Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में अशोक खरात मामले में आयकर विभाग की एंट्री, SIT के बाद जांच तेज
YKYOGESH KHARE
Mar 22, 2026 02:15:10
Nashik, Maharashtra
Nashik Breaking - - नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री - SIT तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार - खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची होणार तपासणी होणार - उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार - देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर - मोठ्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ करून संयुक्त तपास - बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी - ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार - खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 22, 2026 03:15:25
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 22, 2026 03:02:24
663
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 22, 2026 03:00:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात गेल्या चार दिवसात हवामानात मोठे बदल, शनिवारी तापमानात दोन अंशांनी वाढ - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहरावर ढगांचे सावट पसरले आहे तर शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल तापमानात 1.2 अंश सेल्सिअशी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण असूनही उन्हाचा चटका जाणवत असल्याने सोलापूरचे तापमान 40°c पर्यंत पोहोचल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झालाय. दुपारपर्यंत कडक ऊन त्यानंतर आभाळ आणि रात्री पाऊस अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झालीय.
805
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 02:47:09
Akola, Maharashtra:अकोला शहरातील सांडपाणी निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी निचरा लाईन जाम होणे आणि गटारांचे पाणी रस्त्यावर येण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलत दोन आधुनिक सुपर सकर मशीन कामासाठी तैनात केल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी निचरा लाईन जाम झाल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर पसरत होते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, वाहतुकीची अडचण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेेकडून विशेष मोहीम राबवत निचरा लाईनची सखोल स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. सुपर सकर मशीनच्या मदतीने गटारांमध्ये साचलेला गाळ आणि कचरा जलद गतीने काढला जात आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून शहरातील सांडपाणी निचरा व्यवस्था पूर्णपणे सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या मोहिमेमुळे अकोला शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
933
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 02:45:16
Akola, Maharashtra:गणगौर उत्सव हा हिंदू धर्मातील पारंपरिक आणि विशेषतः महिलांचा उत्सव मानला जातो. हा उत्सव माता गौरी (पार्वती) आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी गणगौरची पूजा करतात. या उत्सवात गौरी-शंकराच्या प्रतिमांची स्थापना करून पारंपरिक गाणी, भजने आणि पूजा केली जाते तसेच शेवटच्या दिवशी शोभायात्रा काढून विसर्जन केले जाते.अकोला शहरात पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात गणगौर उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होत माता गौरी आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली.शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक सजावटीसह गणगौर मातांच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी गाणी-भजने गात पूजा केली तसेच सुख-समृद्धी आणि सौभाग्याची प्रार्थना केली. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली.अकोला शहरातील बजाज कुटुंबीय यांनी आपली 90 वर्षाची परंपरा यंदाही जोपासली, बजाज कुटुंबीय गेल्या 90 वर्षांपासून या शोभा यात्रेच आयोजन करत आहे.या शोभायात्रेत महिलांनी, युवतींनी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्य करत गणगौर मातांच्या प्रतिमांचे शहरातील खोलेश्वर येथील विसर्जन कुंडात विसर्जन करण्यात आले.गणगौर उत्सवानिमित्त अकोला शहरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
1025
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 22, 2026 01:30:44
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये कालीचरण महाराजांनी भोंदू बाबांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशोक खरात यांच्यावर टीका करताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. धाराशिवमध्ये आलेल्या कालीचरण महाराजांनी धर्माच्या नावाखाली चुकीची कृत्ये करणाऱ्यांवर सडकून टीका केली. अशा भोंदू बाबांना भर चौकात गोळ्या घालायला हव्यात, असं वक्तव्य केलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, चुकीची कृत्ये करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं. लोकांनीच एखाद्याला ‘महाराज’ बनवलं असलं तरी, धर्माला कलंक लावणारे महाराज हे पापीच आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, धर्मकार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नयेत असा कोणताही नियम नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
1000
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 22, 2026 01:15:49
Yeola, Maharashtra: सकल हिंदूंचे दैवत प्रभू श्रीराम यांची श्रीराम नवमी तसेच भगवान महावीर जयंती निमित्त येवल्यात मास विक्री बंद ठेवावी या मागणीचे निवेदन येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, यांच्यासह पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, तहसीलदार आबा महाजन यांना श्री जैन ओसवाल पंच यांच्या माध्यमातून देण्यात आले. या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत देखील प्रशासनाला देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्नण्यात आला वृत्तपत्रामध्ये तात्काळ जाहिरात देऊन श्रीराम नवमी व महावीर जयंतीच्या दिवशी येवला शहर व परिसरात मास विक्री बंद ठेवावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी ओसवाल जैन समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
1059
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 21, 2026 13:18:57
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि भाजपाच्या सदस्य Priya Shinde यांची निवड करण्यात आली. यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या कडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. आता या सगळ्या घडामोडीनंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपली भूमिका आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप और शिवसेना एकत्र युती करत ही निवडणूक लढली होती. निवडणुकीच्या अगोदरच जिल्ह्यामध्ये शक्य त्या ठिकाणी युती करण्याचे ठरले होते. त्यानुसार कोरेगाव मतदारसंघात शिवसेना और भाजप हे एकत्र लढले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत आम्ही भाजप सोबत राहिलो स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना मिठाचा खडा उपमा देत त्यांच्यामुळेच काल या सगळ्या घडामोडी घडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाइट: आ.महेश शिंदे शिवसेना शिंदे गट
1060
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 21, 2026 12:47:32
Vasai-Virar, Maharashtra:मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळील ससुपाडा येथे मोठा अपघात घडला आहे. ज्या ठिकाणी सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे आणि वारंवार वाहतूक कोंडी होत असते, त्याच ठिकाणी सहा वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात दोन कार, एक बस, एक टेम्पो, एक कंटेनर आणि एक पिकअप वाहनाचा समावेश आहे. धडकेनंतर टेम्पोमधील एक चालक अडकून पडला होता. स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य करत त्याला सुखरূপ बाहेर काढले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळेच वारंवार कोंडी आणि अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI, आपली जबाबदारी झटकत असल्याचा गंभीर आरोप भूमिपुत्र संघटनाचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला आहे.
1058
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 21, 2026 11:50:42
1096
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 21, 2026 11:47:18
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीजवळील धामटण गावात धक्कादायक घटना समोर आली आहे। धामटण गावात असलेल्या एकलव्य एनिमल्स पेडिग्री कंपनीच्या कारखान्यात टाकण्यात आलेल्या उंदीर मारण्याच्या औषधामुळे सात श्वानांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कंपनी मालकासह त्याचा भाऊ आणि कामगाराविरोधात सामाजिक कार्यकर्ता महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। इतकेच नव्हे तर जाब विचारण्यास गेलेल्या या महिलेला कंपनी मालकाने तुमच्या कुत्र्यांनादेखील मारिन असे धमकी देण्याचा देखील आरोप तक्रारदार सुचिता सुर्वे केला आहे। या तक्रारीनुसार पोलिसांनी एकलव्य ॲनिमल पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि कामगाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे。
1052
comment0
Report
Advertisement
Back to top