Back
दिलचस्प मुलाकात: नितेश राणे- सुधाकर बडगुजर की जोशीली भिड़ंत वायरल, राजनीति दिशा बदलेगी
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 09:04:46
Nashik, Maharashtra
अँकर - राजकीय वर्तुळात सध्या भाजप मंत्री नितेश राणे आणि नाशिकचे भाजप पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या भेटीची, बडगुजर यांनी नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देत केलेल्या स्वागताची आणि राणे यांनी हसतमुख चेहऱ्याने स्वीकारलेल्या त्या स्वागताची जोरदार चर्चा रंगलीये. सलीम कुत्ता प्रकरणावरून नितेश राणेंनी बडगुजर यांना देशद्रोही ठरवले होते, या मुद्द्यावरुन आक्रमक होत राणे यांनी अधिवेशन गाजवले होते
तर भाजपनेही त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलली. काही महिन्यापूर्वी सुधाकर बडगुजर भाजपात दाखल झाले आणि गुरुवारी त्यांनीच नाशिकमध्ये दाखल झालेल्या नितेश राणेंचे स्वागत केले. भाजप कार्यालयात त्यांच्यामध्ये चर्चाही झाली, मंचावर नितेश राणेंच्या रांगेतही बडगुजर बसले होते. याशिवाय सायंकाळी गोदाकाठी झालेल्या महाआरतीला दोघेही उपस्थित होते.
सोशल मिडीयात सध्या राणे, बडगुजर भेटीचे हे फोटोज सोशल मिडीयात जोरदार व्हायरल होत असून रंगतदार चर्चा रंगलीय. सुधाकर बडगुजर हे एकेकाळी संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. बडगुजर यांनीच नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेसाठी मोर्चा थेट कोकणकडे वळवला होता.. एकंदरीतच काय तर
राजकारणात कोणीही कोणाचे कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असून कार्यकर्त्यांची काय ति बिचाऱ्यांची अडचण होतेय हे मात्र नक्की..
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 10:35:344
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 10:23:451
Report
3
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 10:03:354
Report
KPKAILAS PURI
FollowNov 07, 2025 10:01:021
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:50:252
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 09:49:264
Report
KJKunal Jamdade
FollowNov 07, 2025 09:39:478
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:38:055
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:34:286
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:33:555
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:32:595
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:03:487
Report
JMJAVED MULANI
FollowNov 07, 2025 09:02:402
Report