Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304
सोलापूर के करमाला पुलिस ने चोरी गया सोना बरामद कर शिकायतकर्ता को लौटाया
SKSACHIN KASABE
Feb 17, 2026 11:46:37
Pandharpur, Maharashtra
solapur जिल्ह्यातील करमाळा पोलिसांनी तक्रारदार नागरिकांना सुखावणारी कारवाई केली आहे.पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून पुन्हा तक्रारदारांना दिलेला आहे. दोन लाख दहा हजारांची सात ग्रॅम वजनाची ठुशी आणि आठ ग्रॅम वजनाचे कर्णफुले आणि चार ग्रॅम 990 मिली वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज मूळ तक्रारदारांना परत देण्यात आला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Feb 17, 2026 14:48:00
Bhandara, Maharashtra:RUPALI CHAKANKAR BYTE (BHANDARA) ON SUPRIYA SULE STATMENT ANCHOR :- अशा पद्धतीचे प्रकरण मंत्रालयात होणे अत्यंत चुकीचं आहे.... या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे... आपल्यासमोर लवकरच सगळ्या बाबी येतील... ((कैबिनेट मंत्राच्या कार्यालयावर छापा पडणे आणि कार्यालय सिल करणे... ही बाब अत्यंत धक्कादायक आहे... या कारवाईसाठी टीप ऑफ नक्की कोणी दिली.... असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलाय.....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- रोहित पवारांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल असतील, तटकरे असतील त्यांनी आपल्याशी या प्रकरणी संवाद साधला..... खर तर दादांच्या गेल्यानंतर मी वहिनींचे मनापासून कौतुक करेल..... आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.... भावना महत्त्वाच्या आहेत पण.... त्या पलीकडेही जाऊन कर्तव्य महत्त्वाचं आहे..... त्यांनी चौथ्या दिवशी जबाबदारी पेलली.... इतक्या दिवसात अनेकांनी अनेक विधाने केली पण आता ती वेळ नाही की उत्तर देता येईल..... योग्य वेळी पक्षश्रेष्ठी त्याचे उत्तर देतील..... REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- कोणतेही पुरावे नाहीत और अशा पद्धतीचे विधानं करणं चूकचं आहे... त्यांच्याकडे असलेल्या विधानांचे बातम्यांचे पुरावे समोर मांडावे.... ((आमदाराच्या बैठका घेतात आणि विलीनीकरणावर बोलायचं नाही असं सांगतात..... पण विलीनीकरणाच्या समर्थनार्थ असलेल्या 35-40 आमदारांना रोखतील का...? असा सवाल रोहित पवारांनी केलाय....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या... REPLY ON SANDHYA SAWAALAKHE ANCHOR :- मोतीबिंदूचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही..... तसं असतं तर मी दुसऱ्यांदा भंडाऱ्यात आली आहे वेगळ्या पद्धतीने मला सांगायची गरज नाही आम्ही काम करतो विरोधकांमध्ये राहून केवळ सत्ताधाऱ्यांवर बोलणं.... आणि चर्चेत राहणं सतधाऱ्यांवर टीका करणे हा एकतर्फी काम आहे.... आम्ही काय करतो हे सांगण्यापेक्षा तुम्ही सत्तेत राहताना काय केलं हे जनतेला सांगितलं तर ते फार महत्त्वाचं आहे.... ((संध्या सव्वालाखे यांनी रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या मीडियावर येऊन बोलतात पण प्रत्यक्षात महिलांसाठी काही करत नाही अशी टीका केली होती.... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या)) REPLY ON EXAM WITHOUT MNAGALSURTRA ANCHOR :- खऱ्या अर्थाने मंगळसूत्र काढून परीक्षा देणे हे चुकीचं आहे... अशा पद्धतीने होऊ नये असं मला वाटतं.... ((मंगळसूत्र काढून परीक्षा देणं चुकीचं.... आम्हाला आमच्या मुलींचे, बहिणींचे मंगळसूत्र काढले तर चालेल का आम्हाला तर मान्य होणार नाही.... असं वक्तव्य संध्या सव्वालाखे यांनी केलं होतं..... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या))
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 13:51:11
Akola, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी व्हावी याकरिता आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सुरुवातीपासून लावून थकली होती. आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे , हे मागणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे असल्याचे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स आणि जे पायलट निघाले त्यांचा लोकेशन काय आहे ? ते कुठे होते त्या दिवशी ? हे महाराष्ट्राच्या मनात अजूनही प्रश्न उर्वरित असल्याच ते म्हणले. सीआयडी चौकशीच्या संदर्भात जे काही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिला आहे आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय यावर तात्काळ दखल घेतील आणि गांभीर्याने कारवाई करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कारवाईला उशिरा होण्यास कारण नाही, कारण कार्यकर्त्यांचा संयम सुटत आहे एवढा मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अपघात होणं आणि त्या अपघातानंतर कुठले ठोस समाधानकारक उत्तर न भेटणार त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांचा मृत्यूचा अध्याय एवढा लवकर संपेल असं कुणाला वाटत असेल कुणाला तर हे चुकीचं असल्याचाही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं त्याचा अजून उत्तर आलं नाही , प्रदेशाध्यक्षांना मी पत्रव्यवहार केला त्यावरही अजून मला उत्तर मिळालेले नाही म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या पत्राला काही किंमत नसेल तर याचा मी खेद व्यक्त करत आहे, म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 17, 2026 13:35:25
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे... गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे... संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे घरगुंत किरकोळ कारणावरून सुहास गवारे उर्फ मामा याने आईशी वाद घालत तिला मारहाण केली... भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिचा निर्घृण खून केला... तो मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समजतय... माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले... उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली... सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याचं तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी सांगितले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 17, 2026 13:06:10
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 17, 2026 13:03:57
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 17, 2026 12:53:34
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - टिपू सुलतान यांच्या फोटोवरून राज्यात जे वादळ उठलं ते चुकीच- धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव. राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करून चुकीची आंदोलने केली जात आहेत... देशात विकासाच्या मुद्द्यांवर कोणी चर्चा करीत नाही.. धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभा बच्छाव यांनी नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांच्या फोटोवरून राज्यात जे वादळ उठलं ते चुकीच असल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली नसल्याचे सांगत त्यांनी पाठराखण केली.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 17, 2026 12:33:51
Yavatmal, Maharashtra:जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या प्रताप टेलीकास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात कर्मचाऱ्यांनी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील सवना या गावी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे या भागातील मोबाईल सेवा देखील प्रभावित झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमधून कंपनीचे कर्मचारी येथे एकवटले असून त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. टेलिकम्युनिकेशन आणि रिगर या पदावर हे कर्मचारी महाराष्ट्रभर काम करतात, पगारवाढ, संरक्षण विमा, सेफ्टी किट, टूलकिट कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. परप्रांतीय वरिष्ठाकडून मराठी कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक थांबवावी अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 17, 2026 12:16:35
Pune, Maharashtra:आमदार सुनील शेळके यांनी आरोपांचे पुरावे द्यावेत नाहीतर अब्रूनुकसानीचा दावा करणार भाजपा ने पत्रकार परिषद घेत आमदार शेळकेंना दिल थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत ईव्हीएम हॅक करून भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता भाजपने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय जनता पार्टीाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आमच्यावर करण्यात आलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजपने पलटवार करत म्हटलं की, सुनील शेळके यांना सणसणाटी विधानं करण्याची सवय लागली आहे. खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण मात्र लागले आहेत, अशी टोलेबाजीही करण्यात आली. तसेच, “उमेदवार आणि कार्यकर्त्यांना कोण कर्ज देतं?” असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या शेळके यांच्यावर निशाणा साधण्यात आला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे मावळ तालुक्यातील राजकारण पुन्हा तापलंय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 17, 2026 11:48:02
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर परिसरात असलेल्या स्मशानातील राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सोनं चांदीचे दर वाढल्यानंतर राख चोरीच्या घटनांची संख्या वाढल्याचं स्मशान भूमीत काम करणारे स्थानिकांनी सांगितले. अस्थीच्या चोरींबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला असून, मयत सरला देसले यांच्या अस्थीतील सोने-चांदीचे दागिने गायब असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या चोरीच्या घटनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी झाली आहे. मयत सरला यांच्या अंतविधीच्या वेळी अनेक सोने-चांदीचे दागिने होते, मात्र दुसऱ्या दिवशी अस्थी जमा करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर चोरीची बाब समोर आली. अस्थीमधून दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. या घटनेने धार्मिक भवन दुःख झाल्याने नाराजी व्यक्त झाली, CCTV आणि सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 17, 2026 10:49:48
Vasai-Virar, Maharashtra:मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस भरती लांबणीवर, आता 16 ऐवजी 21 तारखेला होणार प्रक्रिया मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत १००० शिपाई पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया आता १६ फेब्रुवारीऐवजी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर होणाऱ्या या प्रक्रियेची तारीख प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. तारखेत बदल झाल्यामुळे विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांनी प्रवासाचे आणि राहण्याचे नियोजन नव्या वेळापत्रकानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीची तारीख ५ दिवसांनी पुढे गेल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असून, प्रशासनाकडून लवकरच सविस्तर अधिकृत सूचना प्रसिद्ध केल्या जातील.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 17, 2026 10:47:37
Kolhapur, Maharashtra:Kolhapur शहरातील लक्ष्मीपुरी परिसरात भरदिवसा एका युवकाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. हॉटेल मालकाने युवकाच्या आईला अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लक्ष्मीपुरीतील स्वस्तिक हॉटेलवर संबंधित युवकाने अचानक दगडफेक करत काचा, फर्निचर व इतर साहित्यांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रकार सुरू असतानाच नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल तरी देखील हा युवक ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याला पॉलिसी खात्या दाखवला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top