Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौरे पर दरे गावी पहुंचे; चव्हाण सभागृह में मेळावा
TTTUSHAR TAPASE
Oct 14, 2025 04:16:06
Satara, Maharashtra
सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी येणार आहेत. दोन दिवस गावी त्यांचा मुक्काम असून उद्या साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी त्याचा दरे गावी मुक्कामी जाणार आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Oct 15, 2025 01:45:53
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथील भाजपाचे नेते विजय चोरडिया यांना शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गळाला लावले आहे, चोरडिया हे मोठे व्यावसायिक व भाजप संघटनेत सक्रिय होते, मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजप कमकुवत होत आहे आणि पक्षात मानसन्मान शिल्लक नाही असे सांगत विजय चोरडिया यांनी मुंबईत महायुतीमधीलच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यांचा हा प्रवेश केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना मोठा धक्का मानल्या जात आहे, भाजपने वणी विधानसभा आणि लोकसभा गटबाजीने गمाविल्या नंतर चोरडिया यांनी पक्ष सोडणे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. तर शिवसेना आणखी मजबूत झाली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 15, 2025 01:45:36
Gadchiroli, Maharashtra:जहाल नक्षली भूपतीचे आत्मसमर्पण मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती गेल्या 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. नक्षल चळवळीत केंद्रीय समिती पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर. अनेक हिंसक हल्ल्यांचा होता सूत्रधार. नक्षली चळवळीचा होता थिंटकॅंक. अनेक वर्षापासून नक्षल चळवळीची भूमिका आणि धोरणे अभय या नावाने पत्रकातून मांडत होता. मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू हा तेलंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्याचा रहिवासी. 1980 च्या दशकात भूपतीने त्याचा मोठा भाऊ मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याच्यासह तत्कालिन पीपल्स वॉर ग्रroupsमध्ये प्रवेश केला. 1980 च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीने नुकताच प्रवेश केला होता. किशनजीसह भूपतीनेही त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीची पाळेमुळे रुजविण्याचे काम केले. 2004 मध्ये माओवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर दोघेही केंद्रीय समिती सदस्य झाले. किशनजीला पश्चिम बंगालचा प्रभारी करण्यात आले, तर भूपतीला दंडकारण्य स्पेशل झोनल कमिटी मेंबर बनविण्यात आले. दक्षिण भारतात गुरिल्ला झोन तयार करण्याची जबाबदारीही भूपतीवर सोपविण्यात आली होती. 2010 मध्ये नक्षल्यांचा केंद्रीय प्रवक्ता चेरीकुरी राजकुमार उर्फ आझाद हा चकमकीत ठार झाल्यानंतर भूपतीला प्रवक्ता बनविण्यात आले. 2010 मध्ये त्याचा भाऊ मोठा भाऊ, नक्षल चळवळीचा प्रमुख नेता किशनजी चकमकीत ठार मारला गेला. नक्षलवाद्यांचा प्रसिद्धी विभागप्रमुख म्हणूनही भूपती काम पाहत होता. 2011 मध्ये किशनजी ठार झाल्यानंतर भूपतीला पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आले होते. एप्रिल मध्ये छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव दलाचे 76 जवान शहीद झाले होते. या घटनेचा मास्टरमाइंड भूपती हाच होता. नक्षल चळवळीत असतानाच भूपतीने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्का या नक्षलीशी विवाह केला. एक जानेवारी 2025 ला भूपतीची पत्नी तारक्का हिने गडचिरोली आत्मसमर्पण केले. त्या नंतर सप्टेंबर 2025 मध्ये किशनजीची पत्नी तथा केंद्रीय समिती सदस्य सुजाता हिने तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीचा केंद्रीय समितीचा सरचिटणीस नंबरला केशव यांच्या मृत्यूनंतर सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र नक्सलवादाचा मार्ग सोडला पाहिजे, आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. आज भूपतीने शरणागती पत्करली. एकूणच वर्षभरात भूपती, त्याची पत्नी तारक्का आणि वहिनी सुजाता यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 15, 2025 01:45:18
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 15, 2025 01:32:47
Palghar, Maharashtra:पालघर शिवसेनचे मुख्यनेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते डहाणूचे माजी उपनगराध्यक्ष राजू माच्ची, नेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सईद शेख, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद माळवे, उबाठाच्या माजी नगरसेविका माधुरी धोडी, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष वैभव मर्दे, उबाठाचे माजी उपशहर प्रमुख हसमुख धोडी, यांच्यासह अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने आगामी डहाणू नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसली असून डहाणू नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपस्थित होते.
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 01:31:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर, तब्बल सोळा वर्षानंतर सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा होणार शुभारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर - बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सोलापूरकरांचे सोलापूर ते मुंबई विमानसेवेचे स्वप्न अखेर तब्बल सोळा वर्षानंतर पूर्ण होणार - सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बंगळुरू विमानसेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी - केंद्रीय नागरी विमान वाहतुकी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची असणार प्रमुख उपस्थिती - 2009 मध्ये किंगफिशर ने सेवा दिल्यानंतर आता 2025 मध्ये स्टार एअरलाइन्स देणार विमानसेवा - विमानसेवा सुरू होत असल्याने सोलापूरकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 15, 2025 01:31:22
Jalna, Maharashtra:जालना : शॉर्टसर्किटमुळे अंदाजे 30 एकरावरील ऊस जळून खाक घनसावंगी तालुक्यातील तनवाडी राहेरा येथील घटना नुकसानभरपाई देण्याची मागणी आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.मात्र या आगीमुळे अंदाजे 30 एकर ऊस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी राहेरा भागात ही घटना घडली आहे .या आगीत 8 शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला आहे.या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली मात्र तोपर्यंत अंदाजे 30 एकरावरील ऊस जळून मोठ नुकसान झालं होतं.दरम्यान या घटनेनंतर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 15, 2025 01:30:37
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 14, 2025 17:47:06
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या गोठाटोला येथे रुनिता दुम्मा नामक गर्भवती महिलेला खाटेची कावड करून रुग्णालयात आणावे लागले आहे. गावाला जोडणारे बारमाही रस्ते नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलल्याने या महिलेचा जीव वाचला आहे. गावातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला रास्तेनिर्मितीबाबत निवेदने दिली. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अजूनही या गावाला बारमाही रस्ता नसल्याने ग्रामस्थांची फरफट होत आहे. या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत विकासाचे विदारक दृश्य पुन्हा एकदा उघड झाले आहे.
14
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 14, 2025 15:35:03
Ratnagiri, Maharashtra:खंडाणीसाठी मुलानेच बापाच्या मानेवर सुरा ठेवून केले अपहरण व्हॉटसअॅॅपवर पाठवला हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून मागितली १ लाखांची खंडणी! रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात बाप - मुलाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना समोर आलीय. 80 वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली. त्याने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता. संगमेश्वर) असे मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैसेासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसअॅपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने काल रात्री ११ वाजता घरातच थरार माजवला. आई आणि नातीसमोरच सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून देवरुख शहरातील सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला. खंडणीचा फोटो आणि धमक्या पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नातिच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला.त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला. श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली. आईचे धाडस, पोलिसांचा तत्पर तपास या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरुक पोलिस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरुख पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकेशन - देवरुख, रत्नागिरी
14
comment0
Report
Advertisement
Back to top