Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
नवी मुंबई में भारत ने महिला विश्व कप जीत कर इतिहास रचा
SNSWATI NAIK
Nov 03, 2025 01:02:16
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई में डी वाय पाटील स्टेडियम वर झालेल्या महिला वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला ऐतिहासिक क्षण आज भारताला अनुभवायला मिळाला. यावेळी स्टेडियम वर जल्लोष झाला, आतिशबाजी करण्यात आली; महिलांनी दाखवल्या प्रतिक्रियांनी प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 03, 2025 07:34:38
Kolhapur, Maharashtra:पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री यांना पटवून सांगू असं म्हणत लाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय. पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तीव्र मतभेद. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांना उमेदवारी मिळेल असे संकेत देताच मुश्रीफांनी केला तीव्र विरोध. शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू असं म्हणत मुश्रीफांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय. महायुतीमध्ये बेबनाव दर्शवणारी वक्तव्य केल्याने महायुतीतच वादाची किनार असल्याचे समोर.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 07:32:20
Nashik, Maharashtra:राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने नाशिक मध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धांसाठी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी तीन दिवसासाठी मुक्कामासाठी नाशिकमध्ये असून या विद्यार्थ्यांची सगळी व्यवस्था आदिवासी विभागाने केली आहे,दरम्यान या सगळ्या कार्यक्रमात राज्याच्या आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्या कृतीने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं राज्यभरातून आलेल्या आदिवासी मुला मुलींसोबत स्वतः लीना बनसोड यांनी रांगेत उभा राहून जेवण घेतलं आणि जेवण केलं त्यांच्या या कृतीमुळे राज्यभरातून आलेल्या sअधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या, विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण दिलं जातं आहे का हे तपासण्यासाठी त्यांनी अचानक घेतल्याने आयोजकांची ही चांगलीच तारांबळ उडाली होती.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 07:19:57
Nashik, Maharashtra:नाशिक @ उदय सांगळे - प्रेस मुद्दे - आज मी सिन्नर तालुक्यात भाजपात प्रवेश करतोय - रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन हे उपस्थित राहणार - मी 2024 निवडणूक शरद पवार यांच्या पक्षाकडून लढवली - मुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यपद्धतीमुळे भाजपात जाण्याची भावना - देशात राज्यात भाजपची सत्ता - कामे करण्यासाठी विचारधारा आहे भाजपात जाण्यासाठी - माझी व्यक्तिगत स्वरूपाची नाराजी नाही - 15 दिवसांत निवडणूक लढवली - राष्ट्रवादी कडून कारवाईचे संकेत दिले - मला कळत नाही, राष्ट्रवादीचे लोकं महायुतीचे प्रचार करत होते - आघाडीचे खासदार महायुतीचा प्रचार करत होते - ज्या पक्षाचे तिकीट होते त्याच पक्षाचे आणि आघाडीचे खासदार महايوतीचं काम करत होते - तिकीट देऊन विरोधात काम करायचे मग त्या पक्षात कशाला थांबायचे - खासदार राजाभाऊ वाजेंनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला - माझ्याच तालुक्यातील राज्याची पद दिली ते पक्षाचे विरोधी काम करत होते - भाजपात प्रवेश करतांना हा पक्ष मला सिन्नर मध्ये मजबूत करायचे आहे - कोकाटे यांच्याबद्दल काय बोलावे - त्यांचे व्यक्तिमत्त्व देशपातळीवर गेलं आहे - माझं काम मी सिन्नरमध्ये करेल - कृषी खात्याचे मंत्री होते ते क्रीडा खात्याचे काम करत आहे कारण सगळ्यांना माहिती - शरद पवार, जयंत पाटील यांच्याबद्दल आदर आहे - पक्ष कठोर भूमिका घेत नाहींत - घटक पक्षाचे लोकं विरोधात काम करत आहे - आपला पक्ष मजबूत करा असे मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी सांगितले - युतीच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही - राज्यात बघितले महाविकास आघाडीचे पराभव झालेले उमेदवार महायुतीत जात आहे - आम्ही मागणी करू - पक्षाला वेगळं लढू द्या - कमळावर लढण्याची मागणी करू - पण अंतीम निर्णय राज्याचे नेते घेतील - दुबार मतदारांचा नरेटिव्ह सेट केला जातोय - हा एका पक्षाचा अजेंडा नाही - राष्ट्रवादी अजित पवार गटाने दुबार मतदार नोंदविले होते - उच्च न्यायालयात आम्ही गेलो होतो - हा सिस्टमचा भाग आहे - लोकप्रतিনিধीनी हे केले - कोकाटे यांनी दुबार मतदार नोंदविले आहे - त्यामुळे माझा विरोध झाला हे नक्की - युती होईल माहिती नाही पण आम्ही लढणार आहे - भाजप स्पष्टपणे आणि मायक्रो लेव्हलला काम करते आहे - म्हणून पक्षात जाण्याची भूमिका आहे - अनेकांचा ओघ आहे - माझ्या तालुक्यातील भावना तीच माझी भावना - सिन्नरच्या जनतेची भावना भाजप मध्ये जाण्याची होती - महाविकास आघाडीत प्रचंड विस्कळीतपणा आहे - विचारधारा बाबत ठाम भूमिका नाही - शेतकरी, हिंदुत्व यावर ठाम भूमिका नाही - प्रचंड गोंधळ आहे त्यामुळे कार्यकर्ते सोडून जातात - सगळे भवितव्य बघतात - त्याचे उत्तर भाजप आहे - महायुतीचा कार्यकर्ता बूथ लेव्हल पर्यंत काम करतोय - बोगस मतदार बाबत सुप्रीम कोर्टात सूनवण्या झाल्या - मी सहा वर्षांपूर्वी हा विषय घेतला होता - हा सिस्टमचा दोष आहे
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 07:19:41
Nashik, Maharashtra:- दिंडोरी आणि सिन्नर मध्ये प्रवेश आहे - यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषदेला मदत होईल - रविंद्र चव्हाण हे येत आहे - आम्हाला महायुतीमध्ये लढायचे आहेत - काही ठिकाणी वाद झाले तर मैत्रीपूर्ण लढू - ज्यांचा प्रवेश आहे ते आमच्या विरोधात लढले आहे - आमच्यात भानगडी नाहीत - उबाठा, शरद पवारांच्या लोकांना घेतोय - विरोधात असणारे बोलणारच ना - मुख्य प्रवाहात ज्यांना वाटत आहे त्यांना येता येईल - मोदीजी, देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून घेतोय ऑन शेलार - सामना काहीही छापेल - त्यांना उत्तर आम्ही देत नाही - सामना किती लोकं वाचतात - बोटावर मोजण्या इतकेच लोक - कितीही केविलवाणा प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार - महायुती आमचा प्रयत्न आहे - युती झाली नाहीतर मैत्रीपूर्ण लढू - महायुतीला जिल्हा परिषद, नगरपालिका ताब्यात घ्यायचे आहे - आम्ही महाविकास आघाडीतील लोकांना घेतोय - शहकाटशाहचा विषय नाही - चुकीचा अर्थ काढू नका ऑन अतिवृष्टी मदत - असे असेल तर गंभीर आहे - शेतकरी अडचणीत आहे - पैसे दे म्हणत असेल तर बाब गंभीर आहे - तक्रारी करा - मुख्यमंत्री यांनी कॅबिनेट मध्ये सांगितले - कुणाचा पंचनामा राहिला तर तक्रार करा - कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करू ऑन दुबार मतदार - तपासावे - दुबार मतदार आहेत कसे काय ? - प्रिंटिंग मिस्टिक असेल - आम्हीही तक्रारी करतोय ऑन सांगळे दावा दुबार मतदार - शेवटी माणूस हरल्यावर काहीही करणे देतो - उबाठा बघा काहीही कारण देते - उगाच गोंधळ घालतात - नरेटिव्ह तयार करतात - लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही ऑन वंदे मातरम भोसले मागणी - हे गीत गात अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या आहेत - धर्माचा संबंध नाही - देशाचे गाणे आहे - कंपल्सरी करावे यात वावगं काही नाही ऑन महायुती निधी - सध्या राज्यात अतिवृष्टी आहे - वारंवार मदत करावी लागत आहे - लाडक्या बहिणी त्यांना मदत करतोय - मजुरांना मदत करतोय - आर्थिक रचना करायला वेळ लागला असेल - सत्ताधाऱ्यांना दिला नाही म्हणजे विरोधकांना देतो आहे का - आपत्तीत काही निधी जातो - एखादं वर्षे वाट बघावी लागेल ऑन कृषिमंत्री बंगला खर्च - मला वाटतं टाळलं पाहिजे - मी सिक्युरिटी सुद्धा घेत नाही - मी शासकीय वाहन वापरत नाही - प्रत्येक वेळी पत्र देतो - राज्यात शेतकरी अडचणीत आहे - लाडक्या बहिणी आणि आपत्तीला मोठा निधी द्यावा लागतो ऑन रोहित पवार ट्विट - आवश्यक असेल तर करावे - अनावश्यक खर्च टाळला पाहिजे - सर्वांनी गोष्ट टाळली पाहिजे ऑन आचारसंहिता - निवडणूक आयोग ठरवेल - नंतर कळल ऑन जैन मुनी - त्यांना जाऊन भेटेल - हा वाद थांबला पाहीजे - मार्ग काढला पाहिजे - प्रश्न चिघळण्यापेक्षा मार्ग काढावा ऑन नुकसान पाहणी - मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे - सारखा पाऊस सुरू आहे - पंचनामा केला जातोय - नुकसान झाले आहे त्यांना मदत केली जाईल ऑन निंबाळकर - त्याच्यासाठी धाराशिवला जाऊ नका - घरात बसून पाहणी करा - मुख्यमंत्री असताना बाहेर पाऊल टाकलं - एकटेच गाडी चालवायचे - पर्यटनासारखं काम केलं ऑन नाशिक कायद्याचा बालेकिल्ला - नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था चांगली - महिना भरात सफाई मोहीम केली - मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या - अतिक्रमण बाबत सूचना दिल्या - रिक्षा बाबत सूचना दिल्या - रहदारी बाबत प्रश्न सूचना दिल्या - भटके जनावरे बसलेले असतात - गाई, बैल असतात - यांना बाजूला करणे आवश्यक आहे - गोठ्या वाल्यांची जबाबदारी आहेत - खड्डे बुजवायचे काम सुरू आहे ऑन नाशिक पोलीस चौकशी - कुणाची काही तक्रार असेल तर आम्हाला सांगा - कुणी काहीही सांगेल - जवळचा आहे काहीही सांगतात - अनेक लोकं आहेत - भूमाफिया आहेत - टपरी लावतात - शेतकरी गरीब आहे - जमीन बळकावन्याचा प्रयत्न केला जातो - पोलिसांकडे काहीही तक्रार करा कारवाई करतील - दहा टक्के 15 टक्के व्याज नवीन प्रकार आहे - काही लोकांना धरले आहे - भाई कम सावकार आहे - बगल बच्चे आहेत हे प्रकार सुरू आहेत - कठोर कारवाई केली जाईल - निश्चित कारवाई केली जाईल ऑन शाळा - मला याबाबत माहिती नाही - गैरसोय होणार नाही - रेस्ट हाऊस बांधण्याचा प्रश्न नाही ऑन त्र्यंबकेश्वर रस्ता - दुपारचा दौरा झाला की भेटायला जाणार आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 03, 2025 07:03:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिले के मांडकी गांव स्थित दिव्यांग बच्चों के आवासीय विद्यालय में बच्चों के साथ अत्याचार का एक वीडियो सामने आया है। वीडियो में एक छोटी उम्र के दिव्यांग लड़के को शिक्षक दीपक इंगळे द्वारा बेरहमी से मारते दिखाया गया है; बच्चे के हाथ बंधे हुए हैं और कुकर की ढक्कन से मारना भी रिकॉर्ड हुआ है। इस मामले में अन्य विद्यार्थियों के साथ भी अत्याचार की कई शिकायतें दर्ज हो चुकी हैं। घटना 2018 की बताई जा रही है पर यह वीडियो लंबे समय तक छिपा रहा; हाल ही में शिकायत के बाद स्कूल प्रशासन और पुलिस ने शिकायत दर्ज कराई है। प्रकरण की जांच जारी है; स्कूल के प्रधानाचार्य राहुल पोळ की भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 07:03:03
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा 13 वर्षाच्या मुलावर बिबट्या ने हल्ला करत ठार केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाड़ी आणि कार्यालय पेटवून देत महामार्ग रोखून धरलाय. यावरती भाष्य करताना शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या विषयाच कोणीही राजकारण न करता हा विषय काळजीपूर्वक आणि गांभीर्याने हाताळण्याची गरज असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कबूतर खाण्या साठी बैठका घ्यायला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांचे बिबट्यापासून जिव जात आहेत मात्र याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यावर खासदार कोल्हे यांनी निशाना साधलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 07:01:13
Kolhapur, Maharashtra:पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री यांना पटवून सांगू असं म्हणत लाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय. पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तीव्र मतभेद. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांनाच उमेदवारी मिळेल असे संकेत देताच मंत्री मुश्रीफानी यांनी केला तीव्र विरोध. शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू असं म्हणत मुश्रीफांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय. महायुतीमध्ये बेबनाव दर्शवणारी वक्तव्य केल्याने महायुतीतच वादाची किनार असल्याचे समोर. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजूनही एक वर्षाचा अवकाश आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाडच असतील असं सांगून टाकलं. त्यामुळेच महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदार संघ उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडली. दादांच्या या भूमिके नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रतिक्रिया देऊन शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडू असं सांगून टाकलं. एक प्रकारे हसन मुश्रीफ यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याचे दिसून आलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी मुश्रीफ याचे कट्टर कार्यकर्ते भैय्या माने जोरदार तयारी केली आहे. त्याला हसन मुश्रीफ यांची देखील साथ आहे. एक वर्षानंतर होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण याबाबत महायुतीमध्ये संभ्रम आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले सांगली मधील वक्तव्य आणि मंत्री मुश्रीफ यांनी दिलेली तातडीची प्रतिक्रिया यावरून पुणे पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्यासारखे नाही. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मी उमेदवारी देत नाही, आमच्याकडे त्याची समिती असते, माझ्या विधानाचा अर्थ न कळण्याइतके मुश्रीफ कच्चे राजकारणी नक्कीच नाहीत असे स्पष्टीकरण दिलंय. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी महायुतीमध्ये सगळं काही अलबेला आहे असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी आम्हालाच मिळेल या भूमिकेतून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जोरदार बैठक काढत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 03, 2025 07:00:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीत जल्लोष : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत वाटली जिलेबी. अँकर - भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.भारतीय महिला संघाची संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे.तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आला,हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आला,कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले, त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 03, 2025 06:46:53
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज अंबादास दानवे लातूर पत्रकार परिषद बाइट पॉईंट् निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतय त्यामुळे लोक चिडलेत. आता निवडणूक आयोगाच्या ऑफिसवर शाखा भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग असे लिहिले पाहिजे अशी टीका अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांशी पूर्णपणे फसवणूक करत आहे. त्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. या दौऱ्याला दगाबाज रे असं नाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेला पॅकेज काय झालं असं प्रश्न या संवाद दौऱ्यात विचारणार असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिले आहे. लातूर ब्रेकिंग न्यूज आपल्याला जय श्रीराम चालतो मग आय लव मोहम्मद का चालत नाही . आय लव मोहम्मद मध्ये काय चूक आहे. आपण जय श्रीराम म्हणतो. गणपती बाप्पा मोरया म्हणतो येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो मग आय लव मोहम्मद म्हणलो तर काय पाप आहे असा प्रश्न अंबादास दानवे यांनी केला आहे. लातूर ब्रेकिंग न्यूज 45 हजार कोटी रुपये खर्च आपण लाडकी बहीण योजना दिली मग तसंच कुठून तरी कर्ज घ्या आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करा असेही नऊ लाख कोटीच्या वर राज्यावर कर्ज आहे अजून वाढेल त्यात काय होते अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 03, 2025 06:45:41
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस नेते. On पुणे गोळीबार प्रकरण - तत्कालीन cp अमितेशकुमार यांनी नागपूर नासवल. तसंच जिथे जाते तिथे क्राईम वाढत आहे... देवा भाऊचा काय प्रेम आहे माहित नाही. नागपूरला सुद्धा गुन्हेगारी वाढलेली होती. थोडा संवेदनशीलता दाखवून पुण्याला वाऱ्यावर न सोडता.... पोलिसांना सरळ करण्याची आवश्यकता आहे. कुणी किती दोषी असला तरी क्लीन चीट देण्याची सवय झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा जेव्हा आशय असतो....तेव्हा पोलीस हतबल असतात.* On बिबट्याचे हल्ले - विदर्भात वन्य प्राण्याचा हैदोस वाढलेला आहे.. दरवर्षी 40 ते 50 लोकांना जीव गमवावा लागतो, शिरूर मध्ये उतरले... लोकांचा उद्रेक उद्या महाराष्ट्रभर होईल... वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबरोबर माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी तेवढीच आहे. जंगल लागून असलेल्या अशा गावांना फेंसिंग करावं... गावात वन्य प्राणी घेऊन ये अशा पद्धतीची मागणी आणि मागील मी सुद्धा केली होती. संघर्ष वाढतो तेव्हा थातूरमातूर कारवाई केली जाते. पुन्हा मात्र पुनरावृत्ती होते याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. On शेलार पीसी - स्वतःराष्ट्र उध्वस्त करायचा आणि महाविकास आघाडीला दोष द्यायचा, मत चोरी संदर्भात काय बोलतील ते बघू...आम्ही मत चोरीचे गाडीभर पुरावे दिले आहे....त्यावर बोलाव...गौप्यस्फोट इलेक्शन कमिशनच्या वकील म्हणून घेत आहे. एजंट म्हणून घेत आहे ki काय म्हणून घेत आहे. त्या उत्तर देऊ...* On सत्याचा मोर्चा गुन्हे दाखलक - घाबरल्यामुळे आता गुन्हे दाखल करत आहे, नियत मात्र क्लिअर आहे, चोरांच्या मनाची शंका आहे, ती आता दिसलेली आहे, माहितीचा सरकार हे घाबरलेल आहे...त्यामुळे घाबरून आंदोलन होऊ नये त्यावर नियत दिसत आहे. गुन्हे दाखल करा दिलेल्या जेहालात टाका ते आम्ही आंदोलन करत राहू On जैन मुनी आंदोलन - तो विषय फार मोठा आहे, दोन मिनिटात त्यावर पूर्ण होणार नाही...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 06:30:25
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 03, 2025 06:20:05
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरपना तालुक्यातील कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्याच्या बाबतीतही तेच झाले आहे. प्रशांत मसे यांनी 6 एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. हंगाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पिकाची कापणी केली. मात्र, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले. ते उन्हात सुकविण्यासाठी शेतात ठेवले असता अवकाळी पावसाच्या तडाख्याने ते पुन्हा ओल झाले. थ्रेशर मशीनने सोयाबीन काढण्याचा प्रयत्न केला असता ओलसरपणामुळे थ्रेशर मालकाने काढण्यास नकार दिला. परिणामी सोयाबीनच्या ढिगाऱ्यातच अंकुर फुटून पीक कुजण्यास सुरुवात झाली. अखेर हतबल झालेल्या मसे यांनी 6 एकरावरील जमलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लावून जाळून टाकले. या घटनेत सुमारे 25 हजार रुपये कापणी खर्च वाया गेला असून, संपूर्ण 6 एकरावरील उत्पादन नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रशांत मसे आर्थिक संकटात सापडला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top