Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018
पिंपरी चिंचवड संतपीठ में पहली बार हिंदी किर्तन सेवा
KPKAILAS PURI
Feb 06, 2026 03:46:44
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड महानगर पालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वास्तव्य केलेल्या पंजाब घुमान इथ संतपीठाच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले गेल. सदर अभ्यास दौऱ्यादरम्यान घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कुल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज या ठिकाणी भेटी दिल्या. घुमान मधल्या संत नामदेव महाराज मंदिरामध्ये संतपीठाचे संचालक ह. भ. प. श्री राजु महाराज ढोरे यांचे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा || या अभंगावर किर्तन संपन्न झाले. संत शिरोमणी नामदेवरायांच्या मंदिरात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार प्रथमच हिंदी किर्तन सेवा पार पडली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 06:03:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या टोफा थंडावल्या आता शनिवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण ८३० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी २८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे... २२८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सुमारे १२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत... तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 06, 2026 06:00:24
Beed, Maharashtra:बीड़: नाबालिग लड़की का विवाह, धावा पड़ते ही दूल्हे का पलायन; वीडियो वायरल\n\nरिश्तेदारों और ट्रस्ट बोर्ड के साथ 100 लोगों के खिलाफ मामला दर्ज\n\nबीड़ जिले के कपिलधार स्थित मंगल कार्यालय में नाबालिग लड़की के बाल विवाह की गोपनीय सूचना मिलने पर पुलिस ने सामाजिक कार्यकर्ताओं के साथ धावा बोला। विवाह समारोह तब तक संपन्न हो चुका था। पुलिस Observe करते ही दूल्हा मंडप से भाग गया। मामला बीड़ ग्रामीण थाना क्षेत्र में दूलाह-वर के माता-पिता, रिश्तेदार, वराडी मंडली और कपिलधार देवस्थान के विश्वस्त समेत कुल 100 लोगों के खिलाफ दर्ज किया गया है। बाल विवाह के बढ़ते प्रमाण के मद्देनजर तलाश जारी है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 05:46:00
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले में छत्तीसगढ़ सीमा पर पुलिस-नक्सल चकमक जारी है. 24 घंटे से भामरागड़ तालुक्य की छत्तीसगढ़ सीमा से लगा नारायणपूर जंगल परिसर में चल रही चकमकीट में 3 नक्सली मारे गए तथा गडचिरोली के नक्सल विरोधी पथक के एक जवान ने वीरगति प्राप्त की. चकमकी में एक घायल जवान जोगा मडावी की स्थिति स्थिर है. क्षेत्र में बड़ा ऑपरेशन जारी है. चकमकस्थल से एके-47 और एसएलआर हथियार जप्त किए गए. मृत नक्सलियों की पहचान अभी तक स्पष्ट नहीं हुई. शहीद जवान का नाम दीपक चिनना मडावी, 38 वर्ष, निवास अहेरी, मूल पता मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी है. जंगल क्षेत्र में खोज अभियान जारी है और गडचिरोली पुलिस की विविध नक्सल-विरोधी टीमें परिसर में तैनात हैं.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 06, 2026 05:37:22
Satara, Maharashtra:“मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही! असा धमकी वजा इशारा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करहर येथील प्रचारसभेत मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले दिला आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना थेट उत्तर देत शिवेंद्रराजेंनी रणसिंघ फुंकला. सन २०२९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जावली तालुक्याची विधानसभा निहाय पुनर्रचना होणार, आणि त्यातून आपल्याला पुन्हा संधी मिळणार—अशी दिवास्वप्नं काही नेत्यांना पडू लागली आहेत, असा टोला लगावत शिवेंद्रराजे म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो—ही सगळी पुनर्रचना महाराष्ट्राचा बॉस देवेंद्र फडणवीसच करणार. देवाभाऊ माझा नेता आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज पाळू नका.” असे सांगत नेतृत्वावरील निष्ठा आणि राजकीय दिशा ठामपणे मांडली.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 06, 2026 05:37:02
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 06, 2026 05:31:28
Yavatmal, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी सर्व कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली पाहिजे; 9 फेब्रुवारी नंतर तशा बैठका वरिष्ठ घेतील, आणि सर्वांच्या मताने चांगला निर्णय होईल त्याचा विश्वास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला आहे. इंद्रनील नाईक : राज्यमंत्री दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अजितदादांनी कुठलीही माहिती दिली नव्हती, ज्या काही तथाकथित बैठकांचे व्हिडिओ समोर आले ते कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत असतील अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आहे. विलीनीकरणाबाबत निर्णय घेताना प्रत्येक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली पाहिजे असेही इंद्रनील नाईक यांनी म्हटले आहे. इंद्रनील नाईक : राज्यमंत्री
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 06, 2026 05:17:29
Yeola, Maharashtra:हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या थंड हवामानाच्या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे राजमाचे पीक आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही यशस्वीपणे घेतले जात आहे. येवला तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, थंड हवामानातील पिकेही योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने उष्ण व कोरड्या भागात यशस्वी करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 06, 2026 05:17:01
Dharashiv, Maharashtra:गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा टांगा पलटी, घोडे फरार! धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून तानाजी सावंत यांचा अप्रत्यक्ष इशारा भाजप आमदार राणा पाटील आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणाला चांगलाच उकळा आला आहे. आपल्या बायकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदावर बसवण्यासाठी काही नेते मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार तानाजी सावंत यांनी केली आहे. नाव न घेता भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर निशाणा साधतानाच, माजी आमदार राहुल मोटे यांनाही तानाजी सावंत यांनी सोडलेलं नाही. “टांगा पलटी करू, घोडे फरार करू” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ते कोण आहेत, काय आहेत, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. पण मी ते होऊ देणार नाही. २०२२ साली जसं केलं होतं, तसंच यावेळीही टांगा पलटी करणार, घोडे फरार करणार. राहुल मोटे तर स्वप्नातसुद्धा आमदार म्हणून दचकून उठतात. पंचवीस वर्ष आमदारकी केली, मग काय केलं? तरुणांसाठी काय केलं? गोरगरीबाचा पोरगा आमदार होऊ नये का? काहीच केलं नाही म्हणूनच लोकांनी ठरवलं —
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 06, 2026 05:15:43
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील आकांक्षित तालुका असलेल्या मालेगाव येथे नीती आयोगाच्या संपूर्णता अभियान २.०चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती मालेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा असून आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांतील सहा निर्देशांकांमध्ये १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांचे स्टॉल तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या अभियानातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकारी कर्मचाऱ्यासह अशा सेविका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 06, 2026 05:00:51
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग : सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार उघड. सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार. मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार. यामध्ये दोन चपातीवर चवरे यांच्या प्रचाराचे पॅम्प्लेट, त्यावर हल्दी-कुणकू, तसेच लिंबावर सुई-टकण्या लावल्याचा प्रकार समोर आलाय. माझ्या घराबाहेर हा प्रकार केल्याचा मला आनंद आहे, कारण सामान्य जनतेने यांना जादू टोण्यापर्यंत आणले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. इथे जी लिंबू टाकलेत त्याचा सरबत करुन पुण्याची ताकद आमच्यात आहेत. दरम्यान सकाळी ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्या पाहायला मिळाले. मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चवरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Byte : चरणराज चवरे (झेडपी उमेदवार, शिवसेना शिंदे गट)
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 06, 2026 04:46:46
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवारच पुढे घेऊन जात होती मात्र काही नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटत असल्याने डावपेच खासदार निलेश लंके यांची नाव न घेता राष्ट्रवादी विलीनीकरण विरोध करणाऱ्या नेत्यांवर टीका पुणे महानगरपालिकेत चॉइसने उमेदवारांना चिन्ह दिली जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावरील उमेदवारांचा जयंत पाटील मी प्रचार केला , वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं मात्र अजित दादा नसल्याने आता शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत अजित पवारांची सासरवाडी असलेल्या तेर इथ निलेश लंके यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटची प्रचार सभा
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 04:18:24
Thane, Maharashtra:भिवंडी तालुक्यातील कशेळी गावाच्या हद्दीतील खाडीलगत असलेल्या कांदळवन व खाजण जमिनी वरील अतिक्रमण केलेल्या सुमारे ५० गोदामांवर तहसीलदार अभिजीत खोले यांच्या नेतृत्वात खालील पथकाने गुरुवारी कारवाईचा बडगा उचलून येथील ५० फर्निचर गोदाम व कारखाने भुईसपाट करण्यात आले आहेत. मौजे कशेळी हद्दीतील सर्व्हे क्रमांक १९३ मधील २२१ गुंठे जमीन ही शासकीय मालकीची आहे. या जमिनीवर नजीकच्या फर्निचर मार्केटची गोदामे बनवण्यात आली होती. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फर्नीचर बनवण्याचे काम सुरू होते. ही जागा कांदळवनाची असल्याने वनखात्याच्या ताब्यात देणे आवश्यक होतं आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक अवमान याचिका दाखल होती त्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत खोले यांनी दिली. सहा जेसीपी व मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वापरून येथील गोदमे भुईसपाट करण्यात आली असून या कारवाईमध्ये सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व स्थानिक नारपोली पोलिस सहभागी झाले होते.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 04:16:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी हातात कोयते घेऊन धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'आम्ही डॉन आहोत डॉन' असे ओरडत या मुलांनी भरदिवसा महिला आणि शाळकरी मुलांना शिवीगाळ करत धमकावले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास १७ व १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुले रामनगरमधील एका किराणा दुकानाजवळ उभी होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसमोर धारदार कोयता बाहेर काढला. जेव्हा एका नागरिकाने या कृत्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 'काय व्हिडिओ काढता रे, आम्ही डॉन आहोत' असे म्हणत त्यांनी धमकी दिली आणि कोयता दप्तरात लपवून पळ काढला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुरुवारी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, यातील दोघेही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. दप्तरात कोयता लपवून फिरणाऱ्या या मुलांच्या कृत्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 06, 2026 04:03:50
Nashik, Maharashtra:वकील पर हमला करने वाले 'मारी' को सिनेमाई अंदाज में गिरफ्तार नाशिक के जेल रोड परिसर में गुंडाविरोधी पथक नियमित रात्री गस्ती पर थी। सुसाट चलती एक संदिग्ध कार को पथक ने पीछा कर रोका। इस दौरान कार चालक मारुती उर्फ मारी घोरपडे ने भागने की कोशिश की। पथक ने मध्यरात्रि में एक अपार्टमेंट के बंद फ्लैट की बाल्कनी पर चढ़कर शूड-रॅक के पीछे छिपे मारुती को अपनी सिनेमाई स्टाइल गिरफ्तारी में पकड़ लिया। आड़गाव पुलिस थाना के दायरे में 2 जुलाई 2025 की दिनदहाड़े की घटना। रामेश्वर बोरेاد के ऊपर समूह द्वारा हमला कर गंभीर रूप से घायल कर देने की घटना भी मामले में दर्ज है। इस मामले में मारुती मुख्य संदिग्ध था, जो अभी दो अन्य गिरफ्त से फरार था। पुलिस ने उसे साथ ही एक अल्पवयीन संदिग्ध को भी पकड़ लिया है और कार भी जप्त कर ली है। कार उबाळे के भाई के नाम पर बताई जा रही है। इन आरोपों में नाशिकरोड पुलिस थाने में केस दर्ज किया गया है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top