Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
सतेज पाटील ने गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!
PNPratap Naik1
Sept 06, 2025 17:46:09
Kolhapur, Maharashtra
Kop Satej Patil Dance Feed:- Live U Anc:- विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीत बाप तो बाप बनेगा या गाण्यावर थिरकले. यावेळी कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना विनंती करत महानगरपालिकेच्या स्वागत मंडपातून खाली घेऊन गेले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह बाप तो बाप बनेगा या गाण्यावर थिरकले..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 09, 2025 03:02:13
65
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 09, 2025 02:49:52
Nashik, Maharashtra:जिल्हा परिषदेमधील ६१४ दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिव्यांगता पुन्हा एकदा तपासली जाणार. तपासणी मुंबईतील केईएम रुग्णालयात करण्यात येणार. शासनाच्या सवलती घेताना सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत तक्रारी वाढल्याने निर्णय. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रमाणपत्रांची जिल्हास्तरावरून पुन्हा चौकशी. जि.प. सीईओ ओमकार पवार यांचा निर्णय—गैरवापर रोखण्यासाठी कडक तपासणी आवश्यक. यूडीआयडी कार्ड वेळेत न सादर केल्याने ३ कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन. सर्व विभाग प्रमुखांना—७ दिवसांत युडीआयडी कार्डांची पडताळणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट निर्देश. सवलती व हक्कांचा गैरवापर केल्यास कठोरात कठोर कारवाई होणार.
152
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:46:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. दिलेल्या मुदतीत म्हणजेच २ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, अन्यथा अतिविलंब केल्यास प्रतिदिन ५० रुपये, विशेष विलंबास १०० रुपये आणि अतिविशेष विलंब केल्यास २०० रुपये प्रतिदिनाप्रमाणे अखेरच्या क्षणी म्हणजे १८ जानेवारीपर्यंत अर्ज केल्यास चक्क ४००० रुपये पर्यंत शुल्क भरावे लागेल. त्यामुळे मुदतीत अर्ज जमा करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे. माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस जानेवारीत सुरुवात होणार आहे, तर लेखी परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे.
110
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 02:45:32
Nagpur, Maharashtra:नागपूर फोनवरून धमकीप्रकरणी भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय... सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आले. मुंडेनच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी त्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस जाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले
136
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:45:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात सध्या चांगलीच हुडहुडी भरली आहे.. यंदाच्या हिवाळ्यातील तापमान घसरण्याचा रेकॉर्ड झाला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३०.४ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळी थंड वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरते आहे. यंदा ९ नोव्हेंबरपासून थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान थंडी गायब झाली होती. १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले. सकाळपासून थंडी जाणवत आहे. सकाळी बाहेर पडणारे, उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असून सायंकाळी गार वाऱ्यासह थंडीचा कडाका बसतो आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे...
189
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:32:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत सहा महत्त्वाच्या रस्त्यांवर ८ हजार अतिक्रमणे हटवून महापालिकेने जागा स्वच्छ केली, मात्र आता रस्तेांचे वास्तविक काम पुढे न्यावे यासाठी २७०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या रस्त्यांची मालकी सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने प्रत्यक्ष रस्ते तयार करणे हे आता त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, प्रथम मुख्य रस्त्याचे काम त्या विभागाकडून झाले पाहिजे, त्यानंतर मनपा सर्व्हिस रोड आणि इतर जोड कामे करेल. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरणावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ३००० कोटींची मागणी केली होती. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कमी पडणार नाही, असा शब्द दिला होता; परंतु रस्ते प्रत्यक्ष कधी सुरु होतील याबद्दल शहरात अजूनही हलचाल दिसत नाही. बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, व्हीआयपी रोड, जळगाव रोड या सहा मार्गांवर साडेपाच हजार बांधकामे हटविली गेली. नागरिकांनी जागा सोडली, दुकानदारांनी अतिक्रमण हलवले; पण पुढचे काम कोण करणार याबाबत स्पष्टता नाही.
188
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:18:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात एका चोरट्याने पैसे आणि मोबाईल असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुतगिरणी चौक परिसरातील जानकी बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात सूट बुटात आलेल्या एका चोरट्याने अत्यंत शिताफीने ही चोरी केली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे, पर्स अज्ञात चोरट्याने हॉलमध्ये प्रवेश करून चोरून नेली. या पर्समध्ये दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल होता. घटनेनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
96
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 09, 2025 02:18:07
Bhandara, Maharashtra:मार्केटिंग फेडरेशन ने ती अन्यायकारक अट रद्द करावी.... अन्यथा तोवर एकाही शासकीय केंद्रावर धान खरेदी करणार नाही.... भंडारा जिले्यात 'अ' वर्गाच्या 22 तर 'ब' वर्गाच्या 237 धान खरेदी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. अशात कोणत्याही प्रकारच्या शासकीय जीआर नसताना मार्केटिंग फेडरेशनने 15 लक्ष रुपये अमानत रक्कम व 50 लक्ष रुपये बोझा असे 'ब' वर्गाच्या धान खरेदी केंद्र चालकांवर नव्याने अन्यायकारक असे निकष लावण्यात आले. त्या विरोधात धान खरेदी केंद्र चालकांच्या संघटना आक्रमक झाल्या असून नव्याने लावण्यात आलेले अन्यायकारक असे निकष रद्द करावे.... जोपर्यंत ही अट रद्द होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात कोणत्याही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालक धान खरेदी करणार नाही अशी भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
155
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 09, 2025 02:00:49
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात पेट्रोल पंपावर सोयी सुविधा अभाव. मोफत हवा, स्वच्छतागृहामध्ये घाणिचे साम्राज्य. पेट्रोल पंपावर भौतिक सोयी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे पण भंडारा जिल्ह्यात बहुतांश पेट्रोल पंपावर मोफत हवा, स्वच्छतागृहामध्ये घरीच साम्राज्य पसरलेले आपल्य दिसून येत आहे. स्वच्छतागृह, पंपावर मोफत हवा असणे बंधनकारक आहे. पण भंडारा जिल्ह्यात बहुंच पेट्रोल पंपावर सोयी सुविधांचा आभाव असताना सेल्स ऑफिसर तपासणी करताना काय तपासतात हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे असा पेट्रोल पंपावर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. असाच एका पेट्रोल पंपावरून आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी प्रविण तांडेकर यांनी
180
comment0
Report
SKShubham Koli
Dec 09, 2025 01:04:10
Thane, Maharashtra:खारेगाव–कळवा मार्गावर तुटलेल्या नाल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू; ठाणेकरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह खारेगावहून कळवा येथे दुचाकीवरून प्रवास करत असताना एका व्यक्तीचा रस्त्यामधील तुटलेल्या नाल्यामुळे भीषण मृत्यू झाला आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्यावरचे झाकण तुटलेले असल्याने अंधारात ते त्या दुचाकीस्वाराला दिसले नाही. अचानक त्याचा पाय त्या नाल्यात अडकल्याने तो रस्त्यावर कोसळला आणि पाठीमागून वेगात येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर तुटलेली गटारे, उघडी नाले व तुटलेल्या लोखंडी जाळ्या धोकादायक ठरत आहेत. याआधीही अशा अनेक घटना दुचाकीस्वार व पादचारांना भोगाव्या लागल्या असूनही ठाणे महानगरपालिका या गंभीर प्रश्नी लक्ष देत नाही, अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
157
comment0
Report
SKShubham Koli
Dec 09, 2025 01:03:54
211
comment0
Report
Advertisement
Back to top