदाधिकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. बाईट- ज्ञानोबा पांडलवाड- कर्जबाजारी शेतकरी व्हीओ- काही महिन्यांपूर्वी गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती,ही निवडणूक लढविण्यासाठी गुंजेगाव येथील अमोल मोटे यांनी बँकेकडे नो ड्युज मागवले असता गावातील अनेकांच्या नावे नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आलं,13 पैकी 12 सोसायटी संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आले, हेक्टरी 25 हजार रुपयांचे कर्ज वाटप करायचे असतांना काही शेतकऱ्यांना हेक्टरी लाखो रुपयांच्या खैरात वाटण्यात आली. सदर यादी गावात बोर्डवर लावल्यावर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलच नाही,अश्या ही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... बाईट- अमोल मोटे- तक्रारदार तरुण व्हीओ- गुंजेगाव सोसायटीच्या 13 पैकी 12 चेअरमनच्या 56 नातेवाईकांच्या नावे 77 लाख 17 हजार 416 रुपयांचे कर्ज काढले असून हे नियमबाह्य असल्याचा दावा केला जातोय,चेअरमेन तुकाराम इमडे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने चक्क 10 लाख 17 हजार 860 रुवयांचे कर्ज नियम डावलून दिले,संचालक अभय बालासाहेब कुंडगिर यांच्या जवळच्या 8 खात्यावर 24 लाख 60 हजार 560 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. आता या प्रकाराची चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक संदीप भालेराव यांनी दिले असून या चौकशीसाठी त्रि- सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. बाईट- संदीप भालेराव- जिल्हा उपनिबंधक, परभणी व्हीओ-याबाबत झी 24 तासने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक बीबीशन सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या गैरकरभारावर काहीही बोलण्यास नकार दिला. शेतकऱयांना दिलेले पीक कर्ज जर शेतकऱ्यांना कळू दिलं जात नसेल तर याप्रकरणात केवळ विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारीच नव्हे तर बँकेच्या अधिकाऱ्यांचे ही या घोटाळ्यात उखळ पांढरे झालेच असलं पाहिजेत,ज्या तरूणांने गौर गरीब शेतकर्यांसमोर बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आणलाय, त्या तरुणाला धमकीवजा फोन येत आहेत,म्हटल्यावर हे प्रकरण पारदर्शीपणे हाताळले गेले तर यातून मोठा अपहार बाहेर येणार आहे,गुंजेगाव कार्यकारी सोसायटीचे हे केवळ एक उदाहरण असलं तरी जिल्ह्यात असलेल्या कार्यकारी सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल असल्याचा प्रकार नाकारता येत नाही,त्यामुळे कर्जमाफीपूर्वी बोगस कर्जदार शोधून काढण्याची आता गरज निर्माण झालीय....
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 11, 2025 09:20:12
Pune, Maharashtra:अण्णा हजारेंचा उपोषणाचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र... पत्रात लोक आयुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा दिला इशारा... अण्णा हजारें लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा करणार आमरण उपोषण... 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरा मध्ये करणार उपोषण... 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 ला विधानपरिषदेत विधेयक मंजुर होऊन देखील अंमलबजावणी होत नसल्याने करणार उपोषण... विधेयक मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अंमलबजावणी होत नसल्याने करणार उपोषण.... तर अंमलबजावणी होत नसून सरकारची इच्छा दिसत नसल्याने उपोषण करणार असल्याचं पत्रात नमूद...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 11, 2025 09:18:46
Kolhapur, Maharashtra:नागपूर अधिवेशनातील जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नादरम्यान जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांनी केला आहे. वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची मोठी फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील 2021 साली जलसंधारण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांनी या कंपनीचे रजिस्ट्रेशन बेकायदेशीरपणे नूतनीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला. फक्त इतकेच नाही, तर महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील कुशिरे यांना वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून मर्सिडीज बेंझ गाडी ‘बक्षीस’ म्हणून देण्यात आल्याचा पुरावाही त्यांनी कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सादर केला. सुरुवातीची तीन वर्षे ही गाडी कंपनीच्या नावावर होती, त्यानंतर ती सुनील कुशिरे यांचे बंधू दिलीप पांडुरंग कुशिरे यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याचंही अरुण हत्ती यांनी सांगितलं.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 11, 2025 09:15:30
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात 141 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाकडून १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ही विशेष मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात 15 लाख लोकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 10 हजार संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 141 जणांना कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी 16 टक्के सांसर्गिक (MB प्रकार) तर 84 टक्के असंसर्गिक (PB प्रकार) असल्याची माहिती मिळते. अद्याप काही संशयितांची तपासणी सुरू असून, बाधितांवर उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. अंगावर चट्टे, मुंग्या येणे, सुन्नपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मारुती कोरे यांनी केले आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 11, 2025 08:32:59
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 11, 2025 08:24:40
Chendhare, Alibag, Maharashtra:दक्षिण रायगड मध्ये शिवसेना आक्रमक.... महाड, पोलादपूरमधील शिवसैनिक संतप्त ...... चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने.... चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन... अँकर - मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद दक्षिण रायगडमध्ये उमटले आहेत. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावले यांचा कथित व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे इथले शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूरमधील शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. विरोधक रडीचा डाव खेळत असून त्यांनी या सर्व प्रकाराची माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीच्या कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 08:22:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतील संजय शिरसाठ आणि राजेंद्र जंजाळ वादावर अखेर पडदा पडला असल्याचं कळतंय, राजेंद्र जंजाळ यांच्या साथ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूरात बैठक झाली या बैठकीत राजेंद्र जंजाळ यांनी संभाजीनगर शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकल्यााची सूत्रांची माहिती आहे, या बैठकीनंतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका कामावर लक्ष केंद्रित करा असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचं कळतंय, आगामी महापालिका निवडणुका पक्षांसाठी महत्त्वाच्या आहे त्यामुळे कुठल्याही फुटीचा पक्षावर परिणाम होऊ नये असे सांगत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला, महत्त्वाचा म्हणजे संजय शिरसाठ यांनी शहर स्तरावर अनेक कमिट्या बनवल्या होत्या मात्र त्या कमिट्यांच्या वर एकनाथ शिंदे यांनी शहरातील आमदार खासदार आणि जिल्हाप्रमुख यांची एक कमिटी बनवली ही कमिटी सर्वाधिकार असलेली असेल या कमिटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाठ यांची एकाधिकारशाही मोडून काढल्याची ही चर्चा आहे मात्र या निमित्ताने अखेर शिवसेनेतील वाद संपुष्टात आला असे म्हणता येईल.. लवकरच नव्याने स्थापन केलेली कमिटी महापालिका इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरुवात करेल येत्या दोन ते तीन दिवसात इच्छुकांच्या मुलाखती ही सुरुवात होणार असल्याची माहिती मिळतेय...महत्वाचे म्हणजे या बैठकीत जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाठ आजूबाजूला बसल्याचे चित्र दिसले....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 11, 2025 08:22:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - शिरळयाचे शिवरवाडी मध्ये बिबट्याचा एकावर हल्ला,घरात शिरलेल्या बिबट्याला दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर केलं जेरबंद. अँकर - सांगलीच्या शिरळा तालुक्यातील शिवरवाडी मध्ये एका बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.यामुळे गावामध्ये बिबट्या आल्याच्या बातमी कळताचं खळबळ उडाली. गावातील नात बेंद्रे या व्यक्तीवर या बिबट्याने आणला गेला होता बेंद्रे हे आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये साहित्य आणण्यासाठी गेले असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला,त्यानंतर प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी घरात शिरलेल्या बिबट्याला पत्र लावून घर बंद केलं, यानंतर वन विभाग व सह्याद्री वॉरीयर रेस्क्यू टीमने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले आहे,मात्र बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top