गिरीश महाजन के साथ शिरीष कोतवाल भाजपा में शामिल, मंच पर ठहाके
Nashik, Maharashtra:भाजप प्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी माजी आमदार शिरीष कोतवालांची घेतली फिरकी.. अँकर - नाशिकच्या चांदवड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आज नाशिकमध्ये भाजप कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी शिरीष कोतवालांची गिरीश महाजन यांनी चांगलीच फिरकी घेतली. कोतवाल तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये होते ना ? या गिरीश महाजनांच्या प्रश्नावर कोतवाल यांनी राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना आणि नंतर काँग्रेस असं सांगताच महाजन यांनी डोक्याला हात लावत आता भाजप हा शेवटचा पक्ष आहे तुम्ही मुख्य प्रवाहात आले आहात, पुढे कुठे जाऊ नका असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिटला होता..0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हाईकोर्ट ने FDA की कार्रवाई में 8 दूध डेयरी के लाइसेंस निलंबन पर अंतरिम रोक लगाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झालेले समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली.. दूध डेअरीची तपासणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधितांना १४ दिवसांची मुदत देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. एफडीए आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, ही मुदत न देताच थेट परवाने निलंबित करण्याची कारवाई बेकायदा असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. डेअरी चालकांनी अनेक त्रुटी दूर केल्याचेही याचिकेत स्पष्ट केले. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने या निलंबन कारवाईला स्थगिती दिली आहे.0
0
Report
नाशिक के कळवण में मैक्स कार और दुचाकी भिड़ंत; नवविवाहित दंपति की मौत
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज मॅक्स गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी प्रतापपूर येथे जात असताना हा अपघात घडला, अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तेथून त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला, दिनेश गावित व कीर्ती गावित अशी दोघांची नावे असून मे महिन्यात दोघांचे लग्न झाले होते, त्यांच्या सोबत असलेली तिसरी व्यक्ती त्रिशा गावित या गंभीर जखमी झाल्या आहेत.0
0
Report
आकोला जिला मतदाता पुनरीक्षण में राज्य के पांच में, फॉर्म वितरण 96.18% डिजिटाइजेशन 62.26%
Akola, Maharashtra:मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ लाख ९५ हजार ६४४ मतदारांच्या पुनरीक्षणासाठी आतापर्यंत १५ लाख ३४ हजार ७३७ फॉर्मचे वितरण करण्यात आले असून, हे प्रमाण ९६.१८ टक्के इतके आहे. तसेच ९ लाख ९३ हजार ४४९ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ६२.२६ टक्के आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाचा आढावा घेतला. फॉर्म वितरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या कामगिरीच्या जोरावर अकोला जिल्ह्याने राज्यातील क्रमवारीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. मतदारसंघनिहाय प्रगतीचा विचार करता, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ९९.२८ टक्के फॉर्म वितरण आणि ७८.४० टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. अकोट मतदारसंघात ९९.९८ टक्के फॉर्म वितरण आणि ७०.५५ टक्के डिजिटायझेशन झाले आहे. तर बाळापूर मतदारसंघात अनुक्रमे ९९.६० टक्के फॉर्म वितरण व ६४.२६ टक्के डिजिटायझेशन, अकोला पश्चिम मतदारसंघात ८६.६१ टक्के फॉर्म वितरण व ३९.३१ टक्के डिजिटाईझेशन, तर अकोला पूर्व मतदारसंघात ९९.२० टक्के फॉर्म वितरण व ६१.३९ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.0
0
Report
Advertisement
पेपर लीक मामले में अब नया कानून, दोषी किसी हालत में बख्शे नहीं जाएंगे
Mumbai, Maharashtra:एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आपला वाढदिवस समाज उपक्रम राबवून साजरे करत असतात रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश कदम यांनी शासन आपल्या दारी उपक्रम राबवला वीस हजार पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ झाला पेपर लीक होणं ही दुर्दैवी घटना याचे गांभीर्य पंतप्रधानांनी घेतलं पेपर लीग करणारे सर्व आरोपी अटक आहेत सीबीआय त्याची चौकशी करत आहे उद्या यावर नवा कायदा येईल यात दोषी असणारा कोणीही सुटणार नाही धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपले नैतिकता समजून राजीनामा दिला आहे विद्यार्थ्यांचा आंदोलन हे नॉन पोलिटिकल होत काही लोकांनी ते राजकीय आंदोलन केलं काही लोक जंतर-मंतरवर न जाता प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानावर गेले पंतप्रधानांचे घर हे हाय सिक्युरिटी झोन मध्ये येतं इंदिरा गांधीजींची हत्या झाल्यानंतर एसपीजीने विशेष कायदा केला पंतप्रधानांच्या घराच्या परिसरात आंदोलन करण्यास बंदी असताना देखील राहुल गांधींनी तिथे हजारो लाखो लोकांना बोलावलं पंतप्रधानांच्या घरात घोषणा मोठा घातपात करणे त्यांची मनशा होती नेहमी म्हणतात बांगलादेश होईल नेपाळ होईल श्रीलंका होईल देशात अराजकता पसरवण्याचा त्यांचा उद्देश आहे यापूर्वी देखील देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत आंदोलन जंतर मंतरवर असताना ते पंतप्रधान आवास आकडे लाखो लोकांना बोलवत होते त्यांचा दुष्ट हेतू होता त्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो महाराष्ट्रातील काही लोकांना जनतेने नाकारला आहे (ठाकरे बंधूंवर) ते पेटवा पेटवीची भाषा करत होते आता आग लागलेली आहे भिजून देऊ नका त्यांचा असं झालं बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना (ठाकरेंना टोल) विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत त्यांचा आंदोलन यशस्वी झालंय त्यामुळे त्यांचे दुष्ट हेतू असफल ठरले आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यासपीठाचा राजकीय वापर होऊ देऊ नये0
0
Report
ठाकरे बंधुवर्ग के बीच मुलाकातों की चर्चाओं में मातोश्री की भूमिका सामने
Mumbai, Maharashtra:रामदास कदम ठाकरे बंधू शेजारच्या घरात मुल झालं म्हणून हे पेढे वाटत आहेत उद्धव ठाकरे एक वेळ होती मातोश्रीवर मोठे मोठे व्यक्ती यायचे केजरीवालांना भेटत आहे राहुल गांधी यांनी यांना वेळ दिली नाही हुकूम शाह तुम्ही आहात; मोदी हुकूम शाह असते तर धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनामा घेतला नसता0
0
Report
गडकरी के बयान पर सियासी घमासान, विपक्ष ने सवाल उठाए
Mumbai, Maharashtra:सचिन अहिर दुर्दैवी आहे वरात कुणाची घोडा कोणाचा आणि बसतोय कोण याचा श्रेय झेनझिनचा आहे दुसरा श्रेय सरकारने ही गोष्ट मान्य केली मोठी गोष्ट आहे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाव ठेवत होते हीच लोकशाही आहे लोकशाही संपली आहे लोकशाही दोन्ही बाजूने दाखवली आहे नाहीच केलं असतं तर त्यांचा प्रश्न रास्त राहील असतं काही लोक असं दाखवत आहेत आमच्यामुळेच राजीनामा झाला आहे झेंझि लीडर नी सांगितलं मला श्रेय देऊ नका. हे श्रेय लोकांचा आहे शिक्षण क्षेत्रात कमतरता आहे केंद्र सरकार राज्य सरकारने बदल करान सकारात्मक बाब आहे काही लोक राजकीय भांडवल करत आहेत झेंझि हुशार आहे त्यांना माहित आहे कोण वापर करतोय कोण गैरवापर करत आहे विजय मेळावा केला त्याला जास्त काही महत्त्व राहणार नाही जास्त काही टिकणार नाही ऑन नितीन गडकरी काल पर्यंत कौतुक करत होते आज अचानक बोलाव लागलं विरोधक म्हणून बोलाव लागत नंतर फोन वर त्यांच्याशी बोलून मी का बोलो का बोलू नये असे होता कामा नये युती मध्ये असताना चांगला मंत्री म्हणून कौतुक करायचं परिस्थिती नुसार आपण टीका करायला गेलो तर त्यांच्या चांगल्या कामाला अन्याय होईल सर्व खासदारांना माहिती नितीन गडकरी यांच्या सारखा काम कोणीच करू शकत नाही0
0
Report
Advertisement
शिंदे का व्यापक आश्वासन: शिफ्टिंग पीड़ितों के लिए फॉर्म भरवाने की गारंटी
Mumbai, Maharashtra:SIR च्या माध्यमातून शिफ्टिंग झालेले लोक आहेत ज्याची घरे तुटली आहेत भाडयाने गेली आहेत दुसरीकडे त्यांची फॉर्म भरून घेत नाही आहेत त्यांना मतदानापासून वंचित करणार का अजिबात तसं होणार नाही मी त्यांना इन्स्ट्रक्शन देतो त्या लोकांचे सुधा फॉर्म भरले जातील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे हा विद्यार्थ्यांचा विजय आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय आहे त्यांचं श्रेय त्यांनाच दिले पाहिजे0
0
Report
NRC की धंसती सुरक्षा दीवार से रिक्षा पर गिरावट, चालक घायल अस्पताल में भर्ती
Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील आंबिवली स्टेशन रोड ते बल्याणी दरम्यान NRC कंपनीची संरक्षक भिंत रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षावर कोसळली रिक्षा चालक किरکوळ जखमी रिक्षाचे नुकसान शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं NRC कंपनीच्या धोकादायक संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर0
0
Report
विखे पाटील ने ठाकरे बंधूंवर प्रहार, कहा—उनका राजनीतिक अस्तित्व खत्म
Satara, Maharashtra:कराड : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कराडमधून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "ठाकरे बंधूंच्याच झिंज्या लोकांनी उपटल्या आहेत," असा घणाघात विखे पाटील यांनी केला. कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. "ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व आता संपलं आहे. सध्या त्यांची ही अस्तित्वाची लढाई सुरू आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांच्या झिंज्या लोकांनीच यापूर्वी उपटल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही," असा टोला विखे पाटील यांनी लगावला.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.0
0
Report
Advertisement
करमाळा के चिखलठाण में आठ किसानों ने बिजली हेतु आमरण अनशन शुरू किया
Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे आठ शेतकऱ्यांचे विजेसाठी आमरण उपोषण सुरू उजनी काठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचा शेतीचा नियमित आठ तास वीज पुरवठा सोडण्यासाठी आमरण उपोषण सुरू मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांच्या इशारा0
0
Report
कोळीवली पेट्रोल पंप के पास चलती मोटरसाइकिल में अचानक आग लगने से चालक ने सुरक्षित बाहर निकल लिया
Kalyan, Maharashtra:कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुचाकीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तातडीने खाली उडी मारली. काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दुचाकीचे संपूर्ण जळून खाक झाली आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
दहिसर समेत छह केंद्रों में 11 हजार उत्तर भारतीयों को मराठी सिखाने की पहल
Mumbai, Maharashtra:दहिसर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११ हजार उत्तर भारतीय नागरिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परिवहн मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आली बोलता आली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी, अशी भूमिका विविध स्तरांवरून मांडली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मराठी शिकवण्याचा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी दहिसर आणि बोरिवली परिसरात एकूण सहा प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे ११ हजार नागरिकांनी या वर्गांमध्ये सहभाग नोंदवला आहे. शिक्षक शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी नागरिकांना मराठी भाषा बोलणे, वाचणे आणि दैनंदिन व्यवहारात वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मराठी भाषा शिकण्याबाबत उत्तर भारतीय नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा उपक्रम भाषिक ऐक्य आणि परस्पर संवाद अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई एपीएमसी के फलों से फेंके गए कचरे से सड़क पर बिक रहे फलों का वीडियो सामने आया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई स्थित एपीएमसी फळ मार्केट मद्ये फेकून दिलेल्या फळांच्या बॉक्स मधून फळ उचलून नवी मुंबई ,ठाणे ,मुंबई येथील रस्त्यावर विकली जात असल्याचा व्हेएडिओ समोर आला है, पावसामुळे अनेक फळे खराब होत आहेत, यामुळे ही सडलेली फळे बाजार समिती के आवारात फेकली जात आहेत, या फेकलेल्या सडक्या फळातून फळे वेचून ती विकण्यासाठी आल्याचा व्हेएडिओ समोर आला है। यात सफरचंद मोठ्या प्रमाणात फेकली असून, या सडक्या सफरचंद मधून काही सफरचंद काढली जात आहेत, असा व्हेएडिओ समोर आला है। ही सफरचंद रस्त्यावर 100 ते 200 रुपये ने विकली जात आहे। सामाजिक कार्यकर्ता नागमणी पांडे यांनी हे व्हेएडिओ काढले आहेत.0
0
Report
मेळघाट के टिटवा आश्रम स्कूल में फूड पॉइजनिंग, अदिती तटकरे ने क्या कहा?
Amravati, Maharashtra:AMT_ADITI_BYYE तीन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील - अदिती तटकरे अदिती तटकरे ऑन मेळघाट फूड पॉयझनिंग. मेळघाट मधील टिटवा आश्रम शाळेत फूड पॉइजनिंग झाल्याची घटना माहिती मिळाली या संदर्भात डॉक्टरांशी मी संवाद देखील साधला.. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं यासंदर्भात आदिवासी मंत्री यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे.. सेंट्रल किचन मध्ये कोणतं जेवण आणलं गेलं होतं या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे ऑन दिल्ली आंदोलन.. देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याचे पावले उचललेले आहेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते ऑन लाडकी बहीण योजना.. लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे ज्या महिलांनी एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उनिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जाणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील0
0
Report
किसानों को 2 लाख तक की कर्जमाफी, 2026 के राहत पैकेज का ऐलान
Chandrapur, Maharashtra:कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या पोचल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे, याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026' जाहीर केली आहे. या योजनेत आता सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. पात्र शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या आहेत. याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 72 हजार 388 खातेदारांची माहिती पोर्टल वर अपलोड करण्यात आली असून यात 43 हजार 816 खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तर 28 हजार 572 खातेदार हे राष्ट्रीयीकृत बँकेचे आहेत. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फूले कर्जमाफी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत त्यांच्या थकीत पीककर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत.0
0
Report
Advertisement
