Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
सीएम फड़णवीस का ओझर हवाई अड्डे पर आगमन, शिंदे और भुसे ने किया स्वागत
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:18:58
Nashik, Maharashtra
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन. यावेळी समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 09:25:55
Shirdi, Maharashtra:प्रसाद लाडू वितरणानंतर साई संस्थानचा आणखी एक मोठा निर्णय... साई प्रसादालयातील भोजन मेनूतही मोठा बदल... दोन भाज्यांऐवजी मिळणार आता एक भाजी, डाळ भाताऐवजी आता खिचडी... प्रसादાલયातील भोजन मेनुटून डाळ भात झाला गायब... आता मिळणार फक्त एक भाजी, चपाती और तांदळाची खिचडी... गैस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानचा मोठा निर्णय... उपलब्ध गॅस काटकसरीने वापरण्यावर भर... प्रसाद भोजन बनवताना साई संस्थानचा सोलर प्लांट देखील ठरतोय मोठा आधार... साई संस्थानने घेतलेल्या दोन्ही महत्त्वाच्या निर्णयाबाबत साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याशी बातचीत केलिए आमचे कुणाल जमदाडे यांनी....
71
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 09:24:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. आयपीएस बनलेल्या प्रवीण कोळपेची हत्तीवरून मिरवणूक काढत साखर वाटण्यात आली आहे,विशेष म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये आटपाडी शहरातून हे हत्तीवरून मिरवणूक निघाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः नागरिकांना साखर वाटत जल्लोष साजरा केला आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि हजारो आटपाडीकरांच्या साक्षीने अशी ऐतिहासिक हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि प्रवीण कोळपे यांनी मिळवलेल्या यशाचं आनंद साजरा करण्यात आला.
32
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 09:23:26
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्टेट ऑफ होर्मुझच्या सामुद्रमार्गे भारतीय जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याचा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. होर्मुझ परिसरात भारताची सुमारे ३५ जहाजे अद्याप अडकून असल्याचे ते म्हणाले. तसेच खाडी देशांमध्ये जवळपास ११०० भारतीय नागरिक अडकले असून त्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते पुढे म्हणाले की हे युद्ध लवकर संपेल असे वाटत नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते, त्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देशाला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय एआय संमेलनात भारताची प्रतिमा खराब झाल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून सध्या अमेरिका बॅकफूटवर गेल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.
53
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 14, 2026 09:20:22
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - वर्ध्यात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा - तुटवड्याच्या भीतीने सकाळपासून सिलेंडर बुकिंगसाठी गर्दी - उन्हात तासन्‌तास उभे ग्राहक; गॅस एजन्सीबाहेर किलोमीटरपर्यंत रांग वर्धा शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची भीती निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होईल, या अफवांमुळे अनेक नागरिकांनी एकाच वेळी सिलेंडर बुकिंग करण्यासाठी गर्दी केली आहे. परिणामी आज सकाळी सात वाजल्यापासूनच विविध गॅस एजन्सी आणि बुकिंग केंद्रांबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर ही रांग तब्बल एक किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तानातास उभे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहक तासन्‌तास उभे राहून सिलेंडर मिळण्याची वाट पाहत आहेत. सिलेंडरचा तुटवडा होणार की काय, या भीतीमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
42
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 14, 2026 09:04:58
211
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 14, 2026 09:03:01
Mumbai, Maharashtra:मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सात च्या वतीने आज भव्य मालमत्ता प्रदान कार्यक्रम मुलुंड मध्ये पार पडला. अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्यासह या झोन मधून सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते या मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. यात १०८७ मोबाईल, २३ तोळे सोने, चांदी, दुचाकी आणि रोख रक्कम असे एक कोटी ९२ लाख रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. अत्याधुनिक पद्धतीने तपास करून हजारो मोबाईल पोलिसानी परत मिळविले आहेत. हे मोबाईल आणि चोरीला गेलेले, हरवलेले हे ऐवज पोलिसानी परत केले. या वेळी पोलिसानी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले तर नागरिकांनी ही पोलिसांचे आभार मानले.
144
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 14, 2026 08:48:36
Satara, Maharashtra:सातारा - भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावताना ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान 120 इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये कार्यरत असणारे भारतीय सैन्य दलाचे जवान बाळकृष्ण निकम यांना वीरमरण आले .शहीद जवान बाळकृष्ण निकम यांची पाटण शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन नागरिकांकडून शहीद बाळकृष्ण निकम यांना अखेर चा निरोप दिला .त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी कुटुंबीयांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश करत त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.त्यांच्या मूळ पाटण पिंपळोशी गावी शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सातारा पोलीस दल आणि लष्करांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.हजारोंच्या उपस्थिती अश्रू पुर्ण नयनांनी त्यांनी अंतिम निरोप देण्यात आला
144
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 14, 2026 08:12:38
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ सेक्टर 26 येथील बामणदे मैदानावर नियोजित 'Formula 4' कार रेसिंग ट्रॅक उभारण्याच्या प्रकल्पा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविलाय. सदर मैदानावर रेसिंग ट्रॅक बनविणे हे स्थानिक खेळाडूंच्या अधिकारावर गदा आणून मैदान नष्ट करण्याचा डाव असून फॉर्मुला वन रेसिंग ट्रॅकचे काम तात्काळ थांबवून पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी केलेय. यासंदर्भात शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापौर सुजाता पाटील यांची भेट घेत सकारात्मक निर्णय न झाल्यास नेरुळ ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. नेरूळ येथील ज्या मैदानात हा कार रेसिंग ट्रॅक बनवला जाणार आहे त्या मैदानाचे शोभाभूमीकरण करून स्पर्धा झाली की तो ट्रॅक बुजवणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
176
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 07:46:43
173
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 07:15:26
Shirdi, Maharashtra:मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तणझाईची झळ आता धार्मिक स्थळांनाही… राज्यात गॅस तंåचाईचे संकट गडद होत असताना शिर्डीतील साई संस्थानचा मोठा निर्णय… गॅस बचतीसाठी साई संस्थान प्रशासनाने केला लाडू प्रसाद वितरणात बदलाव.. आता दर्शनानंतर प्रत्येक साई भक्ताला दिलं जाणार फक्त एकच लाडू पाकीट... पूर्वी भाविकांना एकापेक्षा अधिक मिळत होती लाडू पाकिटे , मात्र परिस्थिती पाहता साई संस्थानचा निर्णय… साई संस्थानकडे सध्या सुमारे २० दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक… मंदिर परिसरातील सर्व लाडू काउंटरवर प्रशासनाने लावले सूचना फलक... गॅस वापर कमी करून लाडू निर्मिती प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचा संस्थानचा प्रयत्न… राज्यात वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक संस्थांनकडूनही उचलली जाताय गॅस बचतीची पाऊले... सूचनाफलक लावलेल्या लाडू काउंटरवरून आढावा घेत भाविकांशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुंNAL JAMDADE यांनी...
262
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 06:47:18
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: आयटी पार्क मधील सामुदायिक स्वयंपाकघरात गॅसची अडचण नसल्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर खिचडी शिजवली जाते. वाफेच्या यंत्रणा, सौरऊर्जेच्या मदतीने खिचडी शिजवली जाते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, या स्वयंपाकघरात वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय तयार झाला आहे. या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पोषणमूल्ये जपून अन्न शिजवले जाते, तसेच एलपीजीवर अवलंबून न राहता सौरऊर्जेचा वापर केला जातो. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क येथे त्यांच्या वतीने सामुदायिक स्वयंपाकघर चालविले जाते. आज जिल्ह्यातील दररोज 40 हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहचविण्याचे काम केले जाते. शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38 हजार विद्यार्थी तसेच 80 बालवाड्यांमधील 3500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातो. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या IT पार्क मध्ये गॅस सिलिंडरची झंझट नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
153
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 06:35:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही - मंत्री उदय सामंत. अँकर - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही,अशी फटकेबाजी शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता, सध्या सगळीकडे 'पुष्पा' चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्या सारखं 'झुकेगा नही' म्हणण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला.शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
150
comment0
Report
Advertisement
Back to top