Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812
ठाकरे सेना के वैभव नाईक पर आरोप, गणेश नाइक से चौकसी की मांग
UPUmesh Parab
Feb 16, 2026 17:04:08
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग ठाकरे सेना वैभव नाईक बाईट पॉईंट्स. निलेश राणे ट्वीट. गणेश नाईक अनेक वर्ष मंत्री हैं. स्वबळावर नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवलीय. सातत्याने शिंदेंवर आरोप करत आहे. त्या आरोपांवर बोललं पाहिजे. निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाहीये. कारण रविंद्र चव्हाणावर आरोप केले होते. आठ-दहा दिवसांमध्ये रविंद्र चव्हाण यांना सरेंडर झाले. अब वह गणेश नाईकांना कधी सरेंडर होतील या महिन्यात होतील की पुढल्या महिन्यात होतील हा खरा प्रश्न है. गणेश नाईक आणि नगर विकास खात्यावर आरोप केलेत त्याची खरोखर चौकशी झाली पाहिजे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम. मुंबईतील एका रोडचं नावं बदलण्यात आलं त्याला टिपू सुलतान देण्यात आलं. त्यावेळीला त्याला सभेला अमित साटम नगरसेवक देखील उपस्थित होते. भाजप जी भूमिका घेतली ती नवाब मलिक, हसन मुश्रीकांबद्दल घेतली आणि ती भूमिका सातत्याने बदलत असतात राजकीय फायदा बघत भूमिका घेत असतात त्यामुळे यांच्या भूमी कडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजप काँग्रेस आंदोलकांवर गुन्हे. खरंतर आज सत्ता कोणाची आहे लोकांसमोर प्रश्न कुठले आहेत. सत्ताधारी असलेल्या पक्षाने आंदोलन करत असतील एखादा आंदोलन करत असेल तर त्याला विरोध करणे सत्ताधारी पक्षाला योग्य नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 16, 2026 17:04:41
Kalyan, Maharashtra:ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गर्दुल्ल्यांचा खुलेआम नशेचा खेळ रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर ठाणे कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये गरदुले खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मधला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडिओ मुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचेच पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात धुमाकूळ घालणारे हे गर्दुल्ले आता थेट लोकलच्या डब्यातच नशा करत असल्याचे दिसून आल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 16, 2026 17:00:19
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- निलेश राणे ऑन ट्विट --- गणेश नाईक साहेबांना नेमकं काय झालं हे मला समजलं नाही आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत तुम्हाला विरोधक दिसत नाहीत स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून वारंवार तुम्ही शिंदे साहेबांचे नाव घेताय. वन खात्यात काय चाललंय याकडे लक्ष दिले पाहिजे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड चालली आहे जनावरं नीचे उतरत आहेत शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही. ही कसली नाटक करताय आणि कोणासाठी करताय वनच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे यांना जी खाती मिळतात त्या खात्याचा वाटलं होतं एक्स खातं होतं त्यात दारूचे लायसन देण्यात झोलझाल केले. आता परत वन खात्यात तेच करत आहेत शिंदे साहेबांवरील टीका खपून घेतली जाणार नाही.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 14:30:37
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका महापौर पदासाठी ९ तर उपमहापौर पदासाठी ६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल.. भिवंडी महापालिका महापौर और उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन अर्ज करण्यात आले.यामध्ये महापौर पदासाठी ९ तर उपमहापौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले.यामध्ये राजकीय पक्षाच्या ५ जणांनी तर इतर ४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.तसेच उपमहापौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केला असून त्यापैकी ४ जण राजकीय पक्ष वाले तर इतर पक्षाच्या २ जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला असून विशेष म्हणजे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे काँग्रेसचे तारिक मोमिन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्हीसाठी नामनिर्देशन दाखल केल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 16, 2026 14:02:37
Washim, Maharashtra:शिरपूर के जानगीर महाराज संस्थानात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून आज महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यासाठी १५१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि ७१ क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती.महाप्रसादाच्या तयारीसाठी महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.परंपरेनुसार दुपारी महाप्रसादाचा नैवेद्य प्रथम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्याला आणि जानगीर महाराज यांना अर्पण करण्यात आला.त्यानुसार हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.ही ऐतिहासिक परंपरा हिंदू-मुस्लिम ऐक्य व धार्मिक सौहार्दाचा संदेश देणारी मानली जाते.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 16, 2026 13:47:50
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 16, 2026 13:39:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा आणि भाजपचा अध्यक्ष होईल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चे सत्ता स्थापनेची हालचाल सुरू असताना सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष आणि तोही भाजपाचा होईल,असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे,सव्वा वर्ष प्रत्येकाला अध्यक्ष पद मिळणार असल्याचेही सांगता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांनी सोबत असल्याचं सांगितलं आहे,शिवाय व्हीपचा कायदा कठोर आहे,त्यामुळे कोणी धाडस करणार,अश्या शब्दात मंत्री चंद्रकांत पाटलांनी महायुतीच्या घटक पक्षांना इशारा दिला आहे,तसेच भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना यांच्यात कोणताही प्रॉब्लेम नाही असे देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे,ते सांगली मध्ये बोलत होते।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 13:19:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या कोंढाळा गावात सिमेंट प्रकल्प काम प्रारंभ झाल्याने ग्रामस्थ संतापले. अनेकदा पाठपुरावा करूनही कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही परिणामी महिला व ग्रामस्थांनी आंदोलन करत कंपनीचे काम बंद पाडले. संपूर्ण जमीन घ्या, गावाचे पुनर्वसन करा, स्थानिक बेरोजगारांना काम द्या या मागण्यांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान काही काळ ग्रामस्थ आणि पोलिसात जोरदार धुमश्चक्री झाली. कंपनी प्रशासनाने दडपशाही केल्यास यापुढच्या काळात प्रशासन आणि कंपनी विरोधात जोरदार संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 16, 2026 13:05:52
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणतील हापूस आंबा येण्यास सुरुवात झालेय. आज हापूस आंब्याच्या 100 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. लांबलेला पाउस आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला असून हापूस आंब्याचा हंगाम यंदा खूप उशिराने सुरु होणार असल्याचे समोर येतंय. लहान हापूस आंब्याला दीड हजार प्रति डझन तर मोठ्या हापूस आंब्याला अडीच हजार प्रति डझन हा दर भेटत आहे. यंदा अमेरिकेने हापूस आंब्याला शून्य टक्के टारीफ लावल्याने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची एक्स्पोर्ट होणार असली तरी यंदाचा हंगाम कोकणातील आंबा शेतकऱ्यांसाठी थोडा कठीण जाणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 13:04:41
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर गावात महाशिवरात्रचा सण आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या पारंपरिक उत्साहात करण्यात आला साजरा अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर येथे महाशिवरात्र सण आज आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजात महादेवाला संभू सेक असं म्हणतात आणि मूल तालुक्यामध्ये नंदगुर येथे संभू सेक यांचं अतिशय जुनं पेनठाणा म्हणजे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्र निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी रविवार आणि सोमवार असा दोन दिवसीय महाशिवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी विविध प्रकारचे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, सोबतच या ठिकाणी नवीन मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top